Thursday, February 11, 2016

शिक्षणाबाबत काय आणि काय काय ?
वसंत गणेश काणे
पूर्वप्राथमिकबाबत धोरणच नाही, प्रवेशपाळीवरच्या किमान वयाची निश्चिती, दहाव्या वर्गात असतांना घेतली जाणारी चाचणी ही कल चाचणी आहे की अभिरुचि चाचणी असा संभ्रम, पास-नापासाचे पुररागमन, नापासीचा शिक्का पुसण्यासाठी फेरपरीक्षेचा तोडगा, कौशल्यविकासासाठी स्वतंत्र विभाग,  तंत्र शाळांना झळाळी,   हे या शैक्षणिक सत्रातील महत्त्वाचे टप्पे (माईल स्टोन ) ठरणार आहेत.
   पूर्वप्राथमिकबाबतचे धोरण - हा विषय तसा जुना आहे. मागच्या सरकारने शिक्षणराज्यमंत्री मा. फौजिया खान यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीचा अहवाल ( बहुदा) येण्याअगोदरच किंवा आल्यानंतर लगेचच शासनकर्ता पक्ष बदलला. हे काहीही असले तरी या क्षेत्राचा विचार न करून चालणार नाही, ही बाब सर्वस्तरावर नक्कीच मान्यता पावली होती. कायदा करण्याचे जुन्या शासनाच्या मनातही होते. तसे प्रयत्न सुरूही झाले होते, असेही म्हणतात. नवीन शासनाचाही विचाराचा हा धागा पुढे नेण्याचा विचार सुरू झाला होता. पण या निमित्ताने पडणारा आर्थिक भार सोसणे शक्य होणार नाही, असे सांगून खुद्द शिक्षणमंत्र्यांनीच हा विचार शासनाने सोडून दिल्याचे सांगितले. निदान कायदा करायला काय हरकत आहे, असाही विचार समोर आला. पण तसा नुसता कायदा केल्यानंतर जो थोडासा आर्थिक भार शासनावर पडेल, तोही सध्याच्या परिस्थितीत शासनाला जड जाणार आहे, असे म्हटल्यावर हा विषय मागे पडणे क्रमप्राप्तच होते.
  अमेरिकेत या विषयाबाबत एक चमत्कारिक धोरण आखलेले दिसते. तिथे केजी-२ ते १२ वी पर्यंतचे शिक्षण नि:शुल्क आहे. पण नर्सरी व केजी -१ साठी भलीमोठी फी देण्यावाचून पालकांना गत्यंतर नसते. आपल्या सारखी आर्थिक चणचण अमेरिकेत नाही पण तरीही असा अर्धवट निर्णय( दोन्ही अर्थांनी) तिथल्या शासनयंत्रणेने का घ्यावा, हे तिथेही एक न उलगडणारे कोडेच आहे. त्यामुळे पावसाळी छत्र्यांप्रमाणे बालक मंदिरांचे पैसे मिळवून देणारे हे उद्योग पुढील काही वर्षे असेच चालू राहतील, असे दिसते. हा पैसा काही महाभाग आपली कमाई समजून वापरतात, तर काही मोजके लोक याप्रकारे मिळालेला पैसा काही प्रमाणात याच शिक्षणावर तर आणखी काही मोजके लोक या पुढच्या किंवा वेगळ्या अभ्यासक्रमांवर खर्च करतात. वास्तवीक मुलांचा हा वयोगट एका अतिशय नाजुक व संवेदनशील अवस्थेतून जात असतो. या वयोगटाकडे होणारे दुर्लक्ष काही स्थायी स्वरुपाची वैगुण्ये किंवा उणिवा निर्माण होण्यास मुख्यत: कारणीभूत होत असते. स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजवर आपण सवंग लोकप्रियतेच्या नादी लागून अर्थविषयक कठोर निर्णय घेतले नाहीत. भरीसभर अशी की, भ्रष्टाचारानेही आपली पाठ सोडली नाही. त्यामुळे जो कर्जाचा डोंगर डोक्यावर उभा आहे आणि जी आर्थिक चणचण निर्माण झाली आहे, ती दूर होण्यासाठी काही काळ जावा लागेल.
  पहिलीत प्रवेश घेण्याचे वय - प्रवेशपाळीवरच्या किमान वयाची निश्चिती करण्याचा प्रश्न मात्र चांगल्याप्रकारे मार्गी लागलेला दिसतो. केवळ १ लीचे प्रवेशाचे वय निश्चित करून चालणार नाही कारण ह्या निर्णयाचा खालच्या स्तरावर उतरंडी सारखा परिणाम ( कॅस्केडिंग इफेक्ट) होईल होईल, हे वेळीच लक्षात आल्यामुळे नर्सरी-१ पासून वय निश्चित करावे लागेल हे ध्यानी ठेवून आपण २०१६-२०१७ मध्ये पहिलीतील प्रवेशाचे वय सहा असावे हा निर्णय अमलात आणत आहोत. याचे स्वागत व योजकांचे अभिनंदन केले पाहिजे. आता ३१ जुलैला ३ वर्ष पूर्ण करणाऱ्या मुलाला नर्सरी १ मध्ये प्रवेशासाठी पात्र धरले जाईल.या हिशोबाने ३१ जुलैला ५ वर्ष पूर्ण करणाऱ्या मुलाला १ ल्या वर्गामध्ये प्रवेशासाठी पात्र धरले जाईल. पण नर्सरीसाठी कायद्याची तरतूद मात्र नसावी, हा विरोधाभास दूर व्हायला हवा, हे अमान्य करता यायचे नाही.
पास की नापास - आता ढकलगाडीला पुन्हा ब्रेक लागणार आहे. आठवीपर्यंत नापास कराचे नाही, मूल्यांकनही करायचे नाही, असा घेतला गेला व आठवी ‘पास’ झालेले विद्यार्थी कच्चेच राहिले. सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्यमापन हा उद्देश दूर राहिला. ज्या अमेरिकेचे अनुकरण करीत ही योजना आपण स्वीकारली तिथली व आपल्या इथली परिस्थिती भिन्न आहे. तिथे आदल्या दिवशी झालेल्या चाचणीचे मूल्यांकन दुसरे दिवशी सकाळपर्यंत पालकाला ईमेल करून कळविले जाते. हे आपल्या येथे शक्य आहे का? त्यामुळे आपला वेळ चोपड्या भरण्यातच खर्च होत असतो. प्रत्येक सत्रात दोन दोन घटक चाचण्या( युनिट टेस्ट)  व प्रत्येक सत्राच्या शेवटी सत्र परीक्षा घेऊन व अंतर्गत गुणही हिशोबात घेऊन निकाल जाहीर करणे हेच सध्यातरी आपल्या येथे सोयीचे आहे.
   कलचाचणी की अभिरुची चाचणी - महाविद्यालयात प्रवेश घेण्यापूर्वीच आपला कल कोणत्या विषयाकडे आहे हे मुलाला कळावे हा हेतू समोर ठेवून दहाव्या वर्गात असतांनाच सत्राच्या शेवटी शेवटी (जानेवारी/फेब्रुवारीत ) ही चाचणी आॅन लाईन किंवा आॅफ लाईन द्यावी लागणार आहे. परीक्षा मंडळाच्या वतीने घेतली जाणार असलेली ही चाचणी कलचाचणी असेल की अभिरुची चाचणी असेल असा प्रश्न काही लोकांनी उपस्थित केला आहे. याबाबत प्रत्यक्ष अंमलबजावणी नंतरच नक्की कळू शकेल. प्रारंभीच शंका घेऊन काही निष्पन्न होणार नाही. पण वेळीच दिलेला सावधगिरीचा इशारा एवढे महत्त्व या मुद्याचे जरूर आहे. कल असेल तर अभिरुची निर्माण होईलच, असे नाही. तसे अनुभवही(एक्सपोझर) मिळायला मिळायला हवे असतात. याबाबत शास्त्रीय चर्चा करण्याचे हे स्थळ नव्हे. उपजत क्षमतेचा शिक्षणाने व संस्काराने अधिक चांगल्याप्रकारे  विकास करता येतो. ही काळजी घेतली की, शिक्षण घेताघेता मध्येच ‘लाईन’ बदलण्याची वेळ येत नाही. पण यासाठी निवडलेली ( जानेवारी फेब्रुवारी हे विद्यार्थ्यांचे धांदली गडबडीचे दिवस असतात) वेळ तसेच काही लाख विद्यार्थ्यांची ठरावीक काळात चाचणी व नंतर मोजक्याच असलेल्या तज्ञांचे साह्याने समुपदेशन अशक्य नसले तरी नियोजनाची कसोटी पाहणारे ठरणार आहे.
फेरपरीक्षा - नापास विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा जुलैमध्येच घेऊन निकाल लावायचा व विद्यार्थ्यांना त्याच सत्रात महाविद्यालयात प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध करून द्यायची, ही योजनाही योग्य नियोजन साधता आले व निकाल वेळवर लावता आले, तर चांगली आहे. गेल्या वर्षी अनुत्तीर्ण झालेल्या सुमारे दीड लाख विद्यार्थ्यांपैकी २५ हजार विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ घेता आला व त्यांचे वर्ष वाचले. पुरेशी तयारी झालेली नसल्यामुळे अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी  पुन्हा पुढच्या वर्षी अभ्यास करून परीक्षा द्यावी व पुरती तयारी करावी,  यात वेळ वाया गेला असे समजायचे की आवश्यकतेनुसार खर्च केला असे मानायचे, हा वादाचा विषय आहे.
  कौशल्यविकासासाठी स्वतंत्र विभाग - मेक इन इंडिया हा भारत सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्याला अनुसरून मेक इन महाराष्ट्र हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प महाराष्ट्र शासन हाती घेत आहे. त्यासाठी कौशल्यविकासासाठी स्वतंत्र विभाग स्थापन होत आहे. सध्या तंत्र शिक्षण हा विभाग व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाकडे सोपावलेला आहे. हा तंत्र शिक्षण विभाग आता या नवीन कौशल्यविकास विभागाकडे सोपवण्यात येईल व हा विभाग दस्तूरखुद्द मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत राहील. आपल्या तंत्रशाळा(आय टी आय) आता खुद्द मुख्यमंत्र्यांच्या निगराणीत राहणार असल्यामुळे कात टाकतील व त्यांना नवीन झळाळी प्राप्त होणार, हे नक्की. सध्या तंत्रशाळांची एकूण संख्या सुमारे ९००(नक्की आकडा - ८७१) असून शासकीय व  खाजगी शाळा जवळ पास समसमान (शासकीय -४१७ व खाजगी - ४५४) आहेत.  सध्या एकूण २ लक्ष विद्यार्थी या तंत्र शाळात निरनिराळे ६३ व्यवसाय शिक्षण घेत अाहेत. आॅन लाईन प्रवेश प्रक्रिया, निरनिराळ्या कंपन्यांकडून गुणवत्तावाढीसाठी साह्य हे झळाळीसाठीचे नवीन प्रयत्न असतील एकटी बाॅश ही कंपनी २५ तंत्रशाळांना प्रत्येकी २५ लक्ष रुपये देऊन सेतू(ब्रिज) नावाचा प्रशिक्षणाचा कार्यक्रम राबवणार आहे. यामुळे प्रयोग शाळा अद्ययावत होतील तसेच उद्योगांसाठी आवश्यक असलेले कौशल्ययुक्त मनुष्य बळ निर्माण होईल, यावर भर देतील.
,  मध्येच शिक्षण सोडून देणारेही बरेच आहेत. आता त्यांना प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी बाॅश व टाटा या कंपन्या सहकार्य करतील. रोजगारासाठी तंत्रकौशल्यासोबत इतर कौशल्येही आवश्यक असतात. यात संवादकौशल्य आजची प्रमुख गरज आहे. संगणक साक्षरताच नव्हे तर अन्य व उच्च दर्जाची संगणकीय कौशल्ये आवश्यक झाली आहेत. ग्राहक सेवेसाठीची कौशल्येही हवी असतात. तंत्र कौशल्यासोबत ही कौशल्येही असावीत, ही नवीन अपेक्षा आता निर्माण झाली आहे. रोजगार व स्वयंरोजगार ( सेल्फ एम्पाॅयमेंट) या दोन्ही दृष्टीने १८ ते २५ गटातील ही शिक्षण मध्येच सोडून देणारी मुले सक्षम व्हावीत, ही काळाची गरज आहे. यासाठीच्या ५००० रु शुल्कापैकी प्रशिक्षणार्थीला फक्त ५०० रुपयेच द्यावे लागतील. उरलेले ४.५०० रुपये बाॅश कंपनी कर्जरूपाने बॅंकेमार्फत देईल. कंपन्या प्रत्येकाला लर्नर किटही देतील. कौशल्यासोबत प्रत्यक्षात त्याचा उपयोग करण्यासाठी लागणारी उपकरणे असणे आवश्यक असते. सध्या त्यांचा अभाव ही एक अडचण असते. ती आता दूर होईल. टाटा ट्रस्टही सहयोग देणार आहे. आय टी आयला झळाळी, प्रतिष्ठा व स्वयंरोजगारक्षमता असा तिहेरी उद्देश ठेवून हा प्रकल्प आखला जतो आहे. गिरगाव चौपाटीवरचा मेक इन महाराष्ट्र हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठीची पायाभरणीच या निमित्ताने साकारते आहे.

