फ्राईडचा मानसशास्त्रीय सिद्धांत
वसंत गणेश काणे,
बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्च्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२
(०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०
E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee?
सिग्मंड फ्राईड या मानसशास्त्रज्ञाचा जन्म ६ मे १९५६ रोजी व मृत्यू २३ सप्टेंबर १९३९ रोजी झाला. तो आॅस्ट्रियाचा नागरिक थहोता. मेंदूविकार( न्युराॅलाॅजी), मानसशास्त्र, मानसोपचार(सायकोथिरपी), मनोविश्लेषण( सायकोॲनलिसिस) या विषयांचा त्याचा गाढा अभ्यास होता. मनोविश्लेषणाचा जनक म्हणून आज सर्व जग त्याला ओळखते. सेरेब्रल पाल्सी, वाचाहीनता (ॲफासिया) व मज्जासंस्थेचा अभ्यास ( न्युरोॲनाटाॅमी) यात त्याचे प्रावीण्य होते.
मनोरुग्ण व डाॅक्टर यात संवाद घडवून आणून मानसिक आजार बरा करण्याचे शास्त्र त्याने विकसित केले. तो रुग्णाला मुक्तपणे बोलते करीत असे. या चिकित्सापद्धतीमुळे मनोरुग्णाच्या मनातील इतरांबाबतच्या भावना त्याच्या न कळत मानसोपचार तज्ञाला कळत असत. भावनांना मोकळी वाट मिळून रुग्णाचे मानसिक आजार दूर होत. त्याने लैंगिकतेची नव्याने व्याख्या केली. फाईडला स्वैर लैंगिकतेचा पुरस्कार करणारा मानणारे त्याच्यावर अन्याय करीत असतात. लैंगिकता हा झाकून/दडपून टाकण्याचा विषय नाही. तसा तो मानल्यामुळे अनेक विकृती निर्माण होत असतात. या विषयी फ्राईड अतिशय मनमोकळी व खुली चर्चा करतो. काही आंबटशौकी फ्राईडचे सिद्धांत चविष्टपणे चघळतांना आढळतात. प्रत्यक्षात हे सिद्धांत तसे नाहीत. फ्राईडने लैंगिकतेतेची खुली चर्चा कोणताही आडपडदा न ठेवता केली आहे, हे जरी खरे असले तरी ही चर्चा एवढ्या पुरतीच सीमित नाही. कामेच्छेबरोबरच तो जीवेच्छेची कल्पनाही मांडतो. तो द्वैत मानणाराही आहे. त्याचा पुनर्जन्मावर विश्वास नाही. त्याने बुद्धाची निर्वाणाची कल्पना त्या संज्ञेसह स्वीकारली आहे. संपूर्ण फ्राईड अशा लेखातून बिनचुक मांडणे शक्य नाही. त्यासाठी तो मुळातूनच वाचायला हवा. या लेखमालेतून तशी इच्छा निर्माण झाली तरी हा लेखनप्रपंच सार्थ झाला, असे म्हणता येईल.
लैंगिकतेची भावना अगदी लहानपणापासून म्हणजे जन्मापासून मुलाच्या मनात वसत असते. ह्या भावनेला त्याने 'इडिपस काॅम्प्लेक्स' असे नाव दिले.
इडिपसची कथा
ग्रीक पुराणात इडिपस या राजपुत्राची कथा आहे. याचा जन्म झाला तेव्हा आकाशवाणी झाली होती की, हा मुलगा आपल्या बापाचा खून करील आणि आपल्या आईशी विवाह करील. असे अवलक्षणी कारटे जन्मत:च मेलेले बरे, असे ठरवून राजा आपल्या सैनिकाला आज्ञा करतो की, याला अरण्यात घेऊन जा आणि मारून टाक. सैनिक त्याला अरण्यात तर घेऊन जातो पण, ते गोजीरवाणे मूल मारून टाकण्याची त्याच्या मनाची तयारी होत नाही. तो त्याला अरण्यात तसेच सोडून देतो आणि परत येऊन आपण त्या मुलाला मारून टाकल्याचे राजाला सांगतो. आता राजा निश्चिंत होतो. पण विधिलिखित वेगळेच होते. शेजारच्या देशाचा राजा शिकारीसाठी याच जंगलात येतो. या मुलाला - इडिपसला - जंगलात पडलेला तो पाहतो. त्या मुलाबद्दल त्याच्या मनात प्रेम उत्पन्न होते. आपला मुलगा म्हणून राजा त्याला घरी घेऊन येतो. या राजाचा मुलगा म्हणून इडिपस वाढू लागतो, यथावकाश राजसिंहासनावर बसतो. त्याचे आपल्या खऱ्या पित्याशी युद्ध होते. युद्धात तो आपल्या खऱ्या पित्याला मारतो आणि त्याच्या राणीशी - म्हणजे आपल्या खऱ्या आईशी- विवाह करतो. अशा प्रकारे शत्रूला मारल्यानंतर त्याच्या पत्नीशी विवाह करण्याची त्या काळची प्रथा असते. तिला अनुसरूनच हे सर्व घडते. यथावकाश त्याला या नवीन राणीपासून (आपल्या खऱ्या आईपासून) पुत्रप्राप्ती होते. नंतर हे रहस्य त्याला कळते. त्याने आकाशवाणीनुसार आपल्या वडलांची हत्या करून आईशी विवाह केलेला असतो. एवढेच नव्हे तर त्याला तिच्यापासून पुत्रप्राप्तीही झालेली असते. हे समजताच राणी ( त्याची आई) आत्महत्या करते आणि इडिपस आपले डोळे फोडून घेतो.
