भारतीय गृहिणी म्हणजे राजकन्या
वसंत गणेश काणे
केलीला दोन मुले आहेत. ती आळीपाळीने तिच्याजवळ किंवा तिच्या घटस्फोटित नवय्रासोबत राहतात. केलीला पाठीच्या कण्याचे दुखणे आहे. ओळीने तिची सात, आठ आॅपरेशन्स व्हायची आहेत. तीनचार आॅपरेशन्स झाली आहेत. तेवढीच व्हायची आहेत. ही आॅपरेशन्स खूपच वेदना देणारी असतात. तिला आॅपरेशनसाठी दवाखान्यात दाखल व्हावे लागते, तेव्हा तिची मुले आमच्याकडेच असायची. शस्त्रक्रिया झाली की, तिला लगेच डिस्चार्ज मिळतो. घरी येताच ती स्वत:ला कामाला जुंपून घेते. इथे घरगडी मोलकरणी नसतातच, असे म्हटले तरी चालेल. धुणी भांडी, केरवारे, स्वयंपाक घरीच करायच्या गोष्टी आहेत. अर्धे अधिक अन्न अर्धे शिजवलेलेच असते. पोळ्यांऐवजी ब्रेड असते. बाजारातून आणलेले पदार्थ तळले, भाजले, परतले, उकडले की मीठ मिरपूड टाकून जेवण तयार. घरच्या घरी धुणीभांडी करावी लागतात पण दिमतीला डिश वाॅशर वाॅशिंग मशीन सज्ज असतात. वीज जात नाही. शिवाय खरकटी भांडी खरकटे काढून विसळणे, डिश वाॅशर लोड करणे (डिश वाॅशर मध्ये भांडी नीट रचावी, लटकवावी, मांडावी लगतात ), अनलोड करून भांडी जागच्या जागी लावणे हे काम नवरोजीचेच असते. तरीही गृहिणीवर घरकामाचा ताण पडतोच आणि तो तसा पडणारही. त्यामुळे धुणीभांडी, झाडूपोचा या व अशा कामांसाठी मोलकरीण किंवा मोलकरणी दिमतीला असलेल्या भारतीय गृहिणींची तुलना अमेरिकन गृहिणी कथेतल्या राजकन्येशीच करतात. 'जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे', हे त्यांना सांगूनही पटत/समजत नाही. त्यामुळे 'दुरून डोंगर साजरे', या अर्थाची एखादी म्हण इंग्रजीत आहे का, याचा शोध येथील भारतीय गृहिणी घेत आहेत, असे ऐकतो.
No comments:
Post a Comment