प्लॅसिबो, नॅसिबो आणि श्रद्धा
वसंत गणेश काणे,
बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्च्या टाकीजवळ,
नागपूर ४४० ०२२
(०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०
E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee?
जादूटोणा विधेयक पारित करणारे महाराष्ट्र हे भारतातले पहिले राज्य आहे. फसवेगिरी, भोंदूपणा, लबाडणूक, अंधश्रद्धा यांना पायबंद बसलाच पाहिजे, याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. पण नुसता कायदा करून प्रश्न सुटत नसतात. कायद्याची अंमलबजावणी कशी होते, हेही तेवढेच महत्त्वाचे असते. या कायद्याची अंमलबजावणी व्यवस्थितपणे होईल, असा विश्वास आपण बाळगू या.
प्लॅसिबो म्हणजे काय?
पण या निमित्ताने दुसरीही एक बाजू समोर येते आहे. या बाबीचा अभ्यास मानसशास्त्र अनेक वर्षांपासून करीत आहे. याला ‘पलॅसिबो’असे नाव आहे. या प्रकाराची माहिती आणि महती सर्वसामान्यांना होण्याचीही आवश्यकता आहे. हा शब्द लॅटिन भाषेतून आलेला आहे. लॅटिन भाषेतील मूळ शब्दाचा अर्थ आहे, ‘मी तुझे समाधान करीन’.( आय शॅल प्लीज यू, असे इंग्रजीत म्हणता येईल). ‘प्लॅसिबो इफेक्ट’, याचा अर्थ ‘रुग्णाला बरे वाटते’, असा करता येईल. विषय समजावा म्हणून तेवढ्यापुरतीच व्याख्या करायची झाली तर असा पदार्थ( किंवा असे काहीतरी) की ज्यात मुळात औषधी गुणधर्म नाही पण तरीही त्याच्या सेवनाने बरे होण्याची इच्छा रोग्याच्या मनात प्रबळ होते व तो खरोखरच बरा होतो. मुळात हा पदार्थ मात्र निष्क्रिय (इन ॲक्टिव्ह) असतो. पण रोग्याची समजूत, ते एक औषध आहे, अशी असते.
असाही एक प्रयोग
या पदार्थाची परिणामकारकता जोखण्यासाठी शास्त्रज्ञांनी प्रयोग केले आहेत. एक प्रयोग उदाहरणादाखल घेता येईल.रक्तदाबाचे पन्नास रुग्ण घेऊन त्यांचे प्रत्येकी पंचेवीसचा एक असे दोन गट केले. एका गटाला रक्तदाब कमी करणारे औषध दिले तर दुसऱ्या गटाला एक निष्क्रिय पदार्थ औषध म्हणून दिला. औषधिशास्त्रात याला खोटी/बनावट पद्धत ( शॅम प्रोसिजर) असे म्हणतात. काही दिवसांनी रुग्णांची तपासणी केल्यास, ज्यांनी खरोखरचे औषध घेतले त्यांच्या रक्तदाबात जशी सुधारणा झालेली आढळली, तशीच सुधारणा दुसऱ्या गटातील रुग्णांमध्येही झालेली आढळली. त्यांनी तर औषध घेतले नव्हते. एक साधा/निष्क्रिय पदार्थ औषध म्हणून घेतला होता. मग असे का व्हावे? या पदार्थाचा उपयोग रुग्णाची ‘बरे होण्याची इच्छा’ बळावण्यासाठी होतो, असे मानतात. साध्या गोळ्या, साधे पाण्याचे इंजेक्शन, लुटुपुटूची शस्त्रक्रिया(शॅम सर्जरी) यांचा उपयोग करूनही रोग्याला बरे वाटते, असा अनुभव आहे. रोग्याला मात्र खरीखुरी उपाययोजना केली जाते आहे, असे सांगितले जाते. यालाच ‘प्लॅसिबो इफेक्ट’, असे म्हणतात
नैतिक की अनैतिक ?
व्यक्तीच्या आरोग्यावर समज/आकलन (परसेप्शन) आणि मेंदूची भूमिका (ब्रेन रोल) यांचा परिणाम होत असतो, असे यावरून दिसते. मग वस्तुस्थिती काही का असेना. पण प्लेसिबोला एक उपचार पद्धती म्हणून शास्त्रज्ञांचा विरोध आहे. औषध म्हणून वापरला जाणारा पदार्थ आणि उपचार पद्धती याला ‘प्लॅसिबो’ हे एकच नाव प्रचारात आहे. प्रयोगशाळेत केलेला एक प्रयोग म्हणून याला मान्यता देता येईल. पण एक उपचार पद्धती म्हणून नैतिक दृष्ट्या याला मान्यता देता यायची नाही. कारण यात उपचारकर्ता - डॅाक्टर- व रुग्ण यांच्या संबंधात फसवणूक( डिसेप्शन) आणि अप्रामाणिकपणा (डिसआॅनेस्टी) यांना स्थान असू नये, असा आग्रह असतो, हे आहे. प्लॅसिबोचे यश रुग्णाच्या फसवले जाण्याच्या प्रमाणावर (डिग्री आॅफ पेशंट डिसेप्शन) अवलंबून असते. ते अविश्वसनीय (अनरियायेबल) व अंदाज बांधता न येणारे (अनप्रेडिक्टेबल) असते.
पण ज्या गोष्टीमुळे रुग्णाला बरे वाटते तिचा उपयोग/वापर न करणे, ही बाबही नैतिकतेला कितपत धरून आहे? हाही प्रश्न उपस्थित होत नाही का? अर्थात उपचार पद्धतीचा एकमेव प्रकार म्हणून ही पद्धत वापरू नये, हे मात्र मान्य करावयासच हवे, यात शंका नाही.