इडिपस काॅम्प्लेक्स व इलेक्ट्रा काॅम्प्लेक्स
फ्राईडने या इडिपसचे नाव वापरून इडिपस काॅम्प्लेक्सची कल्पना मांडली आहे. यानुसार प्रत्येक मुलाच्या मनात आपल्या पित्याबद्दल रागाची/द्वेशाची भावना असते. आपल्या आईच्या आपल्यावरील प्रेमात बाप वाटेकरी/स्पर्धक आहे, अशी त्याच्या अंतर्मनातील भावना असते. पण त्याचबरोबर आपला बाप प्रत्येक मुलासमोर आदर्श स्वरूपातही असतो. असे द्वैत फाईडने कल्पिले आहे.
अशीच भावना प्रत्येक मुलीच्या मनात आपल्या आईविषयी असते. या भावनेला त्याने 'इलेक्ट्रा काॅम्प्लेक्स' असे नाव दिले आहे.
१. फाईडप्रणित स्वप्नांचे अर्थ व कारणे
फ्राईड स्वप्नांना इच्छापूर्तीचे प्रयत्न या स्वरूपात मानतो. 'मनी वसे ते स्वप्नी दिसे', असे आपण म्हणतो, त्यातलाच हा प्रकार मानता येईल. उदाहरण म्हणून असे सांगता येईल. कल्पना करा की, आपला बाॅस खूप खाष्ट आहे. तो आपल्याला खूप त्रास देत असतो. पण करणार काय? मनातल्यामनात चडफडण्याशिवाय पर्याय नसतो. अशावेळी असे स्वप्न असे पडू शकते की, आपण एका कुत्र्याला काठीने बडवतो आहोत. या स्वप्नाचा फ्राईडने असा अर्थ लावला असता की, आपला बाॅस आपल्याला कुत्र्याच्या स्वरूपात दिसला आणि त्याला काठीने बडवून आपण आपला राग शांत करून घेतला आहे. ( प्रत्यक्ष बाॅस स्वप्नातही दिसत नाही कारण त्याला काठीने बडवायचे म्हणजे तर खूपच झाले. म्हणून बडवायला कुत्रा बरा असा विचार 'आपण' केलेला असतो). या आधारे लगेच आपल्याला पडलेल्या स्वप्नाचा अर्थ लावण्याची घाई करू नये. स्वप्नाचा अर्थ लावणे इतके, साधे, सरळ, सोपे नसते व स्वप्नेही इतकी उघडउघड नसतात. आपल्यापैकी अनेकांना वेगवेगळ्या सवयी असतात. त्या जाता जात नाहीत. त्यांच्या मुळाशी अशी एखादी अगतिकता, संताप, चीड, असहाय्यता असते. तणावातून बाहेर पडण्यासाठीचा हा आपल्या मनाचा प्रयत्न असतो. अनेक मुलींना स्वप्नात साप दिसतात. पुरुषाचे इंद्रिय त्यांना सापाच्या स्वरुपात दिसत असते. आपली कामेच्छा पूर्ण करण्याचा हा प्रयत्न असतो. अशी अनेक प्रतीके फाईडने शोधून काढली आहेत. तो रुग्णांना त्यांची स्वप्ने सांगायला उद्युक्त करीत असे. त्यांच्या आधारे रुग्णाच्या मनातील अतृप्त, अपूर्ण भावनांचा शोध घेत असे. हा उलगडा झाला की, रुग्णाचा मनोविकार दूर होत असे. हे अर्थातच अगदी वरवरचे ढोबळ व ढळढळीत उदाहरण झाले. स्वप्ने यापेक्षा खूपच क्लिष्ट व गुंतागुंतीची व अर्थ लावण्यास कठीण असतात. मुद्दा समजून घेण्यापुरतेच हे उदाहरण आहे, हे ध्यानी असावे. स्वप्नांचा अर्थ लावणे हे तज्ञांचे व अभ्याससाध्य काम आहे, याचे सतत स्मरण असावे.
