Wednesday, February 3, 2016





ज्ञानेश्वर विद्यापीठ
सध्या ज्ञानेश्वर विद्यापीठ चर्चेत आहे. काय  आहे हे विद्यापीठ? तर 'शिक्षण हा प्रत्येक व्यक्तीचा हक्क आहे', हे ध्येय (मोटो) समोर ठेवून १९८० साली एका खाजगी शिक्षण विश्वस्त मंडळाने (ट्रस्ट) त्ची स्थापना केली असून ते बोर्ड अॅाफ इम्प्लिमेंटेशन  सेल्फ एम्प्लॅासमेंट स्कीम ॲाफ गव्हर्मेंट ॲाफ महाराष्ट्र व कॅलिफोरनिया युनिव्हर्सिटी एफसीइ शी संलग्न आहे. पुणे आणि मंबई पुरते याचे कार्यक्षेत्र मर्यादित आहे. सोसायटीज रजिस्ट्रेशन ॲक्ट१८६० आणि बॅाम्बे पब्लिक ट्रस्ट ॲक्ट १९५० नुसार ते पंजीबद्ध आहे. डॅा.एम. डी. आपटे यांनी संत ज्ञानेश्वरांच्या नावे सुरू केले असले तरी त्याला व्यावसायिक पदवी देण्याचा अधिकार नाही. त्याला ए आय सी टी ई किंवा डायरेक्टोरेट ॲाफ टेक्निकल एज्युकेशनशी मान्यता नाही. २००५ मध्ये मुंबई ऊच्च न्यायालयाने त्याला व्यावसायिक पदवी देण्याचा अधिकार नाही व यापूर्वी त्याने प्रदान केलेल्या पदव्या अवैध ( इनव्हॅलिड) आहेत, असा निर्णय दिलेला आहे.
संगणक तज्ज्ञ डॅा विजय भटकर २००१ पर्यंत या विद्यापीठाचे कुलगुरू होते. तसेच मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू स्नेहलता देशमुख या गव्हर्निंग काऊन्सिलच्या सदस्या होत्या.
१९९२ साली  आठव्या पंच वार्षिक योजनेत ज्ञानेश्वर विद्यापीठाच्या उपक्रमाची स्तुतीपर (ॲप्रिशिएटेड) दखल घेण्यात आली होती. १९९५ मध्ये नॅार्थ कॅरोलिना ॲग्रिकल्चरल ॲँड टेक्निकल स्टेट युनिव्हर्सिटी चे प्रतिनिधी डॅा. अजित केळकर यांनी ज्ञानेश्वर विद्यापीठास भेट देऊन संयुक्त प्रयत्न (कोलॅबोरेशन) ची शक्यता आजमाऊन पाहिली होती. या विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विषयाच्या अभ्यासक्रमांना महाराष्ट्र सेल्फ एम्पॅायमेंट ट्रेनिंग बोर्ड (बोर्ड अॅाफ इम्प्लिमेंटेशन  सेल्फ एम्प्लॅासमेंट स्कीम ॲाफ गव्हर्मेंट ॲाफ महाराष्ट्र) आणि महाराष्ट्र शासन यांची मान्यता होती.
आठव्या नियोजन  आयोगाच्या अहवालात असे म्हटले आहे की, ए आय सी टी ई ने शिक्षणाचे व्यापारीकरणाला घालतांना ज्ञानेश्वर विद्यापीठाच्या उपक्रमाला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. तांत्रिक शिक्षणाचे मुक्त( ओपन) विद्यापीठ असलेल्या या विद्यापीठाला विद्यापीठ म्हणून मान्यता नाही किंवा एआय सीटीईचीही मान्यता नाही. पण अभ्यासक्रम, त्यातील लवचिकता( फ्लेक्झिबिलिटी), आधुनिक विकासाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन, उद्योग जगताकडून मिळणारा अनुकूल प्रतिसाद, कार्यानुभवावर भर, अल्प खर्च, पालकांशी सौहाद्र्य( रॅपोर्ट) अशा या अभिनव ( इन्नोव्हेटिव्ह) आणि अल्प खर्चाच्या प्रयोगांचे व पुढाकारांचे स्वागत करण्याची आणि असा प्रयत्न मोठ्या प्रमाणावर कसे होतील असा एआय सी टी ई ने केला पाहिजे, असा काहीसा आशय नियोजन आयोगाच्या अहवालात आहे. स्वर्गवासी श्री. नाननाजी देशमुख यांचा २००६ मध्ये या विद्यापीठाने ज्ञानेश्वर पारितोषिक प्रदान करून गौरव केला होता. श्री आपटे यांच्या देहावसानानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्य मंत्री श्री मनोहर जोशी यांनी कुलगुरूपदाची धुरा सांभाळली.
कॅलिफोर्निया विद्यापीठ एफ सी ई ने कडे अमेरिकेच्या काही विद्यापीठ आणि महाविद्यालय यांनी ज्ञानेश्वर विद्यापीठाच्यासर्व दृष्टीने मूल्यांकन करण्याची जबाबदारी सोपविली होती. अभ्यासक्रम, शिक्षक वर्ग ( फॅकल्टी), विद्यार्थ्यांची प्रगल्भता (क्रेडिट्स) आदी बाबतीत झालेले मूल्यांकन सादर  करून मानांकनाठी (ॲक्रेडिटेशन) मिळावे, असा अर्ज सादर करण्यात आला आहे.
या विद्यापीठाचे अनेक विद्यार्थी मोठाल्या उद्योगात देशात व देशाबाहेर कार्यरत आहेत. ज्ञानेश्वर विद्यापीठाने पुण्याजवळ आळंदी येथे बारा एकर जागा घेतली असून  'ज्ञानेश्वर विद्यापीठस् टेक्निकल एज्युकेशन  कॅंपस फॅार ॲकॅडेमिक एक्सलन्स' स्थापन करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. या ठिकाणी अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, फार्मसी, मॅनेजमेंट एज्युकेशन असे अभ्यासक्रम सुरू आहेत. निवास व्यवस्था, खेळ आणि क्रीडा संकूल,परकीय भाषांचे अध्यन, प्रशिक्षण केंद्र, बोट क्लब यासारख्या सुविधा आहेत. पुण्याजवळ भोसरीला डॅा. मनोहर आपटे महाविद्यालय आहे.
 विद्यापीठ अनुदान मंडळ( यु जी सी ) आणि ए आय सी टी ई ची मान्यता अजून प्रलंबित आहे.
 न्यायालयाने आपला निर्णय दिलेला आहे, त्याबद्दल किंवा मा. शिक्षणमंत्री श्री विनोद तावडे  यांच्या संबंधात सध्या उपस्थित प्रश्न या विषयी कोणत्याही प्रकारची चर्चा करण्याचे मुद्दामच टाळले आहे.

No comments:

Post a Comment