Saturday, February 6, 2016


ज्युलियन असांज शोधपत्रकार की आणखी कुणी तरी?
वसंत गणेश काणे 
     साडे आठ लक्ष गुप्त कागदपत्रे उजेडात आणणारा, अनेक बड्या धेंडांचे व देशांचे वस्त्रहरण करणारा, १३२६ दिवस इक्वेडोरच्या वकिलातीत १९५ चौरस फूट जागेत आपले कार्यालय व निवासस्थान थाटणारा, रात्रंदिवस वेढा घालून बसलेल्या ब्रिटिश पोलिसदलावर ब्रिटनला लक्षावधी पाऊंड खर्च करायला लावणारा, दोन चित्रपट व एक डाॅक्युमेंटरी यांच्या निर्मितीला कारणीभूत झालेला, चित्र व पत्रसृष्टीतील दिग्गजांचा स्नेह संपादन करणारा जुलियन असांज नक्की आहे तरी कोण? जागल्या( व्हिसल ब्लोअर)? चोर? बलात्कारी ? की आणखी कुणी ? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी अमेरिका, ब्रिटन, स्वीडन, इक्वेडोर, फ्रान्स व युनोची समिती या सगळ्यांच्या भूमिका नुसत्या समजूनच नव्हे तर तपासून पहाव्या लागतील. खरे तर हे काम पोलिसांचे किंवा न्यायव्यवस्थेचे. पण शेवटी प्रत्येकाच्या मनात एक विक्रमादित्य असतोच की. तो स्वत:ही आपले मत बनवीत असतो. ब्रिटनमधील ४४ टक्के लोकांना हे सर्व प्रकरण बनावट व कुभांड स्वरूपाचे वाटते आहे. पण विषय समजून घेण्यासाठी सगळी हकीकत सुरवातीपासून क्रमश: समजून घ्यावी हे बरे. 
  जुलियन असांज हा आॅस्ट्रेलियन नागरिक स्वत:ला शोध पत्रकार म्हणवतो व अनेकांच्या मते तो तसा आहे सुद्धा. एक गाजलेला सायबर योद्धा व विकिलिक्स नावाच्या संकेतस्थळाचा तो संपादक आहे.  अनेक बडी राष्ट्रे विशेषत: अमेरिका गेली पाच वर्षे त्याच्यामागे हात धुवून लागली आहेत. अमेरिकेचे दुहेरी मापदंड असतात, असा या देशावर आरोप आहे. सभ्य, सुसंस्कृत, व्यक्तिस्वातंत्र्यवादी हा अमेरिकेचा एक चेहरा आहे. हा  बुरखा खोटा आहे, हे जुलियन असांजने दाखविले. ‘हा माझा गुन्हा (?) आहे’,  असे अमेरिका मानते, अशी जुलियन असांजची भूमिका आहे. विकिलीक्स हे त्याचे संकेतस्थळ! अमेरिकी सरकारची गोपनीय माहिती त्याने जगजाहीर केली. अमेरिकेच्या दूतावासांनी पाठविलेले संदेश, पत्रे, इराक आणि अफगाणिस्तानातील लष्करी कारवाईच्या संबंधातील गुप्त दस्तऐवज, चित्रफीत हे सर्व त्याने उघड केले व जगभर अमेरिकेची छी थू झाली. त्याच्या एका साथीदाराला - ब्रॅडली तथा चेल्सी मॅनिंगला- पकडून अमेरिकेने ३५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. दुसरा साथीदार एडवर्ड स्नोडेन शिताफीने निसटला व रशियाने त्याला आश्रय दिल्यामुळे  बालबाल बचावला.
असांज स्वीडनमध्ये
 असा हा असांज स्वीडनमध्ये आला. दोन महिलांनी त्याला देशातील निरनिराळ्या कार्यक्रमात जनतेसमोर उभे करून त्याचा परिचयही करून दिला. पाश्चात्यांमध्ये स्त्री पुरूष संबंध किती सैल व स्वैर आसतात, हे सांगायला नको. आपण सुरक्षित संभोगाला संमती दिली असतांना कंडोम न वापरून (किंवा तो मुद्दाम फाडल्यामुळे म्हणा) आपली फसवणूक झाल्याचा एकीचा आरोप आहे. तर दुसरीचे म्हणणे असे आहे की, त्यावेळी आपण झोपेत होतो आणि याचा गैरफायदा असांजने घेतला व असुरक्षित संभोग केला. बेशुद्ध अवस्थेत, झोपेत किंवा नशेत असतांना फसवून संभोग करणे हा स्वीडनमध्ये गुन्हा मानला जातो. सुरवातीला बलात्काराचा आरोप होता, पण तो टिकला नाही म्हणा किंवा आणखी काही म्हणा पण फसवून असुरक्षित संभोग केला व एस टी डी चाचणी करण्यास (लैंगिक रोग आहे किंवा कसे हे तपासण्यास) नकार दिला, हे आरोप आता त्याच्यावर आहेत. हाही स्वीडनमध्ये गुन्हा मानला जातो पण बलात्काराच्या तुलनेत हा सौम्य स्वरूपाचा गुन्हा मानला जातो, तरी त्यासाठी सहा वर्षांच्या कैदेची शिक्षा आहे. यापैकी एकीने यू टर्न घेत असे काही घडलेच नाही, असे म्हटले आहे. असांजला फसवणुकीचा मुद्दा सोडल्यास बाकी घटनाक्रम मान्य आहे. जे झाले ते उभयपक्षी संमतीनेच झाले आहे, असे त्याचे म्हणणे आहे. पण हा सगळा ‘हनी ट्रॅप’ चा (खोट्या आरोपाखाली अडकवण्यासाठी सुंदरीचा वापर करणे) प्रकार आहे, असे त्याचे म्हणणे आहे. पण तरीही तो स्वीडनच्या पोलिसांना शरण जाण्यास व खटल्याला सामोरे जाण्यास तयार आहे. पण अमेरिकेच्या स्वाधीन करणार नाही, अशी जाहीर हमी स्वीडनने द्यावी, अशी त्याची मागणी आहे. अशी हमी देण्यास स्वीडन तयार नाही.
  ब्रिटिश न्यायालयांकडून दिलासा नाही पण इक्वेडोरची साथ.
   गुपचुप ब्रिटनमध्ये आल्यानंतर ब्रिटनही त्याच्या मागे लागले. त्याला प्रथम ताब्यात (डीटेन) घेण्यात आले. आपल्याला हद्दपार करू नये, यासाठी असांज ब्रिटनच्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढला पण केस हरला. त्याचा पासपोर्ट जप्त करण्यात आला. मोठ्या शिपाफीने गुंगारा देऊन त्याने इक्वेडोरच्या वकिलातीत आश्रय मिळवला. ब्रिटनने वकिलातीला वेढा घालून असांजला आमच्या स्वाधीन करा, म्हणून इक्वेडोरला प्रथम सांगून व नंतर धमकावून सुद्धा पाहिले. आम्ही वकिलातीत घुसून असांजला अटक करू शकतो, अशी दर्पोक्तीही करून पाहिली. पण इक्वेडोर टसचे मस व्हायला तयार नाही. दक्षिण अमेरिकेत तुमचे व्यापारी संबंध आहेत, हे विसरू नका, असे सुनवण्यासही त्यांनी कमी केले नाही. स्वीडिश अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी करू द्या, अशी मागणी केली होती पण दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यामध्ये बाचाबाची होऊन हा प्रयत्न फिसकटला. असांज गेली तीन साडेतीन वर्षे एकप्रकारे इक्वेडोरच्या वकिलातीत पण ब्रिटनमध्येच एकप्रकारे नजरकैदत आहे. सध्या विनयभंगाचा दावा दाखल करण्याची मुदत निघून गेली आहे.आणखी पाच वर्षे गेली तर तर बलात्काराचा दावाही करता यायचा नाही. पण या नजरकैदेचा असांजच्या प्रकृतीवर  परिणाम होतो आहे. त्याची रया पार गेली आहे. पण पीळ मात्र कायम आहे. असांजने फ्रान्सकडेही आश्रयासाठी विनंती केली होती. पण तुझ्यावर वाॅरंट आहे, त्यामुळे तुला आश्रय देण्यास आपण असमर्थ आहोत, असे म्हणून फ्रान्सने अंग झटकले आहे.
 संयुक्त राष्ट्रसंघाने दिली साथ
  ब्रिटनची कृती प्रत्यक्षात नजरकैद करण्यासारखीच आहे,त्याला मुक्त करावे, असा अभिप्राय संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका पाच कायदेपंडित सदस्यांच्या मानवाधिकार समिताने (वर्किंग ग्रुप आॅफ आर्बिट्ररी डिटेनशन)  तीन विरुद्ध एक अशा मताधिक्याने दिला आहे. तसेच त्याला ब्रिटन व स्वीडन कडून नुकसानभरपाईही मिळावी, असे म्हटले आहे. एकीने मत दिले नाही कारण ती स्वत: असांजप्रमाणे आॅस्ट्रेलियन आहे. या समितीत मालदिवचे लोकशाहीवादी माजी अध्यक्ष महंमद नाशीद, म्यानमारच्या झुंझार व लोकशाहीवादी नेत्या आॅंग सान स्यू की यांचा समावेश होता. हा निकाल बाहेर येताच असांज गॅलरीत आला आणि त्याने चर्चिलप्रमाणे दोन बोटांनी व्ही' अक्षरासारखी खूण केली व प्रेक्षकांनी एकच जल्लोश केला.आंतरराष्ट्रीय कायदे व नीतीनियम धुडकावून अशाप्रकारे एखाद्या व्यक्तीला पिडले जात आहे काय, याची माहिती संयुक्त राष्ट्रसंघाची ही समिती घेत असते व आपला अभिप्राय देत असते. या समितीचा अहवाल अर्थातच संबंधित देशावर (ब्रिटन) बंधनकारक नसतो. स्वीडन हा निकाल अमान्य केला व ब्रिटनने त्याची ‘हास्यास्पद’, अशा शब्दात संभावना केली. या समितीने आपल्याला दोषी ठरवले तर आपण शरणागती पत्करू, असे असांजने जाहीर केले होते. ‘आतातरी मला जाऊ द्या’, असे आवाहन असांजने ब्रिटन व स्वीडनला केले आहे.  
   जनतेच्या दरबारात असांज 
  असांज इक्वेडोरच्या वकिलातीतून बाहेर पडताच ब्रिटिश पोलिस त्याच्यावर झडप घालणार हे नक्कीआहे. हा स्वत:हून अटक टाळतो आहे, त्याच्यावरील वाॅरंट पाहता त्याला स्वीडनला हस्तांतरित करणे, ही आमची कायदेशीर जबाबदारी आहे, अशी ब्रिटनची भूमिका आहे.असांजने तर अमेरिकेची अब्रूच चव्हाट्यावर आणली आहे. ती काय वाटेल ते झाले तरी त्याला मोकळे सोडणार नाही. त्याच्यावर बलात्काराचा/निदान विनयभंगाचा/ नाही काही तर फसवणुकीचा आरोप आहे. पण हा नुसता आरोपच आहे. त्याची बाजू अजून ऐकली गेलेली नाही.  असांजवर आंतरराष्ट्रीय वाॅरंट आहे. त्यामुळे त्याला पकडणे हे आपले कर्तव्यआहे, असे ब्रिटनला वाटते. ते चूक म्हणता येणार नाही. एखाद्याला संपवायचे असेल तर त्याचे चारित्र्यहनन करायचे, त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, त्याला दहशतवादी ठरवायचे, हा जगातील रूढ शिरस्ता आहे. असांजला अशी अद्दल घडवायची की, शोधपत्रिकारितेचा नाद निदान निम्या लोकांना तरी  सोडून द्यावासा वाटला पाहिजे, असाही बड्या राष्ट्रांचा उद्देश असू शकतो. खरे काय आहे कुणास ठावूक? पण निदान आजतरी जनमत असांजच्या बाजूचे आहे.

Sent from my iPad
                                     ६)  महत्त्वाच्या शासकीय आदेशांचा संक्षिप्त तपशील(६)
                                         ( ५ जानेवारी २००८ पासून १२ डिेसेंबर २००८ पर्यंत )

खाली शासकीय आदेशांचे संकेतांक, संक्षिप्त शीर्षक, व दिनांक दिले आहेत. यांच्या आधारे
अ) हे आदेश आपण शासनाच्या वेबसाईटवर पाहू शकाल किंवा
ब) यांचा क्रमांक ( जसे-५१५,५१६,५१७ असे  सुरवातीला दिले आहेत तसे) व आपला ईमेल पत्ता कळविल्यास त्या पत्त्यावर तो आदेश आम्ही पाठवू शकू.
क) हा तपशील जपून ठेवा, केव्हाही उपयोगी पडू शकेल.
ड) आमचा ईमेल पत्ता प्रत्येक अंकाच्या पहिल्या पानावर दिला आहे.(किंवा kanewasant@gmail.com हाही आपण वापरू शकाल ) मोबाईल क्रमांक - ९४२२८०४४३० हा आहे.
 ००१ ते १२१ क्रमांकाचे आदेश (७ एप्रिल २०१४ पासून  १४ आॅगस्ट २०१५ पर्यंतचे आहेत)
 १२२ ते २४६ क्रमांकाचे आदेश (४ एप्रिल २०१२ पासून  २८ मार्च   २०१४ पर्यंतचे आहेत)
२४७ ते ३५१ क्रमांकाचे आदेश (२ फेब्रुवारी २०१० पासून  ९ फेब्रुवारी २०११ पर्यंतचे आहेत)
३५२ ते ४३७ क्रमांकाचे आदेश (१० फेब्रुवारी २०११ पासून २० मार्च २०१२ पर्यंत आहेत)
४३८ ते ५१४ क्रमांकाचे आदेश   ( १३ जानेवारी २००९ पासून १ फेब्रुवारी २०१०पर्यंत आहेत)  
५१५ ते ५६९ क्रमांकाचे आदेश  ( ५ जानेवारी २००८ पासून  १२ डिसेंबर २००८ पर्यंतचे आहेत)    

५१५) 20080110160342001 १  ते ७ च्या नैसर्गिक वाढीच्या तुकड्यांना मान्यता ५ जाने २००८
५१६) 20080116163219001  मदरशांचे आधुनिकीकरण  १५ जानेवारी २००८
५१७) 20080304125923001  शिक्षणसेवक रिक्त पदे तातडीने भरणे  ४ मार्च २००८
५१८) 20080317144629001 शाळांना परवानगी सर्वोच्च न्यायालय निर्णय  १७ मार्च २००८
५१९) 20080318114858001  अंध शिक्षकांना वाचन भत्ता १८ मार्च २००८
५२०) 20080328221330001 शालेय पोषण आहार योजना वजन काटे व मोजपट्टी खरेदी २८ मार्च २००८
५२१) 20080401132456001  शिक्षण सेवकांची रिक्त पदे भरणे १ एप्रिल २००८
५२२) 20080404133103001 नियुक्ती बाबत कार्यवाही १९७७ च्या कायदा व १९८१ नियमावलीनुसार कारवाई ४ एप्रिल २००८
५२३) 20080408154642001 शासनमान्य विनाअनुदानित माध्यमिक शाळेंतील शिक्षकांना निवृत्तीवेतन योजना1966-अंशदायी भव ८ एप्रिल २००८
५२४) 20080408155430001 शाळांचे मूल्यांकन ८ एप्रिल २००८
५२५) 20080417112239001 अशासकीय अनुदानित माध्यमिक शाळांच्या वेतनेत्तर अनुदान निर्धारण १७ एप्रिल २००८
५२६) 20080424113201001 आंतरवासिता कालावधीत डि एड छात्राध्यापकास विदयावेतन मंजूरीबाबत २३ एप्रिल २००८
५२७) 20080430111218001 प्राथमिक शिक्षण सेवक निवड - भरतीपूर्व केद्रीय निवड परीक्षा लागू करण्याबाबत ३० एप्रिल २००८
५२८) 20080430111943001 प्राथमिक शिक्षण सेवक वा शिक्षक संवगातील रिक्त पदे भरण्याबाबत  ३० एप्रिल २००८
५२९) 20080502171024001 प्राथमिक शिक्षण सेवक वा शिक्षक संवर्गातील रिक्त पदे भरणे  २ मे २००८
५३०) 20080507165208001 कायम विनाअनुदान तत्वावर प्राथमिक वा माध्यमिक वा उच्च माध्यमिक शाळांचे प्रस्ताव स्वीकारणे ७ मे २००८
५३१) 20080522124219001 माहितीचा अधिकार नामफलक लावणे  २२ मे २००८
५३२) 20080529125151001  माध्यमिक शाळांना देय तुकडयांची यादी २९ मे २००८
५३३)  20080530160747001 आदीवासी क्षेत्रातील मान्यताप्राप्त विनाअनुदानित माध्यमिक शाळांच्या मुल्यांकनानुसार अनुदानपात्र शाळांची यादी ३० मे २००८
५३४) 20080602112956001  प्राथमिक शिक्षण सेवक भरतीमध्ये डि.एड (इंग्रजी माध्यम) उमेदवारांकरिता 20% टक्के जागा २ जून २००८
५३५) 20080603112036001 ठेव विमा योजना  ३ जून २००८
५३६) 20080607161950001 विद्यार्थी संख्येअभावी बंद पडलेल्या तुकड्यांचे समायोजन ७ जून २००८
५३७) 20080610150639001 राज्यातील विदयार्थ्यासाठी राजीव गांधी विदयार्थी सुरक्षा अपघात विमा योजना  १० जून २००८
५३८) 20080612102733001 सा 2008-09 या वर्षी प्राथमिेक शिक्षण सेवक भरती प्रक्रिया भरती पूर्व केद्रीय परीक्षा  १२जून २००८
५३९) 20080617114736001 युद्धात मृत्यू किंवा अपंगत्व प्राप्त व्यक्तीच्या कुटुंबातील एकास नियुक्ती १७ जून २००८
५४०) 20080618151015001 केंद्र प्रमुखांची पदे पदोन्नतीने भरण्याबाबत  १८ जून २००८
५४१) 20080618151643001 प्राथमिक शिक्षकांना 24 वर्षाच्या सेवेनंतर निवडश्रेणी लागू करणे व उच्च शैक्षणिक अर्हता प्राप्त करण्याबाबत  १८ जून २००८
५४२) 20080624104130001 वस्तीशाळा स्वयंसेवकांना वस्तीशाळांचे रुपांतरीत झालेल्या नियमित प्राथमिक शाळेंत कंत्राटी नेमणूक २३ जून २००८
५४३) 20080626162720001  इयत्ता 11 वी चे प्रवेश देताना क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळविणा-या विद्यार्थ्यांना 5 टक्के जागा २६ जून २००८
५४४) 20080627122400001  मान्यताप्राप्त अनुदानित उच्च माध्यमिक शाळांमधील अतिरिक्त विषयास अनुदान मंजूर करणे २७ जून २००८
५४५) 20080627200337001  विविध मंडळांतून इयत्ता 10 वी ची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थ्यांच्या गुणांमध्ये समानीकरण २७ जून २००८
५४६) 20080709143757001 सेवानिवृत्ती वेतनाबाबत ९ जुलै २००८
५४७) 20080709150120001 मा उच्च न्यायालय मुंबई यांचे आदेशानुसार श्री पाठक यांना देय रक्कम अदा करण्याबाबत  ९ जुलै २००८
५४८) 20080709152935001 नवीन अभ्यासक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये समाजाचा सहभाग निश्चित करण्याबाबत ९ जुलै२००८
५४९) 20080724113635001 अल्पसंख्याक प्रि मॅट्रिक शिष्यवृत्ती  २३ जुलै २००८
५५०) 20080801115725001 प्राथमिक शाळेंतील शिक्षकांना देण्यात येणार्‍या अशैक्षणिक कामाबाबत १ आॅगस्ट २००८
५५१) 20080808153000001 राष्टीय शालेय मध्यान्ह भोजन कार्यक्रम ही केंद्र पुरस्कृत योजना इयत्ता 6 वी ते 8 वी याठी ८ आॅगस्ट २००८
५५२) 20080814120114001 शिक्षणमंडळावर अशासकीय पदांवर  नियुक्ती  २४ जुलै २००८
५५३) 20080826113936001 राज्यातील 1625 वस्तीशाळांचे प्राथमिक शाळेंत रुंपांतरण करणेबाबत २६ आॅगस्ट २००८
५५४) 20080826113936001 राज्यातील 1625 वस्तीशाळांचे प्राथमिक शाळेंत रुंपांतरण करणेबाबत २६ आॅगस्ट २००८
५५५) 20080828132603001 वस्तीशाळां स्वयंसेवकांना वस्तीशाळांचे रुंपांतरीत झालेल्या नियमित प्राथमिक शाळेंत कंत्राटी नेमणूक २३ जून २००८
५५६) 20080828141415001 वस्ती शाळांचे प्राथमिक शाळेत रुपांतर  २७ मार्च २००८
५५७) 20080915120508001  गाव पातळीवरील प्राथमिक वा माध्यमिक शाळेंच्या स्तरावर कॉपी विरोधी अभियान सुरु करणे ११ सप्टेंबर २००८
५५८) 20081001162851001 महाराष्ट्र खाजगी शाळां : नियम 1981 आरक्षण  १ आॅक्टोबर २००८
५५९) 20081020175744001 शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करणे कायम करणे वेतनश्रेणी व अन्य अडचणी दूर करणे २० आॅक्टोबर २००८
५६०) 20081022122732001  प्राथमिक शिक्षण सेवक पदावरील भरतीपूर्व केंद्रीय निवड परिक्षा  २० आॅक्टोबर २००८
५६१) 20081115160729001 प्राथमिक शिक्षण सेवक पदावरील भरतीपूर्व केंद्रीय निवड परिक्षा १५ नोव्हेंबर २००८
५६२) 20081115160729001 प्राथमिक शिक्षण सेवक पदावरील भरतीपूर्व केंद्रीय निवड परिक्षा १५ नोव्हेंबर २००८
५६३) 20081115160729001 शिक्षण सेवक भरती गुणवत्ता यादी जाहीर कर णे १५ नोव्हेंबर २००८
५६४) 20081117122227001   मान्य कार्यभारानुसार नवीन शिक्षक वा शिक्षकेतर कर्मचा-यांची देय व अनुज्ञेय पदे निर्माण करणे १७ नोव्हेंबर २००८
५६५) 20081117161830001 इयत्ता 9 वी व 11वी च्या विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षणाचे धडे १७ नोव्हेंबर २००८
५६६) 20081126132901001 शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करणे कायम करणे वेतनश्रेणी व अन्य अडचणी दूर करण्यासाठी २५ नोव्हेंबर २००८
५६७) 20081202173320001शिक्षण सेवकांचे मुलाखती वा भरतीसाठी जिल्हा परिषदा वा नगरपालिका आदी २ डिसेंबर २००८
५६८) 20081212163710001 प्रा. शिक्षण सेवक - भरतीपूर्व केंद्रीय निवड परीक्षा मुलाखती १२ डिसेंबर २००८
५६९) 20081212163710001 शिक्षणसेवक भरती १२ डिसेंबर २००८