२. आपले मन
फ्राईड मनाचे जाणीव ( काॅन्शस) व नेणीव( अनकाॅन्शस)असे दोन विभाग मानतो. मनाचे हे स्वरूप समजण्यासाठी आपण हिमनगाचे उदाहरण घेऊ या. हिमनगाचा पाण्याच्या पृष्ठभागावर दिसणारा भाग म्हणजे आपले मन/आपली जाणीव ( आपल्यातला 'मी') आणि हिमनगाचा पाण्यात बुडालेला भाग म्हणजे नेणीव ( अनकाॅन्शस). दुसरेही उदाहरण घेता येईल. जाणीव म्हणजे दुधावरची साय आणि नेणीव म्हणजे सायी खालचे दूध. किंवा जाणीव महणजे भूपृष्ठ व नेणीव म्हणजे भूपृष्ठाखालचा लाव्हायुक्त तप्त रस. या प्रत्येक उदाहरणावरून एक लक्षात येते की नेणीवेचा बाह्य(व्यक्त) जगाशी प्रत्यक्ष संबंध येऊ शकत नाही.त्यासाठी त्याला जाणिवेचाच आधार घ्यावा लागतो. जाणीव म्हणजे आपले सुसंस्कृत मन. संस्कार, नीतीनियम, कायदे यांची बंधने पाळून आपल्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणारे. नेणीव म्हणजे आपल्यातला राक्षस, पशू, तीव्र वासनांचा कल्लोळ असलेला भाग. कुठलीही बंधने न पाळता वासना पूर्तीसाठी धडपडणारे अव्यक्त मन. या दोन मनात सतत संधर्ष चालू असतो. नेणीव(अव्यक्त मन) प्रगट होण्यासाठी सतत व्यक्त मनाला (जाणिवेला) ढुसण्या मारीत असते तर जाणीव ( व्यक्त मन) त्याला सतत थोपवीत असते. अगदीच नाईलाज झाला तर बोलण्याचालण्याची खास ढब(मॅनेरिझम्स) निर्माण होतात. पण संस्कृतीची सीमारेषा ओलांडली जात नाही. या संघर्षाचा परिणाम मनोविकार निर्माण होण्यात होत असतो. फ्राईडच प्रयत्न अंतर्मनातील कल्लोळाला संस्कृतीसंमत वाट मोकळी करून देण्याचा असे. अशाप्रकारे वाट मोकळी झाली की मनोविकार दूर होत.
३. आपल्या उर्जेचा स्रोत
या उर्जेला फ्राईड जीवेच्छा ( लिबिडो) असे संबोधतो. आपल्या सगळ्या इच्छा, वासना यातून निर्माण होतात. आपल्या द्वैत सिद्धांताला अनुसरून तो आपल्यात मरणाचीही इच्छा असते, असे तो मानतो. यातूनच तोचतो पणा, राग, द्वेष, आक्रमक वृती व अपराधी भाव यांची निर्मिती होत असते.
धर्म भावना आणि संस्कृती यांचा मागोवा घेण्याचा प्रयत्नही फ्राईडने शेवटी शेवटी केलेला आढळतो
मनोविश्लेषण हा मानसशास्त्राचा आजही महत्त्वाचा भाग मानला जातो. मानसिक विकृतींचे विश्लेषण व उपचार यात याचा आधार घेतला जातो. पण याला विज्ञान मानण्यास अजूनही सहमती नाही. पण फाईडच्या विचारांचा पाश्चात्यांच्या विचारांवर फार मोठ्या प्रमाणात प्रभाव पडल्याचे सर्व लोक मान्य करतात. पाश्चात्यांच्या संस्कृतीवरही फ्राईडच्या विचारांचा ठसा उमटलेला आहे.
