Wednesday, February 3, 2016


 विनोद अमेरिकन स्टाईल
वसंत काणे
शास्त्रीय गुपिते पळवण्यात चीनचा हात कुणीही धरू शकत नाही. त्यामुळे अमेरिकेला चीन बरोबर व्यापारी संबंध ठेवतांना आपली गुपिते सुरक्षित कशी राहतील याची सतत काळजी वाटत असते. हा मुद्दा स्पष्ट करणारा एक विनोदी किस्सा इतके दिवस झाले तरी आजही अमेरिकेत सांगितला जातो.
   अकरा सप्टेंबर २००१ ला अतिरेक्यांचे एक विमान पेंटॅगोनवरही धडकले होते. इमारतीची पडझड झाली होती. अमेरिकेचे त्यावेळचे अध्यक्ष बुश यांना चीनच्या प्रधानमंत्र्यांचा सहानुभूतीपर फोन आला.
'पेंटॅगॅान  इमारतीची  बरीच पडझड झाली असेल, नाही का!' चीनचे प्रधानमंत्री बोलत होते.
'होय ना!', असे म्हणून बुश थांबले.
'अनेक महत्त्वाच्या फायली/कागदपत्रे नष्ट झाली असतील, नाही?', चीनच्या पंतप्रधानांनी एकदम मुद्यालाच हात घातला. 
 'होय ना', बुशना कबूल करण्याशिवाय गत्यंतरच उरले नव्हते. 'खूपच नुकसान झाले आहे. कधीही भरून येणार नाही, असे नुकसान झाले आहे. लष्करी गुपिते असलेली महत्त्वाची कागदपत्रे कायमची नष्ट झाली आहेत', बुश काळजीच्या स्वरात बोलत होते.
' काही काळजी करू नका. कोणकोणती कागदपत्रे/गुपिते नष्ट झाली आहेत, ते कळवा. त्यांच्या कॅापीज आमच्या जवळ आहेत', चिनी पंतप्रधानांनी आश्वासन दिले. हा निव्वळ विनोदी किस्सा की आणखी काही?
     . 

No comments:

Post a Comment