                                      ५)  महत्त्वाच्या शासकीय आदेशांचा संक्षिप्त तपशील(५)
                                         ( १३ जानेवारी २००९ पासून १ फेब्रुवारी २०१०पर्यंत )

खाली शासकीय आदेशांचे संकेतांक, संक्षिप्त शीर्षक, व दिनांक दिले आहेत. यांच्या आधारे
अ) हे आदेश आपण शासनाच्या वेबसाईटवर पाहू शकाल किंवा
ब) यांचा क्रमांक ( जसे ४३८,४३९,४४० सुरवातीला दिले आहेत तसे) व आपला ईमेल पत्ता कळविल्यास त्या पत्त्यावर तो आदेश आम्ही पाठवू शकू.
क) हा तपशील जपून ठेवा, केव्हाही उपयोगी पडू शकेल.
ड) आमचा ईमेल पत्ता प्रत्येक अंकाच्या पहिल्या पानावर दिला आहे.(किंवा kanewasant@gmail.com हाही आपण वापरू शकाल ) मोबाईल क्रमांक - ९४२२८०४४३० हा आहे.
 १ ते १२१ क्रमांकाचे आदेश (७ एप्रिल २०१४ पासून  १४ आॅगस्ट २०१५ पर्यंतचे आहेत)
 १२२ ते २४६ क्रमांकाचे आदेश (४ एप्रिल २०१२ पासून  २८ मार्च   २०१४ पर्यंतचे आहेत)
२४७ ते ३५१ क्रमांकाचे आदेश (२ फेब्रुवारी २०१० पासून  ९ फेब्रुवारी २०११ पर्यंतचे आहेत)
३५२  ते   ४३७ क्रमांकाचे आदेश (१० फेब्रुवारी २०११ पासून २० मार्च २०१२ पर्यंत आहेत)
४३८  ते  ५१४ क्रमांकाचे आदेश   ( १३ जानेवारी २००९ पासून १ फेब्रुवारी २०१०पर्यंत आहेत)                    

४३८) 20090113153559001 सेवानिवृत्तिवेतनासाठी अशासकीय सेवा ग्राह्य १३ जानेवारी २००९
४३९) 20090217161431001 शाळांचे स्थलांतर धोरण १७ फेब्रुवारी  २००९
४४०) 20090211130551001 आदिवासीक्षेत्रातील शाळांना अनुदान ११ फेब्रुवारी २००९
४४१) 20090204163833001 शिक्षकेतर पदे अनुज्ञेय करणे ६ फेब्रुवारी २००९
४४२) 20090210174319001 अल्पसंख्यांकांच्या शाळांच्या पायाभूत विकासासाठी योजना  १० फेब्रुवारी २००९
४४३) 20090210170920001मदरशात गुणवत्तापूर्ण शिक्षण  १० फेब्रुवारी २००९
४४४) 20090224132902001संच मान्यतेत सुसूत्रता २४ फेब्रुवारी २००९
४४५) 20090220182015001 महानगर, नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती  २० फेब्रुवारी २००९
४४६) 20090218211418001शाळेत मोबाईल आणण्यावर बंदी १८ फेब्रुवारी २००९
४४७) 20090317162228001अधिकृत शाळेतून परीक्षेस बसण्याची अनुमती  १७ मार्च २००९
४४८) 20090317165622001 संस्कृत पाठशाळांच्या पुस्तक खरेदी अनुदानात वाढ १७ मार्च २००९
४४९) 20090313111816001 शिक्षकेतर पदे अनुज्ञेय करणे १३ मार्च २००९
४५०) 20090307142305001 विनाअनुदानित संच मान्यता, वैयक्तिक मान्यता, सेवापुस्तक, वरिष्ठ व निवडश्रेणी  ७ मार्च २००९
४५१) 20090309115236001 तुकड्या टिकवण्यासाठी किमान विद्यार्थी संख्या ७ मार्च २००९
४५२) 20090319143651001 बंद तुकड्यांचे समायोजन २ फेब्रुवारी २००९
४५३) 20090521135311001 मानसशास्त्रीय चाचण्या  ४ मे २००९
४५४) 20090502164349001 सुधारित मूल्यमापन पद्धती २ मे २००९
४५५) 20090330130616001 शिष्यवृत्ती परीक्षा पुनर्रचना  ३० मार्च २००९
४५६) 20090326124934001 नि:शुल्क शिक्षण  २६ मार्च२००९
४५७) 20090522115525001 अनुदानपात्र शाळांची यादी  २२ मे २००९
४५८) 20090505132913001 मुख्याध्यापकपदासाठी आरक्षण  ५ मे २००९
४५९) 20090508190215001 शिक्षण शुल्क वाढ नियंत्रण ८ मे २००९
४६०) 20090505115854001 नागरिकांची सनद ५ मे २००९
४६१) 20090530123034001 आदीवासी क्षेत्रातील तुकड्यांना अनुदान २९ मे २००९
४६२) 20090529140114001 शिक्षकपदे निश्चित करण्याचे निकष २९ मे २००९
४६३) 20090525131340001 खाजगी प्राथमिकमध्ये शिक्षणसेवक योजना लागू न करणे २५ मे २००९
४६४) 20090525191549001 सर्व शाळात मराठीचे शिक्षक २५ मे २००९
४६५) 20090612183514001 कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन संरचना १२ जून २००९
४६६) 20090606135451001 डि एड इंग्रजी माध्यम २० टक्के जागा राखून ठेवणे ६ जून २००९
४६७) 20090602124444001 सी  बी एस ई शाळातील विद्यार्थ्यांच्या दाखल्यावर प्रतिस्वाक्षरी २ जून २००९
४६८) 20090601205518001  शालेय पोषण आहार योजना - भरारी पथके १ जून २००९
४६९) 20090616154350001 शिक्षकांचे मासिक वेतन प्रगती अहवाल १६ जून २००९
४७०) 20090619170842002 जि प शिक्षकांच्या बदल्या १५ जून २००९
४७१) 20090612121751001 संच निश्चिती १२ जून २००९
४७२) 20090623203901001 शालेय पोषण आहार योजना सुधारणा १८ जून २००९
४७३) 20090623205734001 ११ वी प्रवेश प्रमाण ठरविणे १८ जून २००९
४७४) 20090714144012001 गुणवत्ताधारक खेळाडूंना नोकरीत आरक्षण  १४ जुलै २००९
४७५) 20090713182018001 ६० अनुदानपात्र तुकड्या १३ जुलै २००९
४७६) 20090709153109001 नवीन पेंशन योजना  ३० जून २००९
४७७) 20090728144758001 गणित व विज्ञान विषय इंग्रजी माध्यमातून शिकवणे २८ जुलै२००९
४७८) 20090701143108001 अनुदान हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ २९ जून २००९
४७९) 20090727130801001 इंग्रजी माध्यमाच्या शाळांना अनुमती २७ जुलै २००९
४८०) 20090724182710001 शिक्षण मंडळावर अशासकीय सदस्यांची नेमणूक २४ जुलै २००९
४८१) 20090720171423001 कायम विनाअनुदानित शाळा अनुदानावर आणणे  २० जुलै २००९
४८२) 20090718183002001  स्थानिक स्वराज्य संसेथांनी माध्य, उच्च शाळा सुरू करणे १८ जुलै २००९
४८३) 20090805130806001 नैसर्गिक वाढीच्या तुकड्यांना मान्यता  ५ आॅगस्ट २०१५
४८४) 20090804164351001 विनाअनुदानित अल्पसंख्यांकांच्या संस्था - आरक्षण नाही  ४ आॅगस्ट २००९
४८५) 20090803123628001 उच्च माध्य वाढीव पदांना मान्यता ३ आॅगस्ट २००९
४८६) 20090801162230001 वस्ती शाळेतील स्वयंसेवकांना निमशिक्षक म्हणून नियुक्ती ३१ जुलै २००९
४८७) 20090728140606001 विद्यार्थी अपघात विमा योजना २८ जुलै२००९
४८८) 20090813173334001 पूर्णवेळ शिक्षकांना सुधारित वेतन संरचना  १३ आॅगस्ट २००९
४९०) 20090813181645001 पाठक यांना ६६९२- २००६ उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वेतन देणे १३ आॅगस्ट २००९
४९१) 20090807130935001 सीबीएसई आदींसाठी नाहरकत प्रमाणपत्र  ७ आॅगस्ट २००९
४९२) 20090806162450001 बी एड आदीसाठी प्रवेश प्रक्रिया  ६ आॅगस्ट२००९
४९३) 20090807134129001 सेमी इंग्लिश माध्यम गणित व विज्ञानासाठी ६ आॅगस्ट २००९
४९४) 20090824192900001 उर्दू माध्यमाच्या शाळांना अनुमती  २४ आॅगस्ट २००९
४९५) 20090825150720001 इंग्रजी माध्यमाच्या खाजगी प्राथमिक शाळांना अनुमती  २० आॅगस्ट २००९
४९६) 20090818153724001 प्राथमिक शिक्षण सेवक भरतीसाठी निवड परीक्षा १८ आॅगस्ट २००९
४९७) 20090818213413001 इंग्रजी माध्यमाच्या खाजगी प्राथमिक शाळांना अनुमती १८ आॅगस्ट २००९
४९८) 20090818134527001 १०वी अनुत्तीर्ण एटाकेटी सवलत १७ आॅगस्ट२००९
४९९) 20090827154259001 अन्य माध्यमांच्या माध्य शाळांना अनुमती २७ आॅगस्ट २००९
५००) 20090831170849001 अपंग समावेशीत शिक्षण योजना  ३१ आॅगस्ट २००९
५०१) 20090902150116001 गुणसमानीकरण योजना रद्द करणे  २ सप्टेंबर २००९
५०२) 20091110171258001 शिक्षकेतरांची अनुज्ञेय पदे १० नोव्हेंबर २००९
५०३) 20091107172511001 शिक्षकेतरांची अनुज्ञेय पदे समांतर आरक्षण ७ नोव्हेंबर २००९
५०४) 20091027184355001अपघात सुरक्षा योजना २७ आॅक्टोबर २००९
५०५) 20091103131945001 शाळेतील सुरक्षा ३ नोव्हेंबर २००९
५०६) 20091104165847001 अर्धवेळकर्मचारी सुधारित वेतन संरचना  ४ नोव्हेंबर २००९
५०७) 20091020172727001 प्राथमिक शाळा सरक्षा योजना  २० आॅक्टोबर २००९
५०८) 20091125132630001 शाळात अग्निशमन व्यवस्था २७ नोव्हेंबर २००९
५०९) 20091121143112001  प्रतीक्षा यादीतून पदे भरणे २० नोव्हेंबर २००९
५१०) 20091112140104001  घरभाडे भत्ता  १२ नोव्हेंबर २००९
५११)20091217141637001 शिक्षणसेवकांची निवड  १६ डिसेंबर २००९
५१२) 20100120143204001 शालेय पोषण योजना स्वयंपाकघर २० जानेवारी२०१०
५१३) 20100121164311001 संस्थेत वाद मुख्याध्यापक नियुक्ती २१ जानेवारी २०१०  
५१४) 20100202175909001 केंद्र प्रमुखांच्या भरतीची टक्केवारी २ फेब्रुवारी २०१०    


                         ४)  महत्त्वाच्या शासकीय आदेशांचा संक्षिप्त तपशील(४)
                           ( १० फेब्रुवारी २०११ पासून २० मार्च २०१२ पर्यंत )

खाली शासकीय आदेशांचे संकेतांक, संक्षिप्त शीर्षक, व दिनांक दिले आहेत. यांच्या आधारे
अ) हे आदेश आपण शासनाच्या वेबसाईटवर पाहू शकाल किंवा
ब) यांचा क्रमांक (३५२, ३५३, ३५४, ३५५ सुरवातीला दिले आहेत तसे) व आपला ईमेल पत्ता कळविल्यास त्या पत्त्यावर तो आदेश आम्ही पाठवू शकू.
क) हा तपशील जपून ठेवा, केव्हाही उपयोगी पडू शकेल.
ड) आमचा ईमेल पत्ता प्रत्येक अंकाच्या पहिल्या पानावर दिला आहे.(किंवा kanewasant@gmail.com हाही आपण वापरू शकाल ) मोबाईल क्रमांक - ९४२२८०४४३० हा आहे.
 १ ते १२१ क्रमांकाचे आदेश (७ एप्रिल २०१४ पासून  १४ आॅगस्ट २०१५ पर्यंतचे आहेत)
 १२२ ते २४६ क्रमांकाचे आदेश (४ एप्रिल २०१२ पासून  २८ मार्च   २०१४ पर्यंतचे आहेत)
२४७ ते ३५१ क्रमांकाचे आदेश (२ फेब्रुवारी २०१० पासून  ९ फेब्रुवारी २०११ पर्यंतचे आहेत)
३५२  ते   ४३७ क्रमांकाचे आदेश (१० फेब्रुवारी २०११ पासून २० मार्च २०१२ पर्यंतचे आहेत)