पाळण्यात पाय दिसले
सिग्मंड फ्राईडच्या कपाळावर जन्मत: आठ्या होत्या. आईला हा शुभशकून वाटला. बालपणी तो एक मेधावी विद्यार्थी होता. आठ भाषात तो पारंगत होता. इंग्रजी, जर्मन, फ्रेंच, स्पनिश, हिब्रू (तो ज्यू होता) ग्रीक व लॅटिन अशा त्या भाषा होत्या. ईल माशातील प्रजोत्पादनावर त्याने संशोधन केले होते. फ्राईडवर नित्शेच्या विचारांचा प्रभाव होता. माझ्यातील सुप्त गुणांचा शोध नित्शेचे साहित्य वाचून मला घेता येईल, असे तो म्हणत असे. शेक्पिअरच्या नाटकांतील निरनिराळ्या पात्रांच्या मानसिकतेच्या आधारे मला मानवी मन समजण्यास मदत झाली असेही तो म्हणत असे.
मनोविश्लेषणतंत्राचा विकास
फ्रईडने व्यवसाय सुरू केला तेव्हा मानसिक रोग बरे करण्यासाठी संमोहनाचा आधार घेतला जात असे. यात एक अडचण होती. उपचारादरम्यान रुग्ण आणि डाॅक्टर यात भावनिक बंध निर्माण होत. स्त्री रुग्ण तर उपचार करणाऱ्या डाॅक्टरच्या प्रेमातच पडत. रुग्ण व उपचारकर्ता यात एक व्यावसायिक अंतर असले पाहिजे, असे प्रकर्षाने जाणवू लागले. यासाठी संमोहनाला पर्याय मिळणे आवश्यक होते. संमोहनाऐवजी 'बोलते करून बरे' करण्याची (टाॅकिंग क्युअरचा) उपयोग काहींनी यशस्वीरीत्या करून पाहिला.
मनोविश्लेषण
फाईडने हे तंत्र आणखी विकसित केले. रुग्णाला प्रथम स्वस्थ चित्त करून त्याने मनात येतील ते विचार व जाग्या होतील त्या आठवणी किंचितही आडपडदा न ठेवता किंवा संकोच न बाळगता सांगण्यासाठी तो रुग्णाला प्रेरित व प्रोत्साहित करीत असे. या प्रकाराला त्याने 'फ्री असोसिएशन' हे नाव दिले. सोबतच रुग्णाला पडणारी स्वप्नेही त्याने मोकळेपणाने सांगावीत, यासाठी तो आग्रह करायचा. यातून रुग्णाच्या नेणिवेत/अंतर्मनात काय चालले होते, ते त्याला कळू लागले. संमोहनाच्या द्वारे जे साध्य होत होते ते याप्रकारेही साध्य करता येते, हे त्याला कळले व इतरांनाही दाखवता येऊ लागले. अंतर्मनाची कवाडे उघडण्यासाठी संमोहनासारखेच हे एक नवीन उपचारतंत्र त्याने विकसित केले. संमोहनाला नैतिक आधिष्ठान नव्हते. एका व्यक्तीने दुसरीला संमोहनाद्वारे अंकित करून तिच्या अंतर्मनात डोकावणे हे अनैतिकच होते. शिवाय रुग्ण व उपचारकर्ता यात जे एक व्यावहारिक व व्यावसायिक अंतर राखण्याची आवश्यकता होती, तीही या पद्धतीत पूर्ण/साध्य होत होती. जवळजवळ प्रत्येक स्त्रीरुग्णाच्या एकतर्फी प्रेमातूनही उपचारकर्त्याची सुटका झाली. या उपचार तंत्राला फ्राईडने मनोविश्लेषण (सायकोॲनलिसिस) असे नाव दिले.
स्वानुभवातून अर्थबोध
याच काळात फाईड स्वत:च आजारी पडला. त्याच्या ह्रदयाचे ठोके अनियमित झाले, त्याला स्वत:ला चित्रविचित्र स्वप्ने पडू लागली, त्याचे मन वारंवार निराशाग्रस्त होऊ लागले. या अवस्थेला न्यूरेस्थेनिया असे म्हणत. या सर्वाचा संबंध आपल्या वडलांच्या मृत्यूशी आहे असे त्याच्या मनाने घेतले. त्याने आपली मनोवस्था जाणून घेण्याच्या उद्देशाने स्वयंविश्लेषणाचा (सेल्फ ॲनलिसिस) उपयोग करून पाहिला आणि तो यशस्वी झाला. बालपणीची स्वप्ने व आठवणी यांची त्याला मदत झाली. लहानपणी वडलांबाबत आपल्या मनात वैराची भावना असे, ते आपल्या आईच्या प्रेमात वाटेकरी होते, हे आपल्याला सहन होत नसे, हे त्याला जाणवले. या जाणिवेतून त्याने मनोविकारांच्या कारणांची नव्याने मांडणी केली. अशाप्रकारे हे आजारपण फ्राईडसाठी वरदान ठरले. स्वयंविश्लेषण आणि स्वयंसूचनाच्या तंत्राच्या विकासाचा पाया या निमित्ताने रचला गेला.
