Wednesday, February 3, 2016

सुर्यानेल्लीचे निर्भयाला दुसरे पत्र
            वसंत गणेश काणे
हल्ली मुक्काम पुणे
९४२२८०४४३०
निर्भये,
माझे हे तुला दुसरे पत्र. गेल्यावेळेला पाठविलेल्या पत्रात तुला माझी अगतिकताच तुला जाणवली असणार. त्या पत्रात ‘तू गेलीस आणि सुटलीस’ आणि मी मात्र कोर्टकचेरीत बलात्कारित स्त्रीच्या वाट्याला काय काय आणि कोणकोणते भोग येतात याचेच रडगाणे गायल्याचे तुला आठवत असेल. शरीराच्या आणि मनाच्या विव्हल अवस्थेत मी पार खचून गेले होते, हे खरे पण मी स्वत:ला सावरले आणि हिमतीने लढण्याचा निश्चय केला. आपल्या देशाच्या न्यायव्यवस्थेवर विसंबून मी बळेच खंबीरपणा धरण केला केला. मी टाकलेला विश्वास फलद्रूप झाला आणि केरळ उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती के ती शंकरन आणि एम एल जोसेफ यांनी मुख्य आरोपी राजू याला – माझ्या एकेकाळच्या प्रियकराला – मला चाळीस नराधमांपुढे पैशाच्या मोबदल्यात लचके तोडण्यासाठी फेकणाऱ्या दानवाला   जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. य प्रकरणी यावेळी न्यायासनापुढे एकूण ३६ आरोपी होते. यापैकी पाच जणांना देवानेच शिक्षा म्हणून मृत्यूदंड दिला आणि यमसदनी पाठविले.आता उरले होते ३१ नराधम. त्यांच्यापैकी कसे कुणास ठाऊक पण सात आरोपी करूनसवरूनही निर्दोष सुटले.उरलेल्या २४ आरोपींपैकी मुख्य आरोपी –माझा एकेकाळचा प्रियकर - याला जन्मठेपेची शिक्षा झाली. इतरांचे अपराधांचे स्वरूप आणि प्रकार वेगवेगळे मानून ५ ते १३ वर्षापर्यंतच्या कैदेची शिक्षा झाली. याशिवाय त्यात्या प्रमाणात दंडाची शिक्षासुद्धा ठोठावण्यात आली.
    केरल प्रांतातील इडुक्की गावातली सुर्यानेल्ली नावाची मी एक शाळकरी मुलगी. एका बस चालकाच्या प्रेमात पडले आमच्या प्रेमाच्या आणाभाका झाल्या, लग्नानंतर तुला दागिन्यांनी मढवीन असे वचन त्याने मला दिले होते. प्रेम अंधळे असते पण हा तर अंधालेपणाचा कळसच होता, असे मला वाटते, आहे.१६ जानेवारी १९९६ हाच तो माझ्या आयुष्यातील काळाकुळकुळीत दिवस. याच दिवशी माझे अपहरण झाले माझी पहिली खरेदीदार उषा नावाची एक महिलाच असावी, याबद्दल काय म्हणावे? माझा दुसरा खरेदीदार होता एक कायदा जाणणारा वकील. सतत चाळीस दिवस माझी केरळ आणि तमिळनाडू प्रांतात एकूण ३ हजार किलोमीटरची फरफट झाली. या काळात एकूण ३६ नराधमांनी माझे लचके तोडले आणि नंतर माझा ‘उपयोग’ राहिलेला नाही असे ठरवून मला अक्षरश: रस्त्याच्या कडेला २६ फेब्रुवारी १९९६ ला फेकून दिले. ही ससेहोलपट मी ३६ वेळा कोर्टात सांगितली म्हणून माझ्या लक्षात राहिली असे नाही. हे दुष्ट स्वप्न मला प्रतिक्षणी भेडसावत असते.      
    ‘सुर्यानेल्ली ही बहकलेली मुलगी नव्हती. ती बालवेश्या तर मुळीच नव्हती. ती बालवयात राजूवर प्रेम करीत होती, हे खरे  ती दागिन्यांना भुलली होती, हे देखील खरे, तसेच तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही, हेही खरे, पण म्हणून ती चाळीस दिवस अत्याचार सहन करीत राहिली, असा याचा अर्थ नाही, या सर्व प्रकाराला तिची संमती होती, असे मानता येणार नाही,’ असे उच्च न्यायालयाने आपल्या निकालपत्रात म्हटले असून बचावपक्षाचा युक्तिवाद सपशेल फेटाळला असून मला न्याय दिला आहे.

२००५ साली न्यायालयाने ३६ पैकी ३५ आरोपींना सोडले होते. राजूची जन्मठेपेची शिक्षा रद्द करून त्याला फक्त पाच वर्षांच्या कैदेची शिक्षा दिली होती. पण य निर्ण्याविरूद्ध शासन सर्वोच्च न्यायालयात अपिलात गेले सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी ‘एक खास पीठ’ स्थापन करण्याचे आदेश दिले. मधल्या काळात राजू फरार झाला होता. पण एका बेसावध क्षणी तो टीव्ही चॅनेलला मुलाखत देण्यास तयार झाला. १५ फेब्रुवारी २०१३ ला त्याला जेरेबंद करण्यात आले आणि नुकतीच त्याला जन्मठेपेची आणि इतरांना ३ ते १३ वर्षांच्या कैदेची शिक्षा झाली. अशा प्रकारे मला १८ वर्षानंतर न्याय मिळाला. निर्भये, अशी आहे माझी कर्मकहाणी! आज मला न्याय मिळाल्याचे समाधान  आहे.पण सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की, माझे हे दुदैवाचे दशावतार ऐकून ‘माझ्यासारख्या’ माझ्या बहिणींनी वेळीच सावध व्हावे, आणि स्वप्नरंजनात बुडून जाऊ नये, खोट्यानाट्या भूलथापांना बळी पडू नये, असा माझा त्यांना सावधानतेचा आणि  कळकळीचा इशारा आहे.

No comments:

Post a Comment