३५२) 20110210191408001  आहारात आयर्नच्या गोळ्या  १० फेब्रुवारी २०११
३५३) 20110215184840001 विनाअनुदानित तुकड्या अनुदानावर आणणे  १५ फेब्रुवारी २०११
३५४) 20110217212451001  वेतन व भविष्यनिर्वाह निधी  १७ फेब्रुवारी २०११
३५५) 20110217213439001  आॅनलाईन संच मान्यता १७ फेब्रुवारी २०११
३५६) 20110221154510001  अर्धवेळ ग्रंथपालाचे पद पुनर्जीवित करणे  २१ फेब्रुवारी २०११
३५७) 20110301144855001  scanning
३५८) 20110301145818001 शाळा प्रवेश
३५९) 20110301151858001   २००९ चा कायदा मुलांना शारीरिक व मानसिक त्रास  १ मार्च २०११
३६०) 20110301152823001  विमा
३६१) 20110301155119001  १९८१ च्या सेवाअटींची प्रभावी अंमलबजावणी  १ मार्च  २०११
३६२) 20110304200019001  आदीवासी शाळेत तुकड्यांना अनुदान  ४ मार्च २०११
३६३) 20110304205050001  वर्ग खोली बांधणे  ४मार्च २०११
३६४) 20110316153613001  नैसर्गिक वाढीच्या वाढीव तुकड्या १४ मार्च २०११
३६५) 20110323154017001 वाढीव पदांना मान्यता १४ मार्च २०११
३६६) 20110324173325001 अनधिकृत शाळेतील विद्यार्थ्यांची परीक्षा अधिकृत शाळेत घेणे  २४ मार्च २०११
३६७) 20110325172256001 मुलांना गणवेश २५ मार्च २०११
३६८) 20110328110741001 गणित व सांख्यिकीचे प्रात्यक्षिक तास व त्यामुळे वाढीव पदे १४ मार्च २०११
३६९) 20110331121114001  पुस्तकपेढी योजना  २८ मार्च २०११
३७०) 20110331194649001 ६० शाळांना अनुदान वितरण ३१ मार्च २०११
३७१) 20110401130314001 ११ वीच्या तुकड्यांना अनुदानवितरण ३१ मार्च २०११
३७२) 20110401142149001 प्राथमिक शाळेतील शिक्षकेतरांची पदे १ एप्रिल २०११
३७३) 20110401190938001 २००९चा अधिनियम १ एप्रिल २०११
३७४) 20120404055333433001   वर्ग अनुदानपात्र ठरविणे ४ एप्रिल २०१२
३७५) 20110409163030001 स्वयंअर्थसहाय्यित शाळांना अनुमती अधिनियम ८ एप्रिल २०११
३७६) 20110429133952001  कामाचे दिवस, शिक्षणाचे तास व आठवड्याचे कामाचे तास  २९ एप्रिल २०११
३७७) 20110530165247001 १५ जूनपासून शाळा सुरू करणे ३०मे २०११
३७८) 20110530174901001  शिक्षण सेवक  गुणानुसार भरती ३० मे २०११
३७९) 20110531134224001  आहारात मायक्रोन्युट्रियंट पुरविणे  ११ मार्च २०११
३८०) 20110601105030001 बी पी एड अभ्यासक्रमासाठी अनुदान सूत्र  १ जून २०११
३८१) 20110604171815001 कायम विनाअनुदानित इंग्रजी माध्यमाच्या शाळांना अनुमती  २ जून २०११
३८२) 20110610105055001  एम सी व्हि सी नाही डि एड प्रवेश १० जून २०११
३८३) 20110613125933001  शिक्षक पुरस्काराच्या रकमेत वाढ  १३ जून २०११
३८४) 20110629173107001 स्वयंपाकघर प्लिंथ एरिया ३१ मार्च  २०११
३८५) 20110711145749001 अपघात विमा योजना ११ जुलै२०११
३८६) 20110712115620001 हस्तांतरणाला स्थगिती  १२जुलै २०११
३८७) 20110716143523001 शिक्षकेतर पदभरती निर्बंध मुदत वाढ  १६ जुलै २०११
३८८) 20110722150657001  शिक्षणसेवक भरती  २२ जुलै २०११
३८९) 20110729154000001  शाळांसाठी बृहत आराखडा २९ जुलै२०११
३९०) 20110903105000001 शाळांसाठी मास्टर प्लॅन  २ सप्टेंबर २०११
३९१) 20110907587984001  शिक्षणविषयक कायदे अद्ययावत करण्यासाठी समिती  ७ सप्टेंबर २०११
३९२) 20110912173124001 ने-आण करणाय्रा बसेस  १४ सप्टेंबर २०११
३९३) 20110914105541001  पूर्वप्राथमिक केंद्रातील प्रवेश व शुल्क  १५ सप्टेंबर २०११
३९४) 20110917144511001  शिक्षणसेवकांच्या मानधनात वाढ  १७ सप्टेंबर २०११
३९५) 20110927151656001 वस्तीशाळात निमशिक्षक म्हणून नियुक्ती  २७ सप्टेंबर २०११
३९६) 20110928063034001 शिक्षण सेवक नियुक्ती २८ सप्टेंबर २०११
३९७) 20110929105953001  शालेय पोषण आहार योजना प्रोटीन फूड पुरविणे  २९ सप्टेंबर २०११
३९८) 20110929110245001 शालेय पोषण आहार योजना नोंद वह्या  २९ सप्टेंबर २०११
३९९) 20111004063014001 शालेय पोषण आहार योजना मायकोन्युक्रियंट पुरविणे ४ आॅक्टोबर २०११
४००) 20111005114851001 Anapan meditation 5th October 2011
४०१) 20111005191541001 शाळात आनापन वर्ग सुरू करणे  ५ आॅक्टोबर २०११
४०२) 20111015123255001 रत्नागिरी व सिंधूदुर्ग साठी कोकण विभागीय शिक्षण मंडळ  १५. आॅक्टोबर २०११
४०३) 20111021115246001  शालेय पोषण आहार योजना खर्चाचे सुधारित दर  २१ आॅक्टोबर २०११
४०४) 20111109144732001 वैयक्तिक मान्यतेचा निकाल संबंधितांना देणे  ९ नोव्हेंबर २०११
४०५) 20111111114204001  बी एड ना प्रशिक्षित समजणे ११ नोव्हेंबर २०११
४०६) 20111115392905001 अनुदानासाठी मूल्यांकनाचे निकष लागू करणे  १५ नोव्हेंबर २०११
४०७) 20111115392905001विनाअनुदानितांना अनुदान सूत्र लागू करणे १५ नोव्हेंबर २०११
४०८) 20111117061856001  बालकांचा मोफत शिक्षण नियमावली ११ आॅक्टोबर २०११
४०९) 20111117070217001बालकांचे मोफत शिक्षण नियमावली इंग्रजी प्रत ११ आॅक्टोबर २०११
४१०) 20111119042538001  अनुकंपास्तरावर नियुक्ती झालेल्यांना पत्रद्वारे प्रशिक्षण १९ नोव्हेंबर २०११
४११) 20111119042538001 अनुकंपा तत्त्वरील शिक्षकांना पत्रद्वारे प्रशिक्षण १९ नोव्हेंबर २०११
४१२) 20111121052600001 उच्चमाध्यमिक शाळांसाठी बृहत आराखडा  २१ नोव्हेंबर २०११
४१३) 20111121052600001 उच्चमाध्यमिक साठी बृहत आराखडा २१ नोव्हेंबर २०११
४१४) 20111121093137001 वर्ग अनुदानित ठरविणे  २१ नोव्हेंबर २०११
४१५) 20111121093137001प्राथमिकचे वर्ग अनुदानास पात्र मानणे २१ नोव्हेंबर २०११
४१६) 20111122123525001 कायदे अद्ययावत करणे २२ नोव्हेंबर २०११
४१७) 20111130143055001 २५ गुणांची सवलत उत्तीर्ण होण्साठीच देणे  ३० नोव्हेंबर २०११
४१८) 20111207105535001 २००९ च्या कायद्यानुसार अतिरिक्त पदे मंजूर करणे ७ डिसेंबर २०११
४१९) 20111216095151001 शारीरिक शिक्षण महाविद्यालयात सहावा वेतन आयोग लागू करणे  २४ नोव्हेंबर २०११
४२०) 20111216095151001 शारीरिक शिक्षण महाविद्यालयांना वेतनआयोगाच्या शिफारसी लागू  २४ नोव्हेंबर २०११
४२१) 20111221143011001 बाहेरील विद्यापीठाची बी एड पदवी ग्राह्य ठरविणे  २१ डिसेंबर २०११
४२२) 20111223133033001 विनाअनुदानित वर्ग अनुदानपात्र ठरविणे २३ डिसेंबर २०११
४२३) 20111230123025001  ११ वीची आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया ३० डिसेंबर २०११
४२४) 20120127230602001  मित्र उपक्रम २७ जानेवारी २०१२
४२५) 20120319052350001 खाजगी प्राथमिक शाळेत शिक्षण सेवक योजना लागू न करणे १९ मार्च २०१२
४२६) 20140816171511382 स्थानिक स्वराज्य संस्थांना उर्दू माध्यमाच्या शाळा सुरू करण्याची अनुमती १३ आॅगस्ट २०१२
४२७) 20150421145049302।  क्रीडा सवलत वाढीव गुण  २१ एप्रिल २०१५
४२८) 201206141007110500  राज्याचे क्रीडा धोरण  १४ जून २०१२
४२९) 20120206072815215001 नियुक्त्या, मान्यता, पदोन्नती मार्गदर्शक सूचना  ६ फेब्रुवारी २०१२
४३०) 20120206100853253001 वैद्यकीय प्रतिपूर्ती  ३ फेब्रुवारी प२०१२
४३१) 20120209061334234001 पूर्वमाध्यमिक परीक्षेतील उत्तर पत्रिका ओ एम आर पद्धतीने तपासणे ८ फेब्रुवारी २०१२
४३२) 20120217091345247001  शाळा संहितेतील नियम १२.१ ते १२.५ मध्ये सुधारणा  १७ फेब्रुवारी २०१२
४३३) 20120224122114214001 अर्धवेळ कर्मचारी वेतन सुधारणा  २४ फेब्रुवारी २०१२
४३४) 20120309054539339001  खाजगी प्राथमिक शाळेत विनाअनुदानित तुकड्या ९ मार्च २०१२
४३५) 20120313054516316001 नीलिमा सुर्वे प्रकरणी ३२९४ (२०१० ) तातडीने कारवाई १३ मार्च २०१२
४३६) 20120316120722322001  ११ वीचे आॅन लाईन प्रवेश १६ मार्च २०१२
४३७) 20120320103129329001 शालेय पोषण आहार नोंद वही २० मार्च २०१२

                                   ३)  महत्त्वाच्या शासकीय आदेशांचा संक्षिप्त तपशील(३)
                                        (२ फेब्रुवारी २०१० पासून ९ फेब्रुवारी २०११ पर्यंत )
खाली शासकीय आदेशांचे संकेतांक, संक्षिप्त शीर्षक, व दिनांक दिले आहेत. यांच्या आधारे
अ) हे आदेश आपण शासनाच्या वेबसाईटवर पाहू शकाल किंवा
ब) यांचा क्रमांक (२४७, २४८, २४९ २५०  सुरवातीला दिले आहेत तसे) व आपला ईमेल पत्ता कळविल्यास त्या पत्त्यावर तो आदेश आम्ही पाठवू शकू.
क) हा तपशील जपून ठेवा, केव्हाही उपयोगी पडू शकेल.
ड) आमचा ईमेल पत्ता प्रत्येक अंकाच्या पहिल्या पानावर दिला आहे.मोबाईल क्रमांक - ९४२२८०४४३० हा आहे.
 १ ते १२१ क्रमांकाचे आदेश (७ एप्रिल २०१४ पासून  १४ आॅगस्ट २०१५ पर्यंतचे आहेत)
 १२२ ते २४६ क्रमांकाचे आदेश (४ एप्रिल २०१२ पासून  २८ मार्च   २०१४ पर्यंतचे आहेत)
२४७ ते ३५१ क्रमांकाचे आदेश (२ फेब्रुवारी २०१० पासून  ९ फेब्रुवारी २०११ पर्यंतचे आहेत)

२४७) 20100202144059001  पूर्वप्राथमिक अभ्यासक्रम  २ फेब्रुवारी २०१०
२४८) 20100202175909001  (2) केंद्र प्रमुखाची पदे स्पर्धा परीक्षेने  २ फेब्रुवारी २०१०
२४९) 20100203145324001  पत्रद्वारे डि एड  ४ फेब्रुवारी २०१०
२५०) 20100209172839001  श्री पाठक प्रकरण रिट ६६९२- २००६  ९ फेब्रुवारी २०१०
२५१) 20100210160203001  शालेय पोषण आहार योजना डेटा एंट्री  १० फेब्रुवारी २०१०
२५२) 20100215163710001  निवड परीक्षेद्वारे शिक्षणसेवकांची निवड  १५ फेब्रुवारी २०१०
२५३) 20100215175903001  उच्चमाध्यमिक वर्गांना अनुमती  १५ फेब्रुवारी २०१०
२५४) 20100215203000001  शालेय पोषण आहार योजना भांडी पुरविणे  १६ फेब्रुवारी २०१०
२५५) 20100220174814001 शाळांचे प्रस्ताव न स्वीकारणे २० फेब्रुवारी २०१०
२५६) 20100224173734001 अक्षमता असलेल्यांना  १२ वीत जादा गुण  २४ फेब्रुवारी २०१०
२५७) 20100224180844001 घटस्फोट प्रकरणी वडलांऐवजी आईचे नाव २४ फेब्रुवारी २०१०
२५८) 20100225191410001 सर्वोत्तम ५ योजना २५ फेब्रुवारी २०१०
२५९) 20100226142646001 शालेय पोषण आहार योजना -धान्य पुरवठा  २६ फेब्रुवारी २०१०
२६०) 20100304204547001 फी वाढ करू नयेला स्थगिती  ४ मार्च २०१०
२६१) 20100305153416001  शालेय पोषण आहार योजना  ५ मार्च २०१०
२६२) 20100306193017001  मुख्याध्यापकीचे सेवा निवृत्ती वेतन  ६ मार्च २०१०
२६३) 20100308193711001  १८० दिवस प्रसूती रजा  ८ मार्च २०१०
२६४) 20100325154056001  ११ वीत प्रवेश २५ मार्च २०१०
२६५) 20100325170216001  ११वीत प्रवेश कला व क्रीडाक्षेत्रातील प्रावीण्यधारक २५ मार्च २०१०
२६६) 20100331161738001  शालेय पोषण आहार  आयर्न पुरविणे  ३१ मार्च २०१०
२६७) 20100401194112001  ८६५५- २००९ विनाअनुदानित तत्त्वावर अनुमती  १ एप्रिल  २०१०
२६८) 20100401194112001  कायम विनाअनुदानित रिट ८६५५-२००९ १ एप्रिल २०१०
२६९) 20100405144109001 अधिकृत शाळेतून परीक्षेला बसण्याची अनुमती  ३ एप्रिल २०१०
२७०) 20100412184854001 सुधारित सेवानिवृत्ती वेतन योजना  ९ एप्रिल२०१०
२७१) 20100429161318001 संलग्नतेसाठी नाही हरकत प्रमाणपत्र  २९ एप्रिल २०१०
२७२) 20100429170946001 १०,११,१२ वी शी समकक्ष परीक्षा  २९ एप्रिल २०१०
२७३) 20100430141613001  शिक्षणसेवकांसाठी निवड परीक्षा  २९ एप्रिल २०१०
२७४) 20100506154936001  इमारत भाडे ३० मार्च २०१०
२७५) 20100506154936001  नगरपरिषदेच्या शाळांचे भाडे   ३० मार्च २०१०
२७६) 20100506172107001  शिक्षणसेवक भरतीसाठी निवड परीक्षा ६ मे २०१०
२७७) 20100511143824001  बालकांचा मोफत व सक्‍तीच्‍या शिक्षणाचा कायदा लागू करणे १० मे २०१०
२७८) 20100521143858001  सुधारित वेतन संरचना लागू करणे  २१ मे २०१०
२७९) 20100524194017001  संगणक शुल्क निश्चित करणे  २१ मे २०१०
२८०) 20100526131938001  कायम शब्द वगळणे  २६ मे २०१०
२८१) 20100528174923001   बी एड; बी पी एड ला प्रवेश ७ जून २०१०
२८२) 20100529143235001  विनाअनुदानितला अनुमती २८ मे २०१०
२८३) 20100604184318001  उर्दू माध्यमाच्या शाळांना अनुमती   ४ जून २०१०
२८४) 20100604184801001  मराठी माध्यमांच्या शाळांना अनुमती   ४ जून २०१०
२८५) 20100607153437001  संकेतस्थळावर निकाल जाहीर करणे  ७ जून २०१०
२८६) 20100607154046001  ११वीचे आॅनलाईन प्रवेश  ७जून २०१०
२८७) 20100607160632001  शाळा सोडण्याच्या दाखल्यावर प्रतिस्वाक्षरी  २८ मे २०१०
२८८) 20100609152316001  ११वीचे इंग्रजी माध्यमाची वर्गवाढ  ९ जून २०१०
२८९) 20100609152716001  ११वीचे प्रवेश २ व ३ कलाक्षेत्र व क्रीडा क्षेत्रासाठी राखून ठेवणे ९ जून २०१०
२९०) 20100609161618001 शाळांचे स्थलांतर ९ जून २०१०
२९१) 20100609163201001  संगणकीय प्रणालीद्वारे संच मान्यता  ९ जून २०१०
२९२) 20100610163026001 शिक्षकेतर पदभरतीस प्रतिबंध  १० जून २०१०
२९३) 20100611143443001 वाढीव शिक्षकपद मान्यता १० जून २०१०
२९४) 20100611160504001  बालकांचा मोफत व सक्‍तीच्‍या शिक्षणाचा अधिकार - शाळाप्रवेश  ११ जून २०१०
२९५) 20100614132432001 Rest-5 योजना १४ जून २०१०
२९६) 20100614171712001  अतिरिक्त वाढीव तुकड्यांना मान्यता  १४ जून २०१०
२९७) 20100615185707001  बालकांचा मोफत व सक्‍तीच्‍या शिक्षणाचा अधिकार - शिक्षक प्रशिक्षित होणे १४ जून २०१०
२९८) 20100616185545001 बालकांचा मोफत व सक्‍तीच्‍या शिक्षणाचा अधिकार अनुत्तीर्ण विद्यार्थी १६ जून २०१०
२९९) 20100616201847001 ११ वीत प्रवेश १६  जून २०१०
३००) 20100617142023001 बालकंचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार १७ जून २०१०
३०१) 20100618174630001  शिक्षकपद निश्चिती  १८ जून २०१०
३०२) 20100619151419001  शुल्कवाढ स्थगिती १९ जून २०१०
३०३) 20100622181804001  शालेय परिसर तंबाखूजन्य पदार्थापासून मुक्त करणे १४ जून २०१०
३०४) 20100623162354001 अनधिकृत शाळांवर कारवाई १९ जून २०१०
३०५) 20100629211948001 शालेय पोषण आहार योजना आपत्ती व्यवस्थापन २९ जून २०१०
३०६) 20100630161504001 शालेय पोषण आहार - खर्चाची नोंदवही पुरविणे  ३० जून २०१०
३०७) 20100715203142001 कायम निनाअनुदानित मधील शुल्क निश्चिती  १५ जुलै २०१०
३०८) 20100716140328001  क्रीडा सवलतीचे गुण देण्याबाबत १६ जुलै २०१०
३०९) 20100716193344001 ११वी प्रवेश क्रीडा सवलतीचे गुण देणे १६ जुलै २०१०
३१०) 20100722150650001  शिष्यवृत्तीच्या दरात वाढ व सुधारणा  २२ जुलै २०१०
३११) 20100722213025001   खुल्या वर्गातील अतिरिक्ताचा समायोजन अनुसूचित मध्ये न करणे  २२ जुलै २०१०
३१२) 20100726173900001 डी एड मध्ये इंग्रजी माध्यमासाठी २० टक्के जागा राखून ठेवणे २२ जुलै २०१०
३१३) 20100730173255001  ५४ शाळांना अनुदानास पात्र घोषित करणे ३० जुलै २०१०
३१४) 20100731184450001 संच मान्यता  ३१ जुलै २०१०
३१५) 20100731192214001  ५६ शाळांना अनुदानास पात्र घोषित करणे  ३० जुलै २०१०
३१६) 20100806160950001 कायम शब्द वगळून यादी तयार करणे  ४ आॅगस्ट २०१०
३१७) 20100810122327001  मुख्याध्यापकाची नियुक्ती, वेतनश्रेणी, निवृत्ती वेतन विषयक प्रस्ताव तयार करण्याचे अधिकार ९ आॅगस्ट २०१०
३१८) 20100810191630001  माध्यमिक शिक्षण मंडळावर शिक्षक सदस्याची नियुक्ती  १० आॅगस्ट २०१०
३१९) 20100811171513001 विनाअनुदानित तत्त्वावर उच्चमाध्यमिकचे वर्ग  ११ आॅगस्ट २०१०
३२०) 20100820135218001  कायम विनाअनुदानितसाठी प्रस्ताव  २० आॅगस्ट २०१०
३२१) 20100820155815001   शालेय पोषण आहार मुलांना शुद्ध पाणी २० आॅगस्ट २०१०
३२२) 20100820191348001  वर्ग १ ते ८ साठी मूल्यमापन पद्धती  २० आॅगस्ट २०१०
३२३) 20100824132553001  पालक-शिक्षक संघाची स्थापना २४ आॅगस्ट २०१०
३२४) 20100827191059001 रिट पिटिशन  ५२७९- २००९   ३ जून २०१०
३२५) 20100901121027001 विनाअनुदानित तुकड्यांना अनुदान  २५ जून २०१०
३२६) 20100921175026001  पीठासीन अधिकाय्रांची नियुक्ती  ४ सप्टेंबर २०१०
३२७) 20100928133201001  नैसर्गिक वाढीच्या तुकड्यांना मान्यता   २४ सप्टेंबर २०१०
३२८) 20100930140520001  पर्यायी शिक्षकांना डी एड दुसय्रा वर्षात प्रवेश ३० सप्टेंबर २०१०
३२९) 20101004141241001 वैद्यकीय प्रतिपूर्ती  ४ आॅक्टोबर २०१०
३३०) 20101013130316001  अनुदानाचे टप्पे निश्चित करणे  १२ आॅक्टोबर २०१०
३३१) 20101014202206001 शिक्षण मंडळ १९७७   ५८, ५९, ६२, १०९ मधील फेरबदलास मान्यता  १३ आॅक्टोबर २०१०
३३२) 20101014202823001 आदिवासी क्षेत्रातील ४ माध्यमिक शाळा अनुदानपात्र घोषित करणे १४ आॅक्टोबर २०१०
३३३) 20101014205014001  शाळांना मान्यता व संलग्निकरण  १४ आॅक्टोबर २०१०
३३४) 20101015175638001 आरक्षित पदावर अन्य उमेदवारांचे समायोजन न करणे १५ आॅक्टोबर २०१०
३३५) 20101015194953001  साक्षर भारत योजना कार्यान्वयित करणे १५ आॅक्टोबर २०१०
३३६) 20101018194142001  शिक्षण मंडळ नियम  ५५, ५६, ५७, १०२, १०३, १०४  १६ आॅक्टोबर १६ आॅक्टोबर २०१०
३३७) 20101022174110001  शिक्षक नियुक्तीचे वेळीचे वय क्षमापित करणे २१ आॅक्टोबर २०१०
३३८) 20101029143334001 जनगणनेसाठी बदली रजा २९ आॅक्टोबर २०१०
३३९) 20101029183103001 वस्तीशाळा निमशिक्षकाचे मानधनात वाढ २९ आॅक्टोबर २०१०
३४०) 20101030184752001  तुकड्यांना अनुदान वितरण  ३०आॅक्टोबर २०१०
३४१) 20101102135933001  पत्रद्वारा प्रशिक्षणाला मुदतवाढ  २ नोव्हेंबर २०१०
३४२) 20101109135038001  नियमावली २००९ साठी हरकती ९ नोव्हेंबर २०१०
३४३) 20101120125015001  विनाअनुदानित तुकड्यांना अनुदान  ३० आॅक्टोबर २०१०
३४४) 20101203182707001 शिक्षण मंडळ १९७७ ५९(४) व ७९(६अ) व (६ब) हे नवीन नियम ३ डिसेंबर २०१०
३४५) 20101216150321001  शिक्षण अर्हतेची समकक्षता  १६ डिसेंबर २०१०
३४६) 20110113202133001 माध्यमिक शाळांना अनुदान  १३ जानेवारी २०१०
३४७) 20110121180824001 अपंगांना आरक्षण २१ जानेवारी  २०११
३४८) 20110202193350001 शालेय आहार योजना खर्चदरात सुधारणा  २ फेब्रुवारी २०११
३४९) 20110204182258001 विद्यार्थ्यांना मोफत गणवेश  ४ फेब्रुवारी २०११
३५०) 20110207182208001 द्विलक्षी अभ्यासक्रमात सुधारणा  ७ फेब्रुवारी २०१०
३५१) 20110209154033001  शाळाधिकरण नाशिक व लातूर नियुक्ती  ९ फेब्रुवारी २०११