हिस्टेरिया व पछाडलेपण
बालपणी वाट्याला आलेले लैंगिक उपद्रव ( माॅलेस्टेशन) नेणिवेत घर करून बसतात आणि मोठेपणीच्या मनोविकारांना कारणीभूत ठरतात/असतात. यातून हिस्टेरिया व पछाडलेपण (आॅबसेशन) हे विकार निर्माण होतात. तेचते विचार मनात कारण नसतांना येणे व येत राहणे किंवा तीचती कृती अकारण करीत राहणे ही आॅबसेशनची लक्षणे आहेत. हा मुद्दा समजून घेण्यासाठी शेक्सपिअरच्या लेडी मॅकबेथ या नाटकातील तिच्या अशाच कृतीचे उदाहरण घेता येईल. ही महत्त्वाकांक्षी स्त्री आपल्या पतीकरवी राज्याचा खून करविते व त्याला राजपदी बसवून आपली राणी होण्याची महत्त्वाकांक्षा पूर्ण करते. पण आपले हात राजाच्या खुनामुळे रक्ताने बरबटलेले आहेत, हा विचार तिच्या मनातून काही केल्या जात नाही. म्हणून तिला येता जाता सतत हात धुण्याची सवय लागते, असे काहीसे चित्रण या नाटकात आहे. या निमित्ताने शेक्सपिअर आणि फाईड या दोघांच्याही निरीक्षण व निदान कौशल्याला दाद दिल्यावाचून राहवत नाही. पुढे फाईडच्या लक्षात आले की, असे अनुभव प्रत्यक्षात आले नसतील व हे कल्पनेचे खेळ असतील तरीही यांच्या दडपलेल्या आठवणींचा हाच परिणाम दिसून येतो. 'इडिपस काॅम्प्लेक्स' आणि 'इलेक्ट्रा काॅम्प्लेक्स' विषयक सिद्धांत स्फुरण्यास हे अनुभव कारणीभूत ठरले.
स्वप्नांचे महत्त्व लक्षात आल्यावर फ्राईडने स्वत:च्या व इतरांच्या स्वप्नाचा अधिक जोमाने अभ्यास करायला सुरवात केली. त्याने स्वप्नांचा उलगडा (इंटरप्रिटेशन आॅफ ड्रीम्स) या नावाचा ग्रंथच लिहिला. दडपलेल्या इच्छांच्या पूर्तींचे एक साधन असे स्वप्नांचे स्वरूप असते, असे तो मानतो. पण या इच्छा मूळ स्वरूपात जशाच्या तशा स्वप्नात येत नाहीत.अनेकदा या इच्छा संस्कृती, कायदे व नीतीनियम यांच्याशी सुसंगत नसतात. त्यामुळे एका नियंत्रक व्यवस्थेमुळे त्यांचे स्वरूप बदलून त्या इच्छा सोज्वळ( नियंत्रित- सेन्साॅर्ड ) स्वरूपातच स्वप्नात येतात. या सोज्वळ स्वरूपाचा उलगडा (इंटरप्रिटेशन)करून मूळ स्वरूपात त्या इच्छा काय आहेत, याचा शोध घेणे हे मानसशास्त्रज्ञाचे काम असते.
त्याने सायकोपॅथाॅलाॅजी आॅफ एव्हरी डे लाईफ, जोक्स ॲंड देअर रिलेशन टू दी अनकाॅनशस, थिअरी आॅफ सेक्शुॲलिटी असे ग्रंथ लिहून हातावेगळे केले. यानंतर पुढे फ्राईडने मनाची रचना स्पष्ट करणारी प्रतिकृती(नमुना- माॅडेल) तयार केली. यानुसार त्याने मनाचे तीन भाग कल्पिले आहेत. नेणीव( अनकाॅनशस),अर्ध- जाणीव( प्रिकाॅनशस) व जाणीव( काॅनशस) असे ते तीन भाग आहेत. ह्याला मनाची रचना दाखवणारी प्रतिकृती(टोपोग्राफिक स्कीम) असे याचे स्वरूप होते पण पुढे यात बदल करून फ्राईडने इ, इगो व सुपर इगो असे मनाचे तीन भाग कल्पिले.
इड हा मनाचा अबोध भाग (नेणीव) आहे. ही उत्तेजक शक्ती (इंपल्सिव्ह) आहे. हा मनाचा बालवत भाग आहे. बालमन ज्याप्रमाणे सुखापलीकडचा विचार करीत नाही, तसे याचे स्वरूप आहे. तो शक्तिस्रोत आहे. हा सर्व मूलभूत इच्छा, वासनांचा मूलस्रोत आहे. तात्काळ आनंद ( प्लेझर) आणि संतोष (ग्रॅटिफिकेशन) याच्याच मागे तो असतो.
