राजकारण, राज्यकारभार (गव्हर्नन्स) आणि शिक्षणाचे धोरण
वसंत गणेश काणे
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या पदव्यांवरून कायमच वाद राहिला. पण, त्यांनी आता देशातील युवावर्गासाठी अमेरिकेची पदवी मिळविण्याची योजना आणण्याचा विचार केलाय. त्यांच्या प्रयत्नांना यश आले तर भारतीय विद्यार्थी आपल्या देशात बसूनच जगभरातील कोणत्याही मोठय़ा विद्यापीठाच्या वर्गांना हजेरी लावू शकतील आणि परीक्षा देऊन तेथील पदवीही मिळवू शकतील.
'स्वयं' असे या योजनेचे नाव आहे. याअंर्गत मनुष्यबळ विकास मंत्री स्वत: काही निवडक अभ्यासक्रम ऑनलाईन सुरू करणार आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रम तयार करण्याच्या कामी मंत्रालय अमेरिकी विद्यापीठासोबतच आयआयटी आणि आयआयएमसारख्या देशातील आघाडीच्या संस्थांचीही मदत घेत आहे. मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की, 'स्वयं'चा विस्तारित रूप 'स्टडी वेब ऑफ अँक्टिव्ह लर्निंग फॉर यंग एस्पायरिंग माइंड्स असे आहे. यासाठी पार्श्वभूमी तयार झाली आहे. सर्वप्रथम यातील अभ्यासक्रम निवडले गेले. आता त्यांना अंतिम रूप दिले जात आहे. लवकरच हा कार्यक्रम औपचारिकरीत्या सुरू होईल. यात अभियांत्रिकी, व्यवस्थापन, विज्ञान आणि सामाजिक विज्ञान या शाखांमधील अनेक अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले जाणार आहेत. कोणीही व्यक्ती यात रजिस्ट्रेशन करून या ऑनलाईन अभ्यासक्रमांचा फायदा घेऊ शकणार आहे. सोबतच अगदी वाजवी शुल्क देऊन यासाठी प्रमाणपत्रही मिळवू शकणार आहे.
अर्थात, जगभरातील विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांचा यात विचार करण्यात आला असला तरी याची रचना भारतीय विद्यार्थ्यांना डोळय़ासमोर ठेवूनच करण्यात आली आहे. याचे मुख्य सर्व्हर भारतातच असेल. याला सरकारी मान्यताही असेल. आगामी काही वर्षात ही योजना लोकप्रिय होईल अशी सरकारला आशा आहे.
No comments:
Post a Comment