२) महत्त्वाच्या शासकीय आदेशांचा संक्षिप्त तपशील
                      (४ एप्रिल २०१२ ते २८ मार्च २०१४ )
(क्रमांक १२२ ते २४६)
खाली शासकीय आदेशांचे संकेतांक, संक्षिप्त शीर्षक, व दिनांक दिले आहेत. यांच्या आधारे
अ) हे आदेश आपण शासनाच्या वेबसाईटवर पाहू शकाल किंवा
ब) यांचा क्रमांक (१२२,१२३,१२४,१२५ सुरवातीला दिले आहेत तसे) व आपला ईमेल पत्ता कळविल्यास त्या पत्त्यावर तो आदेश आम्ही पाठवू शकू.
क) हा तपशील जपून ठेवा, केव्हाही उपयोगी पडू शकेल.
ड) आमचा ईमेल पत्ता प्रत्येक अंकाच्या पहिल्या पानावर दिला आहे.मोबाईल क्रमांक - ९४२२८०४४३० हा आहे.
१ ते १२१ क्रमांकाचे आदेश (७ एप्रिल २०१४ पासून  १४ आॅगस्ट २०१५ पर्यंतचे आहेत)

१२२) 20120404055333433001  विनाअनुदानित वर्ग अनुदानपात्र ठरविणे  ४ एप्रिल २०१२
१२३) 20120412140157457001  महागाई भत्त्यात सुधारणा १२ एप्रिल २०१२
१२४) 20120421114353453001  देणगी घेण्यावर प्रतिबंध २१ एप्रिल २०१२
१२५) 20120503091721521001  ३ ते ५ आॅक्टोबर दरम्यानच्या पटपडताणीनुसार कारवाई  २ मे २०१२
१२६) 2012052115220353001  इ सी एस द्वारे वेतन वितरण  २१ मे २०१२
१२७) 20120523122340540001  मागास भागात माॅडेल स्कूल व गर्ल्स होस्टेल  २३ मे २०१२
१२८) 20120528155758558001  बंद तुकड्यांचे समायोजन  २५ मे २०१२
१२९) 20120530171249549001  दुर्बल घटकांना प्राथमिकमध्ये प्रवेश  २५ मे २०१२
१३०) 201206141007110500  राज्याचे क्रीडा धोरण  १४ जून  १४ जून २०१२
१३१) 201206150506160500  नवीन शाळांना मान्यता १४ जून २०१२
१३२) 201206200859120500  नवीन इंग्रजी शाळांना ना हरकत प्रमाणपत्र  २० जून २०१२
१३३) 201207191323300500 पदोन्नतीनंतरची वेतन निश्चिती  १९ जुलै २०१२
१३४) 201207271443250500  पत्रद्वारा प्रशिक्षण योजनेस मुदतवाढ  २७ जुलै २०१२
१३५) 201208031623371301 इलेक्ट्राॅनिक्स पद्धतीने वेतन ३ आॅगस्ट २०१२
१३६) 201208171417000500 क्रीडा तासिकांची प्रभावी अंमलबजावणी  २२ आॅगस्ट २०१२
१३७) 201208171635200500 नैसर्गिक वाढीच्या व अतिरिक्त तुकड्यांना मंजुरी  १६ आॅगस्ट २०१२
१३८) 201208221117420500  अनधिकृत शाळांवर कारवाई   २० आॅगस्ट २०१२
१३९) 201208241537410500 शालेय पोषण आहार योजना सुधारित दर १७ आॅगस्ट २०१२
१४०) 201208271557330500 बृहतआराखड्यानुसार मराठी शाळा सुरू करणे  २७ आॅगस्ट २०१२
१४१) 201208311645220500  इलेक्ट्राॅनिक वेतन प्रणालीनुसार वेतन अदा करणे  ३१ आॅगस्ट २०१२
१४२) 201209011636040500 सीमाभागात मराठी माध्यमाच्या शाळा सुरू करणे  १ सप्टेंबर २०१२
१४३) 201209211144420500 विद्यार्थ्यांना आधार कार्ड  २७ सप्टेंबर २०१२
१४४) 201209281639080500  कायम विनाअनुदान तत्त्वावर इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळा  २५ सप्टेंबर २०१२
१४५) 201210011528440500 शाळांचे स्थालांतरण   ९ जून २०१२
१४६) 201210121435541121  प्रशासकाची नियुक्ती  १५ आॅक्टोबर २०१२
१४७) 201210171116109121 अध्यापक विद्यालयांना या पुढे संलग्नता न देणे  १७ आॅक्टोबर २०१२
१४८) 201210191259188921  शालेय पोषण आहार जमाखर्च नोंदवही  १९ आॅक्टोबर २०१२
१४९) 201210191259188921 शालेय पोषण आहार जमाखर्च नोंदवही पुरविणे  १९ नोव्हेंबर २०१२
१५०) 201210191300295221 शालेय पोषण आहार लोकरीच्या आसनपट्ट्या १९ आॅक्टोबर २०१२
१५१) 201211011052537221  अध्यापक विद्यालयांची तपासणी  १ नोव्हेंबर २०१२
१५२) 201211011052537221 अध्यापक विद्यालयांची तपासणी  १ नोव्हेंबर २०१२
१५३) 201211021210122921 अनुदान पात्र शाळांची यादी  २ नोव्हेंबर  २०१२
१५४) 201211021210122921 सुधारित मूल्यांकनानुसार यादी  २ नोव्हेंबर २०१२
१५५) 201211021319559121  नैसर्गिक वाढ व तुकड्यांना मंजुरी  २ नोव्हेंबर २०१२
१५६) 201211021319559121 नैसर्गिक व अतिरिक्त तुकड्या  २ नोव्हेंबर २०१२
१५७) 201211031216152521  बँकाना हमीपत्राद्वारे सूट  ३ नोव्हेंबर २०१२
१५८) 201211031216152521  हमीपत्रापासून सूट  ३ नोव्हेंबर २०१२
१५९) 201211051618106221  शालार्थद्वारे वेतन  ७ नोव्हेंबर  २०१२
१६०) 201211051618106221 नगर परिषद कर्मचारी शालार्थद्वारे वेतन  ७ नोव्हेंबर २०१२
१६१) 201211221252494921 निवृत्तिवेतनाबाबतची जाहिरात  २२  नोव्हेंबर २०१२
१६२) 201211231113393921  शालेय पोषण आहार स्वयंपाक घर बांधणे  २१ नोव्हेंबर २०१२
१६३) 201212041529322421  शिष्यवृत्ती शुल्कात वाढ  ३ डिसेंबर  २०१२
१६४) 201212051708446021  ग्रामीण भागात विनाअनुदानित वर्ग  ५ डिसेंबर २०१२
१६५) 201212291500050021  शालार्थ मार्फत वेतन करणे २९ डिसेंबर २०१२
१६६) 201301051454317021 खेळाडूंना नोकरीत आरक्षण ५ जानेवारी २०१३
१६७) 201301081437057221  विनाअनुदानित वर्ग अनुदानित करणे   २१ डिसेंबर २०१२
१६८) 201301191244464921  पाच टक्के वेतनेतर अनुदान  १९ जानेवारी २०१३
१६९) 201301211423500821  विनाअनुदानित वर्ग अनुदानित करणे  २१ जानेवारी २०१३
१७०) 201301241732432821 शालार्थ मार्फत वेतन  २४ जानेवारी २०१३
१७१) 201301291217057221  संविधानाचे वाचन  ४ फेब्रुवारी २०१३
१७२) 201302131419250821  प्राथमिक शिक्षणाची व्याख्या  १३ फेब्रुवारी २०१३
१७३) 201302221521374021  बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण  २२ फेब्रुवारी २०१३
१७४) 201303041042399821  प्राथमिक शिक्षकांना  वरिष्ठ व निवडश्रेणी लागू करणे  १ मार्च २०१३
१७५) 201303161520450121  अकरावीतील जात प्रमाणपत्र पडताळणी  १३ फेब्रुवारी २०१३
१७६) 201303191709393821  कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांसाठी डी एच ई ही अर्हता ग्राह्य धरणे १९ मार्च २०१३
१७७) 201303301034570621 शाळाबाह्य मुलांना शाळेत आणणे व टिकवून ठेवणे  २८ मार्च २०१३
१७८) 201304201639256821 शाळा तपासणीसाठी फिरती पथके  १८ एप्रिल २०१३
१७९) 201304201648587221 शाळेची मान्यता रद्द करणे १८ एप्रिल २०१३
१८०) 201304261149048421  बृहत आराखड्यात नवीन ठिकाणांचा समावेश  २६ एप्रिल २०१३
१८१) 201305031559398521 शाळाबाह्य कामे करणाय्रा शिक्षकांना मूळ शाळेत नियुक्त करणे ३ मे २०१३
१८२) 201305211143373621  शाळा प्रारंभाचा दिनांक  २० मे २०१३
१८३) 201305231539245621 शाळाबाह्य कामे करणाय्रा शिक्षकांना मूळ शाळेत  नियुक्त करणे  २२ मे २०१३
१८४) 201305271616581321 देहविक्रय करणाय्राच्या व तृतीयपंथीयांच्या मुलांना प्रवेश  २७ मे २०१३
१८५) 201306071529524121  प्रवेशोत्सवाचे आयोजन  ७ जून  २०१३
१८६) 201306141616257921  शालेय पोषण आहार  १४ जून २०१३
१८७) 201306171507083621 नवीन खाजगी शाळांना मान्यता  १७ जून २०१३
१८८) 201306181043036421  शिक्षण सेवकाचा ३ वर्ष कालावधी वरिष्ठ वेतनसाठी ग्राह्य धरणे  १७ जून २०१३
१८९) 201306191506547121 शालेय पोषण आहार  आयर्न व फाॅलिक ॲसिड १९ जून २०१३
१९०) 201306201023179321 मराठी माध्यमाच्या शाळेत गणित व विज्ञान इंग्रजी भाषेतून  १९ जून २०१३
१९१) 201306291714070421 शालेय पोषण आहार व्यवस्थापन खर्च २९ जून २०१३
१९२) 201306291714390821 शालेय पोषण आहार खर्च मान्यता २९ जून २०१३
१९३) 201306291715027721 शाळेतील मूलभूत सुधारणांबाबतचे निकष २९ जून २०१३
१९४) 201307111445423121 शारारिक शिक्षण महाविद्यालयांचे अनुदान बंद ११ जुलै २०१३
१९५) 201307171255208321  कायम शब्द वगळलेल्यांना अनुदान १६ जुलै २०१३
१९६) 201307241236202921 वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती २४ जुलै २०१३
१९७) 201307311228388021 शाळांचे स्थलांतर ३१ जुलै २०१३
१९८) 201308081458053821 शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे अनुदान बंद करणे  ८ आॅगस्ट २०१३
१९९) 201308201536015421  शिक्षकाची शैक्षणिक वव्यावसायिक मान्यता २० आॅगस्ट २०१३
२००) 201308201706195121शालेय पोषण आहार योजना  २० आॅगस्ट २०१३
२०१) 201308201706195121शालेय पोषण आहार योजना  २० आॅगस्ट २०१३
२०२) 201309061727167921 नैसर्गिक वाढीच्या  व अतिरिक्त तुकड्या ३ सप्टेंबर २०१३
२०३) 201309211323468321 खेळाडूंना  नोकरीत आरक्षण  २० सप्टेंबर २०१३
२०४) 201309261456552821 उर्दू माध्यमाच्या प्राथमिक शाळा सुरू करणे  २५ सप्टेंबर २०१३
२०५) 201310011305437821 अपघात विमा योजना  १ आॅक्टोबर २०१३
२०६) 201310031648516221 खेळाडूंना नोकरीत आरक्षण  ३ आॅक्टोबर २०१३
२०७) 201310071137589621 स्वयंअर्थसहाय्यित शाळा ५ आॅक्टोबर २०१३
२०८) 201310211446134221 विनाअनुदानित शाळा अनुदानास पात्र ठरविणे  २१ आॅक्टोबर २०१३
२०९) 201310221728433721 मुलांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण  २३ आॅक्टोबर २०१३
२१०) 201310231749128921  स्वयंअर्थसहाय्यित शाळा  १८ आॅक्टोबर २०१३
२११) 201310281337418821 शिक्षकेतर कर्मचारी सुधारित आकृतीबंध  २३ आॅक्टोबर २०१३
२१२) 201311081049244421  वैद्यकीय प्रतिपूर्ती तपासणी समिती  ७ नोव्हेबर २०१३
२१३) 201311141250400121 शिक्षण सेवकांची निवड व तक्रारी  १४ नोव्हेंबर २०१३
२१४) 201311141302531221 शिक्षक पात्रता परीक्षा  १४ नोव्हेंबर २०१३
२१५) 201311141545022821 पदे निश्चित करण्यासाठीचा दिनांक  १४ नोव्हेंबर २०१३
२१६) 201311181159410521 विद्यार्थ्यांसाठी बस व्यवस्था   १८ नोव्हेंबर २०१३
२१७) 201311211203315921 नवीन तुकड्या मंजुरी, सुरू ठेवणे, टिकवणे  २० नोव्हेंबर २०१३
२१८) 201311261432163721 विनाअनदानित तत्त्वावर मान्यता २५ नोव्हेंबर २०१३
२१९) 201311261541581421 विद्यार्थ्यांसाठी बस व्यवस्था  २६ नोव्हेंबर २०१३
२२०) 201312021007504521 विनाअनुदानितास अनुदान  ३० नोव्हेंबर २०१३
२२१) 201312061244143321 शालेय पोषण आहार  ६ डिसेंबर २०१३
२२२) 201312301716493021 खेळाडूंना नोकरीत आरक्षण ३० डिसेंबर २०१३
२२३) 201401021152320521 बलकाचा मोफत शिक्षण हक्क अधिनियम २००९ ३१ डिसेंबर २०१३
२२४) 201401021540253121 पटसंख्येनुसार पदे  १३ डिसेंबर २०१३
२२४) 201401281434464721  पटसंख्येनुसार पदे  २७ जानेवारी २०१४
२२५) 201401291133338121 वेतनेतर अनुदान २९ जानेवारी २०१४
२२६) 201402031608137921 स्वयंअर्थसहाय्यित शाळा ३० जानेवारी २०१४
२२७) 201402071700139621  बृहत आराखडा व मराठी शाळा  ७ फेब्रुवारी २०१४
२२८) 201402101209366321 विनाअनुदानित अनुदानित ठरविणे ७ फेब्रुवारी २०१४
२२९) 201402111149065321 विनाअनुदानितला नैसर्गिक तुकड्या मंजूर करणे  ७ फेब्रुवारी २०१४
२३०) 201402171224094421 स्वयंअर्थसहाय्यित शाळा स्थापन करणे १४ फेब्रुवारी २०१४
२३१) 201402251258252421 प्राथमिकला मोफत गणवेश २५ फेब्रुवारी २०१४
२३२) 201402251258252421 मोफत गणवेश योजना  २५फेब्रुवारी २०१४
२३३) 201402261712010121 कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना सुधारित वेतनश्रेणी  २६ फेब्रुवारी २०१४
२३४) 201402261722463921 कायम अनुदानितमधील कायम शब्द वगळणे २६ फेब्रुवारी २०१४
२३५) 201402281115404221 विनाअनुदानितला अनुदानासाठी पात्र ठरविणे  २८ फेब्रुवारी २०१४
२३६) 201402281124019921 स्वयंअर्थसहाय्यित शाळा  २६ फेब्रुवारी २०१४
२३७) 201402281625595021 शालेय पोषण आहार योजना मुख्याध्यापकांची जबाबदारी कमी करणे  २६ फेब्रुवारी २०१४
२३८) 201402281733558521 शालेय पोषण आहार योजना २८ मार्च  २०१४
२३९) 201403011636232121 वस्ती शाळातील शिक्षकांना समाविष्ट करणे १ मार्च २०१४
२४०) 201403011711428821 विनाअनुदानित  शाळांना अनुदान  १ मार्च २०१४
२४१) 201403011712491521 कायम अनुदानित शाळांना अनुदानासाठी पात्र ठरविणे १ मार्च २०१४
२४२) 201403031701400721 स्वातंत्र्यपूर्वकाळात स्थापन संस्थांना मदत  ३ मार्च २०१४
२४३) 201403041421210221 स्वयंअर्थसहाय्यित शाळा  ४ मार्च २०१४
२४४) 201403061524295521 सिंगापूर प्रणालीचा अभ्यास ५ मार्च २०१४
२४५) 201403271543149821 १९८१ सेवाअटी कलम ९  २७ मार्च २०१४
२४६) 201403281212464221 शालेय पोषण आहार  २८ मार्च २०१४

            १)  महत्त्वाच्या शासकीय आदेशांचा संक्षिप्त तपशील
                      (७ एप्रिल २०१४ ते १४ आॅगस्ट २०१५)
खाली शासकीय आदेशांचे संकेतांक, संक्षिप्त शीर्षक, व दिनांक दिले आहेत. यांच्या आधारे
अ) हे आदेश आपण शासनाच्या वेबसाईटवर पाहू शकाल किंवा
ब) यांचा क्रमांक (१, २, ३, ४ सुरवातीला दिले आहेत तसे) व आपला ईमेल पत्ता कळविल्यास त्या पत्त्यावर तो आदेश आम्ही पाठवू शकू.
क) हा तपशील जपून ठेवा, केव्हाही उपयोगी पडू शकेल.
ड) आमचा ईमेल पत्ता प्रत्येक अंकाच्या पहिल्या पानावर दिला आहे.मोबाईल क्रमांक - ९४२२८०४४३० हा आहे.