सुपर इगो हा मनाचा सात्विक भाग आहे. तो चांगल्याशी/तत्त्वाशी तडजोड करायला तयार नसतो.
इगो हे आपले व्यावहारिक मन आहे. आपल्यातला 'मी' आहे. तो विवेकी आहे, समंजस आहे.
मनाची ही रचना समजण्यासाठी हिमनगाची उपमा उपयोगी पडेल. सुपरइगोम्हणजे हिमनगाचे पाण्याबाहेर दिसणारे टोक, इड म्हणजे हिमनगाचा पाण्यात बुडालेला महाकाय भाग आणि इगो म्हणजे हिमनगाचा एकीकडे पाण्याला तर दुसरीकडे हवेला स्पर्श करणारा भाग. खुद्द फ्राईडने मनाची रचना समजावून सांगण्यासाठी रथाचे उदाहरण घेतले आहे. इगो म्हणजे रथाचा सारथी व इड म्हणजे रथाचे घोडे. इगो (सारथी) रथाला दिशा देतो तर इड(रथाचे घोडे) आवश्यक ती उर्जा व शक्ती पुरवतात.
सुख, आनंद, तृप्ती या शिवाय दुसरे काहीही नाही हे इडच्या भूमिकेचे एक टोक आणि अव्यवहार्य नैतिकता, सदाचरण यांचा टोकाचा पुरस्कार यात सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यामुळे हा सदैव कात्रीत सापडलेला असतो. दैनंदिन व्यवहारात याची तारेवरची कसरत चालू असते. पण जेव्हा अतिरेक होतो, तेव्हा तो संरक्षक यंत्रणा/उपाययोजना ( डिफेन्सिव्ह मेकॅनिझमचा) यांचा वापर करतो.
नको असलेल्या व हानिकरक आवेगांपापसून( इंपल्सेस) पासून सुटका व्हावी किंवा त्याच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न म्हणून मानवी मन जे संरक्षक उपाय योजते त्यांना संरक्षक यंत्रणा (डिफेन्स मेकॅनिझम) असे नाव फ्राईडने दिले आहे. ही यंत्रणा नेणीव स्वरूपात असते. अशा प्रसंगी मानवी मन जाणीवपूर्वकही प्रयत्न करीत असते. ते भिन्न आहेत. अशी संकल्पना मांडणारा फ्राईड हा पहिला मानसोपचार तज्ञ आहे.
संरक्षक यंत्रणांचे हितकारक किंवा अहितकारक असे दोन्ही प्रकारचे परिणाम होत असतात. यापैकी काय घडावे हे परिस्थिती ( सरकमस्टंनसेस) व उपयोजनाची पुनरावृत्ती (फ्रिक्वेन्सी) यावर अवलंबून असते. या उपाययोजनेचे स्वरूप मानसिक पातळीवर नेणिवेत डावपेच किंवा व्युव्हरचनेसारखे( स्ट्रॅटेजी) असते. वस्तुस्थितीला हवेतसे वळण देणे, नाकारणे, बदलणे यासारखे उपाय योजून चिंता दूर करण्याचा तसेच अमान्य आवेग थोपवण्याचा हा मानवी मनाचा नेणीव पातळीवरचा प्रयत्न असतो.
संरक्षक यंत्रणांचे प्रकार
१. दडपून टाकणे(रिप्रेशन) या प्रकारात दु:खद भावना किंवा विचार जाणिवेतून गाडून टाकल्या/टाकले जाते. पण कधीकधी त्या प्रतीक स्वरूपात डोकावतातच.
२. स्वीकारणे( आयडेंटिफिकेशन) यात विचार किंवा वस्तूचा स्वीकार केलाजातो.
३. समजूत करून घेणे (रॅशनलायझेशन) कृती किवा हेतू यांच्या मुळाशी चांगला उद्देश आहे , असे समर्थन करणे.
या तिन्ही संरक्षण यंत्रणांच्या मुळाशी दडपून टाकणे हाच उद्देश असतो.
निरोगी व्यक्ती आयुष्यभर निरनिराळ्या संरक्षक यंत्रणांचा वापर करीतच असतो. जेव्हा त्यांचे स्वरूप व्यक्तीच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यावर प्रतिकूल परिणाम करू लागते, तेव्हा त्यांचे मानसिक रोगात परिवर्तन होते , समाज काय म्हणेल यांची चिंता व्यक्तीला नेहमीच असते. ही दूर करणे हा इगोने योजलेल्या संरक्षक यंत्रणांचा हेतू असतो. हा हेतू जेव्हा साध्य होत नाही तेव्हा मनोविकृती निर्माण होतात.
