अमेरिकन स्त्रीचे हिंदू नाव
वसंत काणे
नीलमच्या ओळखीची एक अमेरिकन स्त्री आहे. ती व्यवसायाने नर्स असून घटस्फोटिता आहे. तिने बहुदा इस्कॅान फाऊंडेशन किंवा चिन्मय मिशनच्या सहकार्याने हिंदू धर्म स्वीकारला आहे. तिला आम्ही हिंदुस्थानातून रुद्राक्षाची माळ भेट म्हणून दिली होती. धर्म परिवर्तनानंतर तिने आपले मूळचे 'केली' हे नाव बदलून हिंदू नाव स्वीकारले होते. पण तिची एक खूप मोठी अडचण होती. तिला आपले नाव उच्चारताच येत नसे. तिचे जुने परिचित व आप्तेष्ट तिला जुन्याच 'केली' या नावाने हाक मारीत. पण आपल्या नवीन नावाचा आपल्याला उच्चारही करता येऊ नये, याचे तिला सारखे वैषम्य वाटत असे. तिच्या गुरूने तिला एकदा तिचे नाव कसे उच्चारायचे ते सांगितलेही होते. पण ते ती विसरून गेली होती. तिला दुसरीही एक गोष्ट माहीत होती ती ही की, प्रत्येक हिंदू नावाला अर्थ असतो. आपल्या नावाचा अर्थ काय आहे हेही तिला जाणून घ्यायचे होते. गुरू आता बरेच दूर राहत असल्यामुळे भेटी होत नव्हत्या. त्यामुळे तो मार्ग खुंटला होता.
आम्ही भारतीय म्हणून तिने आम्हाला तिचे नाव कसे उच्चारायचे आणि त्याचा अर्थ काय ते विचारले. तिने तिचे नाव आपल्या परीने उच्चारूनही दाखविले पण आम्हालाही काही बोध होईना. 'कशमा' असा काहीसा उच्चार ती करीत होती. तोही तिला धड उच्चारता येत नव्हता. बराच वेळ विचार केल्यानंतर आम्हाला एक कल्पना सुचली. तुझ्या नावाचे स्पेलिंग करून सांगता येईल का, असे विचारताच तिने पटकन स्पेलिंग लिहून दाखविले. ते होते 'के एस एच ए एम ए'. 'क्षमा' आम्ही चटकन ओळखले. पण तिला हा शब्दच उच्चारता येत नव्हता. त्यावर उपाय म्हणून जिभेला बरीच वेडीवाकडी वळणे देत तिने प्रयत्न चालवला होता. 'क्ष' या अक्षराचा उच्चार तिला काही करता येईना. शेवटी तो नाद तिने सोडला. 'ते जाऊ द्या', पण याचा अर्थ काय? आम्ही आपल्या परीने तिला दया, क्षमा, शांती या तत्त्वत्रयींचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला. हे मात्र तिला कळले. काही संकल्पनांना देशकालाचे बंधन नसते, हे या निमित्ताने जाणवले

No comments:
Post a Comment