१) 201404111523449121  शासनाला पत्रे पत्रे शिक्षण आयुक्तामार्फत पाठविण्याबाबत  ७एप्रिल २०१४
२) 201404211456078921। तक्रार निवारण यंत्रणा  २१ एप्रिल २०१४
३) 201404221752214221वाढीव पदांना मान्यता  २२ एप्रिल २०१४
४) 201404291817564521  मानधनावर क्रीडा शिक्षक  २८ एप्रिल २०१४
५) 201404301106199421  विनाअनुदानितला अनुदान पात्र ठरविणे  ३० एप्रिल २०१४
६) 201405061645164821 वरिष्ठ व निवडश्रेणी ६ मे २०१४
७) 201405261702341221 वाढीवपदांना मान्यता  २१ मे २०१४
८) 201405301535427821 इबीसी उत्पन्न मर्यादा  ३०मे २०१४
९) 201405301643245121 न्यायाधिकरण पिठासीन अधिकारी  ३० मे २०१४
१०) 201406021613569121 जि प शाळा वाॅटर फिल्टर व क्लिप पॅड  २ जून २०१४
११) 201406041626129721 मूल्यांकनाचे निकष ४जून २०१४
१२) 201406061603557121  शालांचे स्थलांतर किंवा हस्तांतरण ५ जून २ जून २०१४
१३)201406191446275521सेवानिवृत्तीविषयक लाभ वेळेवर मिळणे १८ जून २०१४
१४) 201406201806388721 वैयक्तिक मान्यता २०जून २०१४
१५)201406271539038021विनाअनुदानित माध्य ला अनुदान  २७जून २०१४
१६) 201406301158322121माध्य ला नवीन तुकड्या  २७ जून २०१४
१७) 201406301743441521कायमविनाअनुदानितला अनुदान  ३०जून २०१४
१८)201407011055348821  विनाअनुदानितला अनुदान  ३०जून२०१४
१९)201407011632244421  विनाअनुदानित प्राथमिकला अनुदान  ३०जून२०१४
२०) 201407031700024321 स्वयंअर्थसहाय्यित शाळा  ३० जून२०१४
२१) 201407041348445621  नगरपालिकांना माध्य.शाळा ३ जुलै २०१४
२२) 201407141618231521११ वी च्या जादा तुकड्या  ११ जुलै २०१४
२३) 201407151140231721११ वी च्या जादा तुकड्या   ११ जुलै २०१४
२४) 201407161132258321  शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती  १६ जुलै २०१४
२५) 201407191712266221  शिक्षक मान्यता  १९ जुलै २०१४
२६) 201408011733221821  स्वयंअर्थसहाय्यित शाळा  २१ जुलै २०१४
२७) 201408131253094621  ११ वीच्या अतिरिक्त तुकड्या १३ आॅगस्ट २०१४
२८) 201408131253477221  ११वीच्या जादा तुकड्या  १३ आॅगस्ट २०१४
२९) 201408141127420521  शालेय पोषण आहार Other Health Intervention  १४ आॅगस्ट २०१४
३०) 201408141640333621  मान्यतेसाठी  मूल्यांकनासाठी सुधारित निकष  १४ आॅगस्ट  २०१४
३१) 20140816171511382    स्थानिक स्वराज्य संस्थांना उर्दू माध्यमाच्या शाळा सुरू करण्याची अनुमती १३ आॅगस्ट २०१४
३२) 201408191555314821  विनाअनुदानित शाळांना अनुदान  १९  आॅगस्ट२०१४
३३) 201408191606002621  विनाअनुदानित शाळांना अनुदान  १९ आॅगस्ट १४
३४) 201408201456220321  वैयक्तिक मान्यता  २० आॅगस्ट २०१४
३५) 201408201804299721  मोफत शिक्षणाचा अधिकार २००९ प्राधिकरणाची कर्तव्ये  २० आॅगस्ट २०१४
३६) 201408211108389521   व्यवसाय शिक्षण योजना  २१ आॅगस्ट  २०१४
३७) 201408211242446821 ११ वीच्या विनाअनुदानित तुकड्या  २१ आॅगस्ट २०१४
३८)  201408211720532721  अंशकालीन निदेशकांची नियुक्ती  २१ आॅगस्ट २०१४
३९) 201408261750216021  मूल्यांकनानुसार अनुदान  २६ आॅगस्ट  २०१४
४०) 201408271532187021  ११ वीच्या जादा तुकड्या २५ आॅगस्ट २०१४
४१) 201408281243352621  स्वयंअर्थसहाय्यित शाळांना अनुमती  २८ आॅगस्ट २०१४
४२) 201408281245116821  स्वयंअर्थशासित शाळांना अनुमती   २८ आॅगस्ट २०१४
४३) 201409021610077421  स्थानिक स्वराज्य संस्थांना माध्यमिक शाळा सुरू करण्याची परवानगी  २ सप्टेंबर २०१४
४४) 201409041750074121  राज्यपुपस्कारपात्रांना दोन अगावू वेतनवाढी  ४ सप्टेंबर २०१४
४५) 201409041808365021  शिक्षक भारतीला मान्यता  ४ सप्टेंबर २०१४
४६) 201409111100239021। स्वयंअर्थसहाय्यित शाळा १० सप्टेंबर २०१४
४७) 201409121450552321  विनाअनुदानतत्त्वावर ११ वीच्या तुकड्या १० सप्टेंबर २०१४
४८) 201409121457003921  विनाअनुदानित तत्त्वावर ११ वी च्या तुकड्या १० सप्टेंबर २०१४
४९) 201409151529307821  शैक्षणिक पात्रता परीक्षा  कार्यपद्धती ९ सप्टेंबर २०१४
५०) 201409151536165421  शिक्षक अधिवेशनास उपस्थिती १५ सप्टेंबर २०१४

५१) 201409161119043421  शैक्षणिक पात्रता परीक्षा  ९ सप्टेंबर २०१४
५२) 201410131405464621 पटपडताळणी मोहीम  १३ आॅक्टोबर २०१४
५३) 201410181229454021  उच्चमाध्यमिक वाढीव पदे  १८  आॅक्टोबर २०१४
५४) 201410281252236421 शालेय पोषण आहार  २८ नोव्हेंबर २०१४
५५) 201410311433085821  महानगरपालिका कर्मचारी वेतन  ३१ आॅक्टोबर  २०१४
५६) 201411201213521521  स्वयंअर्थसहाय्यित शाळा  २० नोव्हेंबर २०१४
५७) 201411251652146121 दप्तराचे ओझे २५ नोव्हेंबर २०१४
५८) 201411261125099321   उच्चमाध्यमिकमधील वाढीवपदांना मान्यता   २६ नोव्हेंबर २०१४
५९) 201411281227412921। अतिरिक्त शिक्षक समायोजन २८ नोव्हेंबर  २०१४
६०) 201411281518117821  उच्चमाध्यमिक वाढीव पदांना मान्यता  २८ नोव्हेंबर २०१४
६१) 201412031244150921  शिक्षक पात्रता परीक्षा अपरिहार्य  ३ डिसेंबर २०१४
६२) 201412051043059021  प्लास्टिक ध्ज वापरू नका  ५ डिसेंबर २०१४
६३) 201501151441138321 महिला तक्रार निवारण कक्ष १४ जानेवारी २०१५
६४) 201501191704208321  शाळा प्रवेश किमान वय २१ जानेवारी २०१५
६५) 201501201206289521 प्रथम प्रवेश स्तर  २१ जानेवारी २०१५
६६) 201501231709356421 शाळा प्रवेश किमान वय २३ जानेवारी २०१५
६७) 201502021648187321 शालेय पोषण आहार योजना खर्चास मान्यता  २ फेब्रुवारी २०१५
६८) 201502091530162821 कायम विनाअनुदानित शाळा अनुदानास पात्र ठरविणे ९ फेब्रुवारी २०१५
६९) 201503101057250121  सर्व शिक्षा अभियान वर्ग खोली बांधणे ९ मार्च २०१५
७०) 201503131650224321  २५टक्के प्रवेश शुल्क प्रतिपूर्ती   १३ मार्च २०१५
७१) 201503171502114021  शालेय पोषण आहार गॅस सिलींडर १७ मार्च २०१५
७२) 201503251247354221 नैसर्गिक वाढीनसार ५ व ८च्या तुकड्या सुरू करणे  २४ मार्च२०१५
७३) 201503251247354221 नैसर्गिक वाढीनसार ५ व ८च्या तुकड्या सुरू करणे  २४ मार्च२०१५
७४) 201503271046443821  शालेय पोषण आहार स्वयंपाकगृह  २७ मार्च २०१५
७५) 201503271222527821  शालेय पोषण आहार २७ मार्च २०१५
७६) 201503271223203221  शालेय पोषण आहार MME २७ मार्च २०१५
७७) 201503301811353721  शालेय पोषण आहार योजना MME खर्च वाटप योजना  ३० मार्च २०१५
७८) 201503311851097321  वस्तीशाळा शिक्षक सामावून घेणे   ३१ मार्च २०१५
७९) 201503312024539521 मोफत गणवेश व लेखन साहित्य वाटप ३१ मार्च २०१५
८०) 201504211358081421  विद्यार्थ्यांना आधार कार्ड   २१ एप्रिल २०१५
८१) 20150421145049302।  क्रीडा सवलत वाढीव गुण  २१ एप्रिल २०१५
८२) 201504211450493021  क्रीडा सवलत वाढीव गुण   २१  एप्रिल  २०१५
८३) 201504231142286321  शुल्क प्रतिपूर्तीचे दर   २३ एप्रिल  २०१५
८४) 201504241210152121  निवृत्तीवेतनविषयक लाभ वेळेवर मिळणे   ६ एप्रिल २०१५
८५) 201504301051293221 प्रवेश पातळी स्तर ३० एप्रिल २०१५
८६) 201505061643332421 ग्रामीण क्षेत्रात वाहतुक सुविधा  ६ मे २०१५
८७) 201505111657201121 शालेय पोषण आहार १२ मे २०१५
८८) 201505121647061221 योगदिन १२ मे २०१५
८९) 201505181318143021 मिनी विज्ञान सेंटर उभारणे  १८ मे २०१५
९०) 201505181603567321 सुधारित अाकृतीबंध १८ मे २०१५
९१) 201505261610479521  स्वयंअर्थसहाय्यित शाळा २६  मे २०१५
९२) 201505271358121821 मतदार नोंदणी जागृती  २६  मार्च  २०१५
९३) 201506031030412821  स्वयंअर्थसहाय्यित शाळा  २ जून २०१५
९४) 201506061550533021 स्वयंअर्थसहाय्यित शाळा ६ जून २०१५
९५) 201506061551075321 स्वयंअर्थसहाय्यित शाळा ६ जून २०१५
९६) 201506081557458521 ग्रंथपाल वेतन श्रेणी, उच्च न्यायालयाचा निकाल ३ जून २०१५
९७) 201506081604465121 ग्रंथपाल वेतन श्रेणी, उच्च न्यायालयाचा निकाल  ३ जून २०१५
९८) 201506091634534921 शाळेत प्रवेशोत्सव ९ जून२०१५
९९) 201506111304072421 स्वयंअर्थसहाय्यित शाळा  ११ जून२०१५
१००) 201506181546098721। कायम विनाअनुदानित शाळा १८ जून २०१५

१०१) 201506181546098721। कायम विनाअनुदानित शाळा १८ जून २०१५
१०२) 201506241230528821शाळाच्या आवारात मोबाईल  २८ मे २०१५
१०३) 201506241449330621  शिक्षण साहित्य निर्मिती  २४ जून २०१५
१०४) 201506291539510721  पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ५ वी व ८वी  २९ जून २०१५
१०५) 201507011734124921 पटपडताळणी व संचमान्यता  १ जुलै २०१५
१०६) 201507021205280121 शिष्यवृत्ती परीक्षा  २ जुलै २०१५
१०७) 201507031648548621  सरल संगणक प्रणाली  ३ जुलै २०१५
१०८) 201507071253441721 तंबाखूजन्य पदार्थांचा शळेच्या आवारात वापर ७ जुलै २०१५
१०९) 201507101142408421  स्वयंअर्थसहाय्यित शाळा   १०जुलै २०१५
११०) 201507101751539921 शुल्क विनिमयन अधिनियम १० जुलै २०१५
१११) 201507101755543721 अध्ययन संपादणूक सर्वेक्षण  १० जुलै २०१५
११२) 201507151519498321   वृक्षारोपण योजना राबवणे   १५ जुलै २०१५
११३) 201507161741416821 अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन १६ जुलै २०१५
११४) 201507171135220721 दप्तराचे ओझे     २१ जुलै २०१५
११५) 201507231215492921  प्रथम प्रवेश पातळी   २३ जुलै २०१५
११६) 201508051100499421 कायम विनाअनुदानशाळा मूल्यांकनात पात्र मानणे  ४ आॅगस्ट २०१५
११७) 201508051100499421 मूल्यांकनाला पात्र  १४ आॅगस्ट २०१५
११८) 201508111452241521 शालेय पोषण आहार ११ आॅगस्ट २०१५
११९) 201508131135105021 स्नेहभोजन १३ आॅगस्ट २०१५
१२०) 201508131707175721 १ तारखेला वेतन १३ आॅगस्ट २०१५
१२१) 201508141641420021 लघु विज्ञान केंद्र १४ आॅगस्ट २०१५


            मोदींच्या या भेटीचे वेगळेपण कोणते?

       पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या जुलै महिन्यातील दौय्राच्या काळात कझख्स्थान , उझबेकिस्थान, किरगीस्थान कुर्कमेनिस्थान आणि तजिकिस्थान या पाच देशांना भेट दिली आहे. ही भेट देण्यामागचे कारण काय असावे, हे समजण्यासाठी थोडे मागे जाऊन विचार करण्याची गरज आहे. पूर्वी हे देश रशियन 'साम्राज्याचे' घटक होते. पण रशियन वर्चस्व या देशांनी मनापासून कधीच स्वीकारले नव्हते. सैनिकी बळ आणि दहशत यांच्या जोरावर या देशावर रशियाचा ताबा होता. सोव्हिएट रशियाचे विघटन झाले आणि हे देश स्वतंत्र झाले. तरी तसे गेली वीस वर्षे अस्थिरच आहेत. 