फ्राईडच्या मते इड मानवातील सहजप्रवृत्ती/अंत:प्रेरणा (इन्स्टिंक्ट)चे प्रतिनिधित्व करतो. आक्रमणाच्या मुळाशी मृत्यूची इच्छा(थॅनॅटाॅस किंवा डेथ इन्स्टिंक्ट) असते. तर लैंगिकतेच्या मुळाशी जीवेच्छा (इराॅस किंवा लाईफ इन्स्टिंक्ट) असते.
सामान्यत: कोणतीही व्यक्ती सुंदरीला पाहून मोहित होते. इडची भूमिका काहीही करून तिला प्राप्त करण्याची असते. तर सुपर इगो सामाजिक नीतीनियम व नैतिकतेच्या आधारे या भूमिकेला विरोध करतो. यामुळे इच्छा अतृप्त राहिल्यामुळे निर्माण होणारा ताण कमी करण्यासाठी इगो संरक्षक यंत्रणेचा आधार घेतो.
फ्राईडने मनाचे/व्यक्तिमत्त्वाचे इड, इगो व सुपर इगो असे तीन भाग मानले आहेत, हे आपण पाहिलेच आहे.
१. त्यातील इड हा नेणिवेतील जीवेच्छेचा/उर्जेचा साठा असून त्यातून सहजप्रवृत्ती किंवा अंत:प्रेरणा किंवा मानसिक प्रक्रियेला इंधन मिळत असते. इड हा पूर्णपणे स्वार्थी, पोरकट, सुखेच्छाप्रधान व अधिर असा मनाचा भाग आहे.
२. सुपरइगो हा चांगले वर्तन म्हणजे काय,वाईट वर्तन म्हणजे काय; चूकीचे वर्तन म्हणजे काय, बरोबर वर्तन म्हणजे काय, हे मापदंड ठरवणारा मनाचा भाग आहे. तो जाणिवेतील किंवा नेणिवेतील नीतीनियमांना मानणारा आहे.
३. इगो हा इडची सुखेच्छा व सुपरइगोचे नैतिक मापदंड यात समतोल साधणारा समीक्षक( माॅडरेटर) आहे. दोघांचेही समाधान व्हावे, असा त्याचा प्रयत्न सतत चालू असतो.त्याला स्थळकाळाचे बंधन असते.
प्राथमिक व द्वितीय स्तराच्या प्रक्रिया
अ) इगोमध्ये नेणीव व जाणीव अशा दोन्ही पातळींवर यतत कोणत्या नाही कोणत्या प्रक्रिया सुरूच असतात.
१.नेणिवेतील विचार प्राथमिक स्तरावर विस्कळीत, सुटे व असंघटीत स्वरुपाच्या असतात. भावना बदलत असतात, परस्पर विरोध असतो, पण संघर्ष नसतो. तरकाला थारा नसतो. लोभाची भावनाच प्रधान असते.
२. याउलट जाणिवेतील विचार प्रक्रिया द्वितीय स्तरावर सुरू असते. विचार सुसंघटित, संलग्न व एका चौकटीतच राहण्यासाठी लक्ष्मण रेषा आखलेल्या मर्यादेत असतात. जाणिवेतील विचार या ठिकाणी उगम पावतात/निर्माण होतात.
ब) इडमधील आवेग सुसंस्कृत समाजात मान्य होतील असे नसतात. वास्तवात येतांना त्यांना/सुखेच्छांना मुरड घालण्याची आवश्यकता असते. समाजात ते या स्वरुपातच मान्य होऊ शकतात.
क) मूल जसजसे मोठे होते तसतसा सुपरइगोचा विकास होत जातो. आईबाप व समाजाने घालून दिलेल्या नियमांचा/मापदंडांचा परिचय होऊ लागतो. सदसदविवेक बुद्धीचा विकास होऊ लागतो. चांगले काय व वाईट काय याची नोंद होऊ लागते. आदर्शाची कल्पना विकास पावू लागते. काय करणे चांगले/काय चालेल, काय निषिद्ध / चालणर नाही याबद्दलचे ठोकताळे तयार झालेले असतात.
इगो संरक्षक यंत्रणा (डिफेन्स मेकॅनिझम) चा वापर कसा करतो?