प्लॅसिबो - संशोधनाची एक पद्धत
रुग्णविषयक संशोधनात मात्र प्लॅसिबोला विशेष महत्त्व आहे. वेदनाशमनाच्या बाबतीत तर प्लॅसिबोचे महत्त्व जाणवण्याइतपत महत्त्वाचे ठरले आहे. मात्र प्लॅसिबोचा परिणाम कसा आणि किती व्हावा ही बाब व्यक्तिपरत्वे वेगवेगळी असल्याचे आढळते. तसेच रोगपरत्वेही फरक आढळून येतो. काही रोगांवर प्लॅसिबोचा परिणाम लवकर व भरपूर होतो तर इतर रोगांचे बाबतीत तसे होत नाही. प्लॅसिबोचा परिणाम प्राणिमात्रांवरही होताना आढळतो. प्लॅसिबोचा उपयोग करून शरीरात निरनिराळ्या हार्मोन्सची निर्मिती करता येते तसेच त्याचे प्रमाणही नियंत्रित करता येते.
प्लॅसिबोवर परिणामकरणारे घटक
प्लॅसिबोचा जास्तीतजास्त परिणाम होण्यासाठी काही घटक महत्त्वाचे असतात. डाॅक्टर व पेशंट यात किती प्रमाणात भावनिक बंध, संबंध व विश्वास आहे, यावर परिणाम कमी किंवा जास्त होणे अवलंबूनअसते. मानसशास्त्रात ‘कंडिशनिंग’ नावाची एक अवस्था मानली जाते. जसे एखादा पदार्थ अमली आहे, हे जाणवून दिले, तर त्यामुळे दारूसारखी नशा चढते.पण तेच वस्तुस्थिती वेगळी होती, असे पटवून देता आले, तर ती नशा लगेच उतरते सुद्धा. प्लॅसिबोची परिणामकारकता रंग व आकार यावर सुद्धा अवलंबून असते. ऊष्ण रंगाच्या ( हाॅट कलर्ड - जसे लालभडक रंगाच्या) गोळ्या, शीत रंगाच्या ( कूल कलर्ड- जसे हिरव्या रंगाच्या) गोळ्यांपेक्षा अधिक परिणाम करणाऱ्या असतात. गोळ्यांपेक्षा कॅपशूल्सचाही परिणाम अधिक होताना दिसतो. तसेच आकाराचेही आहे. मोठ्या आकाराच्या गोळ्या अधिक परिणामकारक ठरतात.
नॅसिबो म्हणजे काय?
प्लॅसिबोचा परिणाम सकारात्मक तसाच नकारात्मकही होतो. समज आणि अपेक्षा कशा आहेत, यावर हे अवलंबून असते. या पदार्थामुळे वाईट घडणार आहे, असा समज असला किंवा झाला तर नकारात्मक परिणामही होतात. या प्रकाराला नॅसिबो असे म्हणतात.मुळात हा शब्दही प्लॅसिबो या शब्दाप्रमाणे लॅटिन असून त्याचा अर्थ ‘मी अपाय करीन’( आय विल हार्म) असा आहे.जुन्या काळातील कथांमध्ये आपण ‘शाप’ आणि ‘वर’ या गोष्टी ऐकल्या आहेत.यांची नॅसिबो आणि प्लॅसिबोशी तुलना करण्याचा मोह आवरत नाही.
नॅसिबो व प्लॅसिबो हा विषय अनेक ग्रंथांनाही आवरणार नाही, असा या विषयाचा आवाका मोठा आहे. पण शरीराला होणाऱ्या व्याधींवर औषधाप्रमाणे मन व बुद्धी त्या व्याधींकडे कशाप्रकारे पाहतात, यावरही व्याधी बरे होणे न होणे अवलंबून असते, हे मान्य होण्यास हरकत नसावी. ( जुने लोक ‘त्याला रोगाची भावना झाली’, असा शब्दप्रयोग करून आजारपणाचा उल्लेख करीत, असे आठवते)
श्रद्धेचे महत्त्व
एक हलकेफुलके उदाहरण आपल्याला विचार करायला प्रवृत्त करील, असे वाटते. सचिन आणि सुप्रियाचा ‘नवरा माझा नवसाचा’ हा विनोदी चित्रपट बहुतेकांना आठवत असेल. गणपती पुळ्याला स्वत: विवस्त्रावस्थेत न जाता एक पुतळा नेऊन नवस फेडला तरी चालेल, हे सांगणारा ‘साधू’ प्रत्यक्षात एक नट होता आणि त्याने सांगितलेला उपाय हा एक खोटेपणाचा आणि भोंदूपणाचा प्रकार होता, हे सांगितल्यावर सुप्रियाने व्यक्त केलेली प्रतिक्रिया अंतर्मुख करायला लावणारी आहे. ती म्हणते, ‘ तो साधू भोंदू असेल,पण माझी श्रद्धा खरी आहे. म्हणून तुम्ही हा नवस फेडाच’. परिणाम होणे न होणे हे साधूच्या खरेखोटेपणापेक्षा स्वत:ची श्रद्धा आणि विश्वास यावर अवलंबून असते, असे तिला सुचवायचे होते. दगडाला देवत्त्व प्राप्त करून देण्याची किमया भक्तालाच साध्य असते. म्हणूनच तर देव भक्तासाठी काहीही करायला तयार होत नसेल ना?

No comments:
Post a Comment