१. कझख्स्तान -इतर चार देशांप्रमाणे ही मूळची टोळ्यांची भूमी होती. या देशांना समुद्र किनारा नाही. रशिया, चीन, किर्गिस्तान, उझबेकिस्तान, कुर्कमेनिस्तान आणि कॅस्पियन समुद्र ( हा समुद्र कोणत्याही मोठ्या समुद्राशी संलग्न नाही) यांनी कझख्स्तान हा देश वेढलेला आहे. पण १३ व्या शतकात चंगीजखानाने हा प्रदेश पादाक्रांत केला. असे देश पादाक्रांत केले की तो पुरुषांची सरसहा कत्तल करीत असे आणि स्त्रियांवर बलात्कार करीत असे. याच्या कामातूरपणाचा आज उपलब्ध असलेला पुरावा असा आहे की, आज युरोपातील निम्म्या लोकांमध्ये चंगीजखानचा डि एन ए आढळतो, असे म्हणतात. पण १६ व्या शतकात टोळीवाल्यांनी या सर्व प्रदेशात सत्ता पुन्हा प्रस्थापित केली. १९३६ साली हा सोव्हिएट रशियाचा भाग झाला.१९९१ साली तो रशिया पासून विभक्त झाला. येथील ७० टक्के इस्लाम धर्मीय व २६टक्के ख्रिश्चन धर्मीय लोक आहेत.
२ उझबेकिस्तान - या देशाची ताष्कंद ही राजधानी आहे. लाल बहाद्दूर शास्त्रींचा देहांत याच ठिकाणी झाला होता. हा पर्शियन साम्राज्याचा भाग होता. ख्रिस्त पूर्व ४ थ्या शतकात शिकंदरने हा प्रदेश पादाक्रांत केला होता. ८ व्या शतकात तुर्कांनी आक्रमण करून यांना इस्लाम धर्मीय होण्यास भाग पाडले. १३ व्या शतकात हा प्रदेश चंगीजखानने तुर्कांकडून जिंकून घेतला. १६ व्या शतकात उस्बेग लोकांचा प्रभाव पुन्हा वाढला. पुढे रशियन आक्रमणाचाही या लोकांनी निकराचा प्रतिकार केला पण १९२५ साली सोव्हिएट युनियनचा एक प्रांत बनला. १९९१ साली हा रशियन साम्राज्यापासून अलग होऊन फुटून निघालेल्या अकरा देशांच्या काॅमनवेल्थचा एक घटक झाला. रशियाने या देशात जैविक शस्त्रे वापरली होती. नंतर कारिमोव्ह या साम्यवादी नेत्याची जुलमी राजवट या देशात होती. विरोधकांना उकळत्या पाण्यात बुडवून मारण्याच्या घटना याच्या अमलाखाली झाल्या होत्या. २००१ मध्ये अफगाणिस्थानमधील अल कायदा आणि तालिबान्यांविरुद्ध लढण्यासाठी या देशाने इंग्लंड अमेरिकेला तळ उभारण्यास मदत केली. बहुदा याच्या मोबदल्यात अमेरिकेने मानवी हक्क उल्लंघनाच्या प्रकारांकडे दुर्लक्ष केल्याचा अमेरिकेवर आरोप आहे. असे प्रकार खुद्द अमेरिकेत मात्र खपवून घेतले जात नाहीत. कारिमोव्ह २००७ साली प्रचंड बहुमताने निवडून आला.
३ किर्गिस्तान- चारी बाजूनी भूमीने वेढलेला,उंचउंच पर्वत आणि खोलखोल दय्रांनी नटलेला, उझबेकिस्तान, चीन, कझग्स्तान व तजिकिस्तान यांचा शेजार असलेल्या किर्गिस्तानची राजधानी बिशेक हे त्या देशातील सर्वात मोठे शहर आहे. या देशात इतके चढउतार आहेत की रस्त्याने जाताना तुम्ही एकतर चढण तरी चढत असता, नाहीतर उतार तरी उतरत असता. निदान २ हजार वर्षांचा इतिहास असलेल्या या देशाने अनेक संस्कृती, साम्राज्ये, सिल्क रूट नावाने ओळखला जाणारा व्यापारी व सांस्कृतिक  महामार्ग आणि विविध जातीजमातींची साथसंगत कधी राजीखुशीने तर कधी जुलुम जबरदस्तीने केली आहे. भारतीय संस्कृतीचे अवशेष याही देशात सापडतात पण याबाबतच्या संशोधनाला वावच वाव आहे. १९९१ साली सोव्हिएट रशियाचे विघटन होताच सांसदीय लोकशाही स्वीकारून वावरतो आहे  इस्लाम हा धर्म जबरदस्तीने स्वीकारलेल्या मुख्यत: किर्ग जमातीची बहुसंख्या (६४ टक्के) या देशात आहे. तरीही पर्शियन व मंगोलियन संस्कृती अवशेष स्वरूपात या देशात आढळते. रशियन संस्कृतीचा प्रभाव तर असणारच, हे उघड आहे.
४ तुर्कमनिस्तान- तुर्कमनिस्तानची सरहद्द इराण व अफगाणिस्तानला लागून आहे.या देशात पाणी, वीज आणि जळणाचा गॅस नि:शुल्क मिळतो. या देशात जुलमी राजवट आहे. १९९१ मध्येच रशियापासून विलग झाल्यानंतर २००६ पर्यंत या देशात नियाजोव्ह हा तहाहयात अध्यक्षपदी होता. आजही स्थितीत फारसा फरक नाही. तरीही १९९९ साली सार्वमताने काही बदल झाले आहेत. मुस्लिम बहुसंख्य तुर्कमनिस्तानचे भारताशी असलेले संबंध तुलनेने जुने आहेत. टोळ्यांच्या झटापटी, चिनी, मंगोलियन , रशियन व इस्लामी आक्रमणे व गुलामंचा व्यापार यांच्या जोखडातून हा देश बाहेर पडतो आहे. या देशाशी झालेल्या करारात भारतासोबत दोन्ही देशातील निवडणूक आयोगांमध्ये सहकार्य आणि मापे व एकके या संबंधात तुल्य समीकरणे हे विषयही बाकीच्या विषयांसोबत समाविष्ट होते, याला एक वेगळे महत्व आहे. संयुक्त पत्रकात बरोबरीच्या नात्याचाही उल्लेख आहे.
५ तजिकिस्थान- हाही डोंगराळ भाग आहे. मुख्य म्हणजे याच्या सीमा अफगाणिस्तान (१५०० किमी) व पाकिस्तानला लागून आहेत. इतर देशांप्रमाणे त्याच प्रकारची आक्रमणे या देशाच्या वाट्याला आली आहेत. ब्रांझ युगातील( ब्राँझ एज ) अवशेष येथे सापडले असून त्याबाबत अधिक संशोधनाची गरज आहे. स्थिरतेच्या काळातच अशा गोष्टींकडे लक्ष देता येते.आक्रमणे, दहशती, कट्टरता, उलथापालथी आणि उठापटकीच्या काळात ही फुरसतीची बाब बाजूला पडावी यात नवल ते काय? राजधानी 'तजिक' या शब्दाची व्युत्पत्ती हाही एक संशोधनाचाच विषय आहे. राजकीय आणि आर्थिक बाबतीत करार इतर देशांसारखेच झाले आहेत.
      शेजाय्रांची काळजी का वहायची?
   देशकालाच्या सीमा नसलेला दहशतवाद आणि कट्टरवाद( एक्सट्रिमिझम) या पासून शेजारीही मुक्त असावेत, ही भूमिका मान्य केल्यास पंतप्रधान मोदी यांनी या देशांना भेट देतांना जे विविध करार केले आहेत, त्यापैकी संरक्षणविषयक बाबतीत सहकार्य आणि दरवर्षी संयुक्त सैनिकी कवायत हे दोन करार विशेष महत्वाचे मानले पाहिजेत. सांस्कृतिक बाबतीतल्या देवाणघेवाणीबाबत आणि रेल्वे व  रस्ते विषक बाबतीतल्या करारांचे स्वरूप आणि जातकुळी वेगळी आहे. परस्पर सहकार्य, आर्थिक , सांस्कृतिक, संरक्षणविषयक, दळणवळण विषयक देवाणघेवाण आदी बाबतीतले भारताचे या देशांशी झालेले व होत असलेले करार बरोबरीच्या नात्यातून होत आहेत. अमेरिका आणि रशिया यांचे या किंवा इतर देशांशी होत असलेल्या करारांबाबत बाबतीत असे म्हणता येईल काय?
  या देशातील लोक धर्माने मुख्यत: मुसलमान आहेत. हा भाग राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेला असला तरी दोन बाबतीत चांगलाच संपन्न आहे. एक म्हणजे या भागात नैसर्गिक वायूचे प्रचंड साठे आहेत. यांना हायड्रोकार्बन्स असे नाव आहे. दुसरे असे की, येथे युरेनियमचे साठे आहेत. या शिवाय राजकीय दृष्ट्या या देशात चीनने आपले संबंध प्रस्थापित केले आहेत. एक भौगोलिक तपशील असाही आहे की, या दे शांच्या सीमा चानला लागून आहेत. भारताभोवतालच्या देशांमध्ये  चीनने आपले पाय रोवण्यास प्रारंभ केला आहे आणि याबाबतीत चीनला चांगलेच यश प्राप्त झाले आहे. 
चीन भोवतालचे देश     
भारताने चीनभोवतालच्या देशांशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्याचे महत्व शब्दात सांगण्याची आवश्यकता नसावी. या दौय्रावर टीका करणारे एकतर अज्ञानापोटी टीका करीत असावेत किंवा त्यांचा बोलविता धनी वेगळाच असला पाहिजे. यापैकी साम्यवादी मंडळींची टीका समजण्यासारखी आहे. एखादी रणनीती चीनच्या विरोधातली असू शकते असे त्यांना दूरान्वयाने जरी जाणवले तर या साम्यवादी मंडळींचा पोटशूळ जागा होतो. त्यांचा विरोध त्यांच्या आजवरच्या भूमिकेशी सुसंगतच म्हटला पाहिजे. नव्हे देशाची रणनीती योग्य दिशेने पुढे सरकते आहे, याचा हा पुरावाच समजायला हवा. पण काँग्रेसचे काय? काँग्रेसजन का टीका करीत आहेत? त्यांची टीका मुख्यत: दोन प्रकारची असते. एकतर ते आमचीच धोरणे विद्यमान शासन राबवीत आहे, असे म्हणून श्रेय आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न करीत असतात. या राजकारणाला विरोध असण्याचे कारण नाही. राजकारणाचा हा एक भागच मानला पाहिजे. 
     पण दुसरा मुद्दा वेगळा आहे. अगोदरच्या काँग्रेस सरकारने ज्या देशांकडे फारसे लक्ष दिले नव्हते. तसा नरसिंहराव आणि डाॅ. मनमोहनसिंग यांनी या देशांना भेटी दिल्या होत्या. करारही केले होते. अटलबिहारी वाजपेयी यांनीही या देशांना भेटी दिल्या होत्या. आता पंतप्रधान मोदी भेट देत आहेत, या बाबीवर टीका कशी करणार? म्हणून सर्वच दौय्रांवर,पंतप्रधानांचे लक्ष देशाबाहेरच फार आहे, या सारख्या मुद्यांपासून ते 'सूटबुटातले सरकार' म्हणून हिणवण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. यामागचे खरे कारण टीका करण्यासाठी खराखुरा मुद्दा उपलब्ध होत नाही म्हणून काँग्रेसजन आणि त्यांचे चेलेचपेटे आरडाओरड करीत आहेत, हे जनतेला कळते. पण असे करण्यावाचून त्यांना गत्यंतर नाही, हेही समजून घेतले पाहिजे. 
   आपले अस्तित्व जगाला जाणवले पाहिजे.
  या दौय्राचे महत्व समजून घेतले पाहिजे, ते आणखी एका वेगळ्या दृष्टीने. भारत नावाचा देश या भूतलावर आहे, हे या देशातील राजकारणी आणि जनता यांना जाणवणे आवश्यक होते. आपल्याबद्दलची अशी जाणीव चीनने या अगोदरच या देशांना करून दिली आहे. बावळटपणा म्हणून म्हणा किंवा दुर्लक्ष म्हणून म्हणा आपण याबाबत मागे राहिलो, हे मान्य केले पाहिजे.
        प्राचीन संबंध शोधून जोपासले पाहिजेत 
       या देशांशी आपली भौगोलिक समीपता एकवेळ नसेलही पण ऐतिहासिक व सांस्कृतिक समीपता नक्कीच आहे. ह्या बाबी त्यात्या देशातल्या दंतकथात, लोककथात जागवल्या जात असतात. अशा दौय्रांच्या निमित्ताने त्यांना उजाळा मिळत असतो. ही मैत्री भविष्यात उपयोगी पडते. असे काही आपण केले नाही, तर या प्रदेशात चीनचा कायमस्वरूपी वरचष्मा निर्माण होईल. प्रत्येक देशातील एका दिवसाच्या दौय्राने स्थायी व दृढ संबंध निर्माण होतील, या भ्रमात कोणीही राहू नये/ नाही सुद्धा. पण पायाभरणीचे काम या दौय्राने नक्कीच होणार आहे. हे काम या अगोदरच व्हावयास हवे होते पण ज्यांनी हे काम धडपणे केले नाही, त्यांनीच ओरड करावी, हे देशातील ओंगळ राजनीतीचे परिचायक आहे. 
       परस्परपूरक गरजा पूर्ण करून पोकळी भरून काढली पाहिजे.
     या देशांना हवे आहेत, रेल्वे मार्ग व रस्ते. यामुळे मध्य आशिया आणि युरोप यातील दळणवळण वाढीस लागणार आहे. कारण हा एक सरळ संपर्क मार्ग असणार आहे. खनिजे आहेत पण ती भूमीगत आहेत. ती बाहेर काढण्याची गरज आहे. या सर्व बाबताजवळ कुशल मनुष्यबळ आणि तंत्रज्ञान भारताजवळ आहे. खनिजांना भारत ही कायम स्वरूपी बाजारपेठ आहे, हा या देशांचा फायदा आहे. पण रस्ते नाहीत आणि तशात या देशांना समुद्र किनाराही नाही. त्यामुळे या देशांची कोंडी झाली आहे.  ही कोंडी आपण फोडली नाही तर आणखी कुणीतरी ती आज ना उद्या नक्की फोडेल. त्यात चीनचा क्रमांक पहिला असेल. पहिला प्रयत्न चीनचाच आहे. अमेरिका तशी दूर आहे. तिच्या काही चालीही उलट परिणाम करणाय्रा ठरल्या आहेत. त्यामुळे भारताने या भागाकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. भारताची अशा प्रकारची परस्परपूरक व सहाय्यक मैत्री ही उभयपक्षी उपयोगाची आहे.  हायड्रोकार्बन आणि युरेनियम ही भारताची गरज तर भागेलच पण सोबतच हजारो भारतीयांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. देशातील अर्थकारणाला गती व काही बाबतीत चालना मिळेल. ही बाब चीनच्या पचनी पडणारी नाही, याचे आश्चर्य वाटायला नको पण देशातच याला विरोध आणि अपशकून करण्याचा उपद्याप व्हावा, ही आपल्या देशातील राजकारणाला लागलेली कीड आहे.

  या सर्व देशात आज तरल स्थिती ( फ्ल्युइड सिच्युएशन) आहे. एक पोकळी अजूनही कायम आहे.  ही पोकळी अशीच राहणार नाही. कुणीतरी भरून काढीलच. चीनने प्रारंभ केलेला आहेच. रशियाही आता नव्याने प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष प्रभाव राखूनच आहे. कारण अनेक वर्षांची जुलुम जबरदस्तीची का असेना पण या देशांशी रशियाची साथसंगत होतीच. भारताची नीती तशी नाही.  बरोबरीच्या नात्याने भारताने भारताचे वागणे सार्क देशातील बहुतेक देशांना भावले आहे. या देशात स्थिरता यावी, तरलता जावी पोकळी भरून निघावी, ही बाब या देशांच्या, भारताच्या आणि जगाच्याही हिताची ठरणार आहे. पंतप्रधान मोदींची या देशातील भाषणे पाहता आपल्याला ही जाणीव आहे, याचा प्रत्यय येतो.


कोण म्हणतो हे कलियुग आहे म्हणून?
वसंत गणेश काणे
(एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ नागपूर -४४० ०२२)
ह्ल्ली  मुक्काम - २२१५ लाईव्ह ओक लेन, यॉर्क ,पेनसिल्व्हॅनिया,अमेरिका        
Email – kanewasant@gmail.com
Blog – kasa mee? (07122221689) 9422804430
लारा रुसो, काली ग्वास्ती आणि रीस वर्खोव्ह्न या तिघा ‘रूम मेट्स’नी एक कोच खरेदी केला. दुकानाचे नाव होते सॅल्व्हेशन आर्मी स्टोअर. जुन्या वस्तू दान स्वरुपात  घ्यायच्या आणि थोडा नफा  घेऊन त्या विकायच्या, अशा प्रकारचे जुन्या वस्तू स्वस्त दराने गरजूंना विकण्याचा व्यवसाय करणारे ते दुकान होते. ही घटना आहे, न्यूयॉर्क पासून १२० किलोमीटर उत्तरेला असलेल्या पाल्झ या गावातली. कोच आणि सोबत एक खुर्ची यांची किंमत ५५ डॉलर देऊन त्यांनी ही खरेदी केली.
जुन्या कोचला ठिकठिकाणी फुगवटे होते
कोचाचे हात जरा जास्तच फुगलेले वाटल्यामुळे रिझने  झिप उघडून आत काय आहे ते पहिले. तो काय आश्चर्य! हाताला आलेला फुगवटा एका पाकिटामुळे होता! पाकीट उघडून बघीतले तर आत ४००० डॉलरच्या नोटा होत्या!! आत आणखीही पाकिटे होती. नोटांनी भरलेली. एकूण ४०,८०० डॉलर होते. तिघांनाही लॉटरी लागल्याचा आनंद झाला. आश्चर्याने वासलेला ‘आ’ काही केल्या बंदच होईना.
त्यांचा आनंद गगनात मावेना. काय गडबड आहे हे पाहण्यासाठी शेजारीपाजारी जमा झाले. त्यांनीही या तिघांचे लॉटरी लागल्याबद्दल अभिनंदन केले.
वेगळीच कलाटणी
पण या सर्व गोष्टीला एक वेगळीच कलाटणी लावणारी घटना घडली ती अशी. एका पाकिटात एक डिपॉझिट स्लीप होती. त्यावर एका महिलेचा पत्ता लिहिलेला होता. दुसरे दिवशी या तिघांनी तिची भेट घेतली. ती ९१ वर्ष वयाची एक विधवा होती.तिची प्रकृती ठीक नव्हती. तो कोच आणि ते पैसे तिचेच होते. तिनेच ते पैसे त्या कोचात ठेवले होते. ती आजारी असतांना तिच्या नातेवाईकांनी तो कोच जुन्या वस्तू गरजूंना स्वस्त किमतीत देणाऱ्या ‘सॅल्व्हेशन आर्मी स्टोअर’ या  दुकानाला देणगी (डोनेशन) स्वरुपात दिला होता. 
‘आम्ही हे पैसे सहज ठेवू शकलो असतो पण मग आम्हाला आयुष्यभर टोचणी लागली असती’, असे या तिघांनी पत्रकारांना (असोसिएटेड प्रेस) सांगितले.       