चिंता जेव्हा पराकोटीला पोचते तेव्हा इगो संरक्षक यंत्रणांचा (डिफेन्स मेकॅनिझम) अवलंब करतो. कारण व्यक्तीचे संरक्षण करणे हे इगोचे काम असते. अपराधीपणाचा भाव निर्माण होणे, लाजीरवाणे वाटणे, शरमिंधे होणे हे चिंतेपाठोपाठ येणारे प्रकार आहेत.
येऊ घातलेल्या संकटाची चाहूल चिंतेद्वारे लागते. यामुळे समतोल ढळतो. यावर मात करण्यासाठी संरक्षक उपाययोजना केली जाते. इडद्वारे निर्माण झालेले आवेग शिष्टसंमत स्वरुपात बदलले जातात किंवा जाणीव किंवा नेणीव त्यांना थोपवते.
संरक्षक यंत्रणांचे वर्गीकरण
यांची संख्या तशी अगणित आहे. फ्राईडची कन्या ॲना फ्राईडने यांचे दहा ठळक प्रकार नोंदवले आहेत
१. दडपणे ( रिप्रेशन) - एखादी भावना सामाजिक मापदंडाला अनुसरून नसेल तर ती जाणिवेतून नेणिवेत हकलली जाते व लपवली जाते.
२. परत फिरणे(रिग्रेशन) - लहानपणीच्या शारीरिक वा मानसिकविकासअवस्थेत जाणे अवस्थेत जाणे, अशा अवस्थेमुळे इतरांच्या फारशा अपेक्षा असत नाहीत व त्यामुळे सुरक्षित वाटते.
३. प्रतिक्रिया निर्माण होणे (रिॲक्शन फाॅर्मेशन) - एखाद्या स्त्रीच्या मनात पतीव्यतिरिक्त दुसऱ्या व्यक्तीबद्दल प्रेम निर्माण झाले असेल तर ती आपल्या पतीवर अवाजवी प्रेम करू लागते.
४. बहिष्कार ( आयसोलेशन) - स्वत:ला जगापासून अलिप्त/वेगळे करणे/ठेवणे
५. नाश करणे ( अनडुइंग) - सामाजिक दृष्ट्या आक्षेपार्ह विचीर मनातून काढून टाकणे
६. प्रक्षेपण (प्रोजेक्शन) - समाजमान्य नसलेल्या भावनेला समाजमान्य स्वरुपात रुपांतरीत करणे
७.(इन्ट्रोजेकशन) -.दुसऱ्या व्यक्तीचे विचार/ स्वभावगुण आपले म्हणून स्वीकारणे
८. आत्मविरोध ( टर्निंग अगेन्स्ट वन्स ओन पर्सन) - स्वत:च आपल्या विरोधी भूमिका घेणे.
९. विरोधी भूमिका घेणे ( रिव्हर्सल इनटु दी आॅपोझिट) - आपल्यायला जे मनापासून योग्य वाटते, त्याच्या पूर्णपणे विरोधी भूमिका घेणे.
१०.सूप्त होणे( सब्लिमेशन ) किंवा विस्थापन (डिसप्लेसमेंट) - समाजमान्य पद्धतीने भावना व्यक्त करणे.
यांचा अर्थ बारकाईने लक्षात घेतल्या तर त्यात परस्पर साम्य, एक दुसरीला स्पर्श करणे असे प्रकार आढळतील. हा फरक अनेकदा मूलभूत नसतो तर प्रमाणाचाही(डिग्रीचा) असतो. या संरक्षक यंत्रणा जोपर्यंत तीव्र, समाजविघातक, समाजविरोधी नसतात, तोपर्यंत तिकडे कुणाचे लक्षही नसते.पण ही लक्ष्मण रेषा ओलांडली गेली की, त्याची नोंद व दखल सगळ्यांनाच घ्यावी लागते. सहनशीलता हाही संरक्षक यंत्रणेचाच प्रकार मानला जातो. यावरून यांची व्यापकता व विस्तार यांची कल्पना येऊ शकेल.

गूगलवर काही शोधात असताना हा आपला लेख सापडला. खूप सुंदर आणि अभ्यासपूर्ण लेख आहे. आपली लेखन शैली मला फार आवडली. सप्रेम नमस्कार सर!
ReplyDeleteजमले तर ह्या ब्लॉगला जरुर भेट द्या:
'विवेक' म्हणजे काय?
http://abideinself.blogspot.in/2013/01/blog-post.html
आस्तिक आणि नास्तिक, एकाच नाण्याच्या दोन बाजू:
http://abideinself.blogspot.in/2013/11/blog-post_8.html
सत्य... स्वयंप्रकाशीत आहे
http://abideinself.blogspot.in/2011/08/blog-post.html