Wednesday, February 3, 2016

सावधानता तुझे दुसरे नाव अमेरिका.

सावधानता तुझे दुसरे नाव अमेरिका.
वसंत गणेश काणे,    
बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्च्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२  
(०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०  
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा यांचे १३ जानेवारी २०१६ ला अमेरिकन संसदेच्या दोन्ही सभागृहातील सर्व सदस्यांसमोर आपल्या आठ वर्षाच्या कारकिर्दीतील अखेरचे निरोपाचे भाषण होते. या भाषणाला उपाध्यक्ष ज्यो बिडनही उपस्थित होते. तसाच वाईट प्रसंग ओढवला व अण्वस्त्र हल्ल्यात सर्वच गारद झाले तर अध्यक्षाच्या तोडीचा निदान एक तरी सदस्य कार्यभार सांभाळण्यासाठी व कारभारात सातत्य राखण्यासाठी उपलब्ध असावा म्हणून असा सदस्य या किंवा अशा प्रकारच्या अन्य सभेला/ कार्यक्रमाला येत नाही. त्याला दूर अज्ञात स्थळी, सुरक्षित ठेवले जाते. अध्यक्षाइतकीच सुरक्षा त्याला या काळात प्रदान केली जाते. अशा सदस्याला ‘डेसिग्नेटेड सर्व्हायव्हर’ असे नाव आहे. यावेळी गृहखात्याचे सुरक्षा सचिव जे जाॅनसन हे डेसिग्नेटेड सर्व्हायव्हर होते. ते या सभेत उपस्थित नव्हते. शीतयुद्धाच्या काळात अमेरिका व रशिया एकमेकावर सतत गुरगुरत असत. एकमेकांना अण्वस्त्र हल्ल्याची धमकी देत असत. तेव्हापासून सावधानतेची बाब म्हणून सुरू असलेली ही प्रथा आता जवळजवळ पस्तीस वर्षे अव्याहतपणे सुरू आहे. ‘इटर्नल व्हिजिलन्स इज दी प्राईस आॅफ लिबर्टी’, स्वातंत्र्यासाठी सतत जागरूक राहण्याची किंमत चुकवावी लागते, ती अशी.

No comments:

Post a Comment