Friday, February 5, 2016

जागतिक मंदी आणि भारत  
  आज सर्वजगभर मंदीचे लाट आहे. मंदीच्या या  लाटेतून बाहेर पकडण्याचा निकराचा प्रयत्न जगातील सर्व देश करीत आहेत. मंदीचा परिणाम समजून घेण्यासाठी एक प्रत्यक्ष उदाहरण बघूया. जी ई ही एक जागतिक कीर्तीची अमेरिकन कंपनी असून ती  उद्याेगजगात आपली प्रतिष्ठा राखून आहे. तिचा रेल्वेची इंजिने तयार करण्याचा एक कारखाना असून तिच्या इतर अनेक कारखान्यांच्या तुलनेत या कारखान्याच्या क्रमांक खूपच वरचा होता. दर वर्षी ह्या कारखान्यात शेकडोंनी इंजिने तयार होत असत. जगभर ही इंजिने विकली जात. इंजिनांची मागणी करणार्या देशात इण्डोनेशिया सारखा आशियातील देश जसा होता तसा इंग्लंड सारखा युरोपातील देशही होता. मंदीचा परिणाम होऊन या दोन्ही आणि जगातील अन्य देशांनी आपल्या मागण्या रद्द केल्या. एकाही इंजिनाची मागणी नसतांना हा एवढा मोठा प्रचंड कारखाना कसा चालवायचा? त्यामुळे कामगार कपात करणे भाग झाले. त्या गावात अक्षरश: हाहाःकार माजला. कधीतरी मागणी येईल या अपेक्षेने कमीतकमी कामगार ठेवून आणि त्यांच्या मिळकतीत नियमात बसेल ती आणि बसेल तशी कपात करीत हा कारखाना कंपनीने जिवंत ठेवला आहे. सर्व कंपन्या अशा दानतीच्या नव्हत्या/नसतात/नाहीत. त्यांनी सरळ आपला गाशा गुंडाळला आणि एकजात सर्व कर्मचारी रस्त्यावर आले. थोड्याफार फरकाने हा प्रकार सर्व जगभर घडत आहे. मंदीच्या प्रश्नाचे गांभीर्य, भयानकता, दाहकता आणि विदारकता लक्षात येण्यासाठी हा तपशील उपयोगी पडेल.
                            जी-२०’चे कायम आणि नियंत्रित सदस्य
     ‘ग्रुप ऑफ २० नेशन्स’ किंवा ‘जी-२०’ असे नाव असलेला २० देशांचा एक आहे. यातील सदस्य देश : १) अर्जेंटिना, २) ऑस्ट्रेलिया, ३) ब्राझील, ४) कॅनडा, ५) चीन, ६) फ्रान्स, ७) जर्मनी, ८) भारत, ९) इंडोनेशिया, १०) इटली, ११) जपान, १२) कोरिया, १२) मेक्सिको, १४) रशिया, १५) सौदी अरेबिया, १६) दक्षिण आफ्रिका, १७) युनायटेड किंगडम (इंग्लंड), १८) युनायटेड स्टेट्‌स (अमेरिका) आणि २०) युरोपियन युनियन हे आहेत. जगातील अर्थक्षेत्रामधली ही सर्वात मोठी संस्था आहे. वरील सर्व देशातील  अर्थव्यवस्था स्थिर आणि मजबूत समजली जाते. जगातील दोनतृतीयांश लोकसंख्या या देशांमध्ये राहते. याशिवाय या देशांचे ग्लोबल डोमेस्टिक प्रॉडक्ट (जी. डी. पी.) हे ८५ टक्के आहे, तसेच ग्लोबल ट्रेडिंगसुद्धा ७५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
कालांतराने काही देशांना कायम निमंत्रित म्हणूनही मान्यता देऊन जी-२० ला व्यापक रूप देण्याच्या प्रयत्न झाला. ते देश असे : १) स्पेन, २) बेनीन, ३) ब्रुनेई, ४) कम्बोडिया, ५) चिली, ६) कोलंबिया, ७) इक्वेटोरियल गुनिया, ८) इथोपिया, ९) कझाकिस्तान, १०) मालवी, ११) नेदरलॅण्ड, १२) स्वित्झरलॅण्ड, १३) थायलंड, १४) युनायटेड अरब अमिरात, १५) व्हिएतनाम, १६) मरटेनिया, १७) म्यानमार, १८) न्यूझीलंड आणि १९) सिंगापूर या नवीन आणि आर्थिक दृष्ट्या छोट्या देशांनाही आमंत्रित सदस्य म्हणून मान्यता दिली गेली. अशा या अतिव्यापक संस्थेची आतापर्यंत आठ संमेलने झाली आहेत.

                              प्रगतीचा दर शून्यावर
        सध्याच्या जागतिक मंदीतून जगातील बडेबडे देश सुटलेले नाहीत. जगातील देशांचे दोन प्रकारात वर्गीकरण करतात. विकसित देश आणि विकसनशील देश. याच अर्थाचा दुसराही शब्दप्रयोग म्हणजे प्रगत देश आणि प्रगतीपथावर असलेले देश. या देशांच्या प्रमुखांची बैठक आॅस्ट्रेलियामध्ये ब्रिस्बेन येथे नुकतीच पार पडली. या निमित्ताने  एक भयावह स्थिती समोर आली आहे. विकसित आणि विकसनशील अशा दोन्ही प्रकारच्या देशांच्या प्रगतीचा/विकासाचा दर खूपच कमी आहे. अप्रगत/विकसनशील देशांचा प्रगतीचा दर १.७ टक्के आहे. तर विकसित देशांच्या प्रगतीचा दर त्यांच्या तुलनेत जेमतेम एक टक्काच जास्त आहे. ही स्थिती अशीच कायम राहिली तर अनेक देशांच्या प्रगतीचा दर शून्यवरही जाऊ शकतो असे दिसते आहे. पण दोन चिंताजनक बाबी समोर येत आहेत.एक असे की ही जागृती निर्माण व्हायला सहा महिन्यांचा अवधी लागला. दुसरे असे की, अशा परीस्थितीतही युक्रेनच्या प्रश्नावरून रशियाने अर्ध्यातूनच आपले चंबूगवाळे आवरून बैठकीतून काढतां पाय घेतला. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, अगदी जीवावर बेतले तरी सर्व राष्ट्रे आपल्या राष्ट्रीय हितसंबंधांनाच प्राधान्य देत आहेत. अमेरिका, चीन, जपान या सकट सगळ्या देशांचे विकास दर घसरत चालले असून ही घसरण थांबावी यासाठी त्यांना पराकोटीचे प्रयत्न करावे लागत/लागणार आहेत.
                              भारत पुष्कळ प्रमाणात स्वावलंबी 
          या सर्व राष्ट्रांना भारताशी मैत्री हवी आहे. याची कारणे दोन आहेत. भारत ही त्यांच्यासाठी एक फार मोठी बाजारपेठ आहे. भारताचा विकासदरही घसरला असला  तरी तो या राष्ट्रांइतका घसरलेले नाही. तो असात वाढत राहिला तर लवकरच सहा टक्के इतका होऊ शकतो. यांचे कारणही समजून घेणे उपयोगाचे ठरणारआहे. जगातील बहुतेक देश परस्परावलंबी झाले आहेत. एकाचे अर्थकारण बिघडले की त्याचा परिणाम दुसर्या देशाच्या अर्थकारणावरही होतोच. त्यामुळे भारतातही मंदीची लाट आली आहे. पण आपण पुष्कळ प्रमाणात स्वावलंबी आहोत. खनिज तेलाचा एक अपवाद सोडला तर आपली अर्थव्यवस्था आपल्याच भरवशावर उभी आहे. सध्या तेलाचे भाव घसरत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत जगभरात उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे सगळे देश आपल्या देशाकडे अपेक्षेने पाहत आहेत. हे देश आणि त्यांचे राष्ट्रप्रमुख आपल्याकडे आदराने पाहतात आपल्याला मान देतात यांचे हेही प्रमुख कारण आहे. सध्या सोन्याचे भावही उतरत आहेत. मंदीचा सामना कोणताही एक देश स्वत:च्या भरवशावर करू शकणार नाही. सर्वांना एकमेकाशी सहकार्य करावे लागेलच. 
                                      मूलभूत सुधारणा आवश्यक
       आपल्यालाही अनेक मूलभूत सुधारणा कराव्या लागतील. व्यवस्थापनात चुस्ती आणावी लागेल, शिथिलता दूर करावी लागेल. काळा पैसा परत आणण्यासाठी जी २० देश एका  विचाराने आणि परस्पर सहकार्य करण्याच्या बाबतीत सहमतीने काम करण्याचा निर्धार करीत आहेत, ही फार मोठी उपलब्धी ठरली आहे. पंतप्रधान नरेन्द्र मोदींच्या प्रयत्नाला  या बाबतीत मिळालेले हे यश भविष्यात खूप महत्त्वाचे ठरणार आहे. आपल्या देशात उत्खनन करून तेलाच्या साठ्यांचा शोध घेण्याच्या प्रयत्नांना गती मिळाली आहे. आपला देश जगात महासत्ता म्हणून ओळखला जाईल, यात शंका नाही. एवढेच नाही तर जगाचे पालकत्व करणार्या देशांमध्ये आपले प्रमुख स्थान असणार आहे. पण त्यासाठी देश पातळीवर कठोर निर्णय  तातडीने घ्यावे लागणार आहेत. संसदेत आवश्यक ते बहुमत सत्ताधारी पक्षाजवळ आहे. राज्यसभेत तशी स्थिती नाही. ही अडचण क्षात घेऊनच सहमतीचे राजकारण त्या सभागृहात निर्माण होण्याची आणि तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.  

       पहिलीत प्रवेश केव्हा,कसा आणि का ?   
  मुलाला पहिल्या वर्गात केव्हा प्रवेश द्यावा या बाबत २००९ च्या शिक्षण हक्क कायद्यात तरतूद आहे. प्रवेशासाठीचे वय सहा वर्षे इतके असावे, अशी ही तरतूद आहे. आज पहिल्या वर्गात प्रवेशासाठीचे वय पाच वर्षे इतके असावे, अशी तरतूद आहे. त्यामुळे २०१४-२०१५ या वर्षात पाच वर्ष वयाची मुले पहिलीत शिकत आहेत.२०१५-२०१६ मध्ये ही मुले सहा वर्षांची होऊन दुसरीत जातील, हे ओघानेच आले. तसेच पहिलीत जर आजपर्यंत प्रवेशाचे वय पाच वर्षे इतके होते तर आज (२०१४- २०१५) सिनीअर केजी मध्ये आलेली मुले चार वर्ष वयाची असणार हे उघड आहे. तसेच ज्युनिअर केजी मध्ये आज ( २०१४-२०१५) आलेली मुले तीन वर्ष वयाची असणार हे उघड आहे. 
                           संक्रमणावस्थेतील प्रश्न आणि अडचणी
       सध्या संक्रमणावस्था चालू आहे. जी मुले २०१५-२०१६ मध्ये पहिलीत प्रवेशासाठी येतील त्यांचे वय पाच वर्षे असेल. त्यांना शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीनुसार प्रवेश देतां येणार नाही. त्यांना हे वर्षभर सिनीअर केजीच्या वर्गातच बसवावे लागेल. तसेच जी मुले २०१५-२०१६ मध्ये सिनीअर केजीत प्रवेश घेतील त्यांचे वय चार वर्षे असेल. त्यांचेबाबतीतही अशीच अडचण पुढील वर्षी येणार आहे. 
     यांवर उपाय कोणता? ज्युनियर केजीत प्रवेशाचे वय आज तीन वर्षाचे आहे ते बदलून २०१५ पासून चार वर्षाचे करावे. म्हणजे २०१६ मध्ये ही मुले पाच वर्षांची होऊन सिनीयर केजी मध्ये आणि २०१७ मध्ये सहा वर्षांची होऊन पहिलीत जातील.
      यावर एकमत असे असू शकेल की, केजीमध्ये शिकणारी मुले संख्येने खूप कमी असतील. त्यांचा विचार कशाला करायचा? पण ही भूमिका योग्य नाही. दुसरे असे की, काही प्राथमिक शाळांना केजीचे वर्ग जोडलेलेही असतील. अशा शाळांमध्ये २०१५ मध्ये पहिलीचे वर्ग ओस पडतील कारण त्या शाळेत पहिलीत प्रवेश घेऊ इच्छिणारी सर्व/निदान बहुसंख्य मुले सहापेक्षा कमी वयाची असतील. त्यांना या नवीन नियमामुळे पहिलीत प्रवेश देतां येणार नाही. २०१६ पासून हे कमी विद्यार्थी संख्या असलेले वर्ग क्रमाक्रमाने दहावीपर्यंत जातील.
                               वय आणि वर्ग यांचे परस्परावलंबित्त्व
       प्ले ग्रुप, नर्सरी, केजी या पातळीवरच्या शिक्षणाचे नियमन करणारा कायदाच आपल्या देशात नाही.  वय आणि शाळा प्रवेश यांत निकटची संबंध आहे. नर्सरी किंवा बालवाडीत प्रवेशाचे वय तीन वर्षे इतके असावे. केजी १ चार वर्षे आणि केजी २ पाच वर्षे असे असावे. ही वये निश्चित करण्यापूर्वी या प्रश्नावर जगभर अभ्यास आणि प्रयोग झाले आहेत. मूल शाळेत प्रवेश करते म्हणजे घराच्या चार भिंती ओलांडून घरापासून काही अंतरावर असलेल्या इमारतीमधील एका खोलीत जाऊन बसते, हा अतिशय मर्यादित आणि वरवरचा भाग झाला. याचा खरा अर्थ असा आहे की ते आता समाजाचा एक अविभाज्य हिस्सा बनणार असते. समाजात मिसळण्यासाठी त्याची दोन प्रकारची तयारी होणे गरजेचे आहे. एका प्रकारची तयारी म्हणजे शारीरिक तयारी. आपल्या शी, शू, तहान, भूक विषयक व्यवहार, गरजा आणि आवश्यकता सांगण्याची क्षमता मुलात आलेली असली पाहिजे. दुसर्या प्रकारची तयारी म्हणजे मानसिक तयारी. ही जास्त महत्त्वाची आहे. घरात मूल सुरक्षित असते. घरातील सगळी माणसे त्याची मर्जी राखण्यासाठी, संभाळण्यासाठी आणि पूर्ण करण्यासाठी तत्पर असतात. कुटुंब सोडवून ते फारसे दूर गेलेले नसते. तिथेही आपल्या मर्जीप्रमाणेच इतरांनी विशेषत: दुसर्या मुलांनी वागले/वावरले पाहिजे, असा त्याचा हट्ट असतो. आता मात्र शाळारूपी समाजात ही मनमानी चालणार नसते.त्यामुळे काही मुलात असुरक्षिततेची भावना निर्माण होते तर काही दांडगेपणाने आपलाच हेका चालवण्याचा प्रयत्न करतात. समाजात सगळ्यांचे स्वातंत्र्य अबाधित राहण्यासाठी प्रत्येकाने आपल्या स्वातंत्र्याला मुरड घातली पाहिजे हे समजायला आणि उमजायला पुरेसा वेळ देण्याची आवश्यकता असते. या दृष्टीने विचार करता शाळा हे समाजाचे लघुरूप आहे, हे लक्षात येते. या जीवनात जो रुळतो, तो जीवनात यशस्वी होण्यासाठीची पहिली अट पूर्ण करतो, शाळा प्रवेशासाठीचे वय एक वर्ष कमी काय किंवा जास्त काय असा विचार किती वरवरचा आहे यासाठी आणखीही उदाहरणे देता येतील.
                                   अभ्यासक्रमही तेवढाच महत्त्वाचा 
           वयाचा मुद्दा जसा महत्त्वाचा आहे तसाच अभ्यासक्रमाचा मुद्दा सुद्धा महत्त्वाचा आहे. प्रत्येक वयात मुलाचीही क्षमता काय आणि कशी असते,हे पाहून अभ्यासक्रम ठरतो. प्रयेक वयात मुलाच्या वेगवेगळ्या क्षमता विकास पावत असतात. या विकसाला पोषक आणि पूरक कार्यक्रम दिले पाहिजेत. म्हणूनच मूल रांगायला लागले की त्याच्या समोर आपण त्याचे आवडते खेळणे ठेवतो. उत्तेजनाचा हा आदर्श प्रकार पुढे मात्र पालक आणि अनेकदा शिक्षकही विसरतात. 
            लहानपणी ( पाच वर्ष पर्यंत मुलांच्या हाताच्या बोटांचे स्नायू पुरेसे विकसित झालेलेच नसतात. या वयात मुलाखत लेखनक्षमता आली पाहिजे असा पालकांचा आग्रह आणि प्रयत्न असतो. योग्य पद्धतीने पेन/पेन्सील धरणे त्याला शक्य होत नाही. या वयात चित्रे रंगवणे, मातकाम करणे, क्रेयाॅन पेन्सिली वापरणे असा पर्याय असला पाहिजे.रांगोळीही उत्तम.
             मुलांना मूर्त कल्पना लवकर समजतात. चिंचोके / खडे वापरून अंकज्ञान , बेरीज, वजाबाकी शिकवा. वाचनक्षमता लवकर येते. म्हणून वाटायला अगोदर शिकवा. लेखन हे कौशल्याचे काम आहे. कौशल्य साध्य करायला वेळ लागतो.अशी अभ्यासक्रमाची आखणी असते/असायला पाहिजे. त्याचसोबत परिसराचाही अभ्यासही आवश्यक आहे.त्याच्यासारखा उत्तम शिक्षक नाही.
      थोडक्यात काय की, शारीरिक, मानसिक, बौद्धिक, वैचारिक,भावनिक आदी क्षमता, वृत्ती, प्रवृत्ती यांचा म्हणजेच सर्वांगीण विकासाचा पाया या वयात घातला जात असतो. या मुशीच्या कोंदणात व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व फुलणार /बहरणार असते. यादृष्टीने आपण पुरेसे गंभीर केव